Topic icon

पेशवाई

4
खूप वर्षांपूर्वी असे वाचले होते की, पेशवे जेवणाच्या बाबतीत अतिशय काटेकोर असत. जसे की प्रत्येक पदार्थांची ताटातील जागा ही ठरलेली असायची. दिवस, वार, सण, उत्सव, जन्म मरण व इतर ठराविक दिवसांसाठी विशिष्ट पदार्थच असायला पाहिजे असा आग्रह होता. पदार्थांची ताटातील जागा चुकल्यास वाढपीला तडकाफडकी जबर शिक्षा होत असे. वर्षभर चंदन किंवा वाळायुक्त पाणी त्यांना पिण्यास लागे.व अजून जेवणाच्या बाबतीत भलत्याच व अनाकलनीय सवयी ह्या पेशव्यांच्या होत्या.

बहुदा इथे ह्याच गोष्टी अपेक्षित असाव्यात.
पेशवाई हि खाण्यामुळे बुडाली' हि म्हण जी रूढ झाली त्याला अशी काही कारणे आहे. याचं अतिरेक झाला उत्तर पेशवाई मध्ये.

पंक्तीत वाढलेल्या ताटांभोवती अत्तर शिंपडले जायचे. उंची वस्त्रे, दागदागिने, महागड्या भेटवस्तू यातच तिजोरी रिकामी होत गेली. काटकसर नावाची गोष्ट औषधालाही उरली नव्हती. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला होता. उधळपट्टीने तर इतकी परिसीमा गाठली की शेवटी शेवटी पेशवाईतील कारभारी दाण्यापाण्याला महाग झाले. मुळात पेशवाई मध्ये जेवणावळ हा सांकेतिक शब्द आहे जो उत्तर पेशवाई मधील विशेषतः दुसरा बाजीराव काळातील भ्रष्ट कामकाज दर्शवतो.पण यात बहुतेक खरे असले तरी ब्राम्हणांना पैश्यांच्या रूपात दान दक्षिणाही मोठ्या प्रमाणात वाटली जात असे.
रावबाजीच्या शेवटच्या कारकीर्दीत दक्षिणेची रक्कम ८ ते १० लाखांपर्यंत गेली होती.(काही इतिहासकार म्हणतात की इंग्रजांविरुद्ध त्र्यंबक डेंगळे यांनी पेंढाऱ्याची जे बंड केले त्यासाठी हा पैसा जायचा)

जशी नंतर सुबत्ता आली आणि मराठ्यांचा संबंध पूर्ण देशाशी आला तसा त्यामुळे आपली खाद्य संस्कृती मध्ये बदल झाला.
आपल्याकडे चांगल्या पंचपक्वनाचे वर्णन पेशवाई थाट अशा शब्दात केले जाते. कारण पेशवाईत जेवणावळी हा तसा विशेष प्रपंच होता.
पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी लाकडा च्या जागेवर कोळसे वापरले जात. इतकेच नव्हे तर या पंगतींचे भोजन बनविण्यासाठी कंत्राट दिले जात असत. बेतही खासा असे.
केशरी भात, कागदासारख्या पातळ पाटवडया, पुरणपोळी, मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी... पानाच्या बाजूच्या द्रोणात दूध, ताक, दही, द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशव्यांच्याच कालखंडात भोजनप्रसंगी पदार्थ कसे आणि कोठे वाढावे याबद्दलची वाढपाची पद्धत सुरु झाली. जी आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहे. पूर्वी महाराष्ट्रात चू.नि. असा विशेष उल्लेख असायचा. याचा अर्थ चूल निवतठेवा. म्हणजे थंड ठेवा. आज रोजी कोणी घरात चूल म्हणून पेटवू नये. असेही आग्रहाचे निमंत्रण असे.
बाहेरील आक्रमणांचा काय परिणाम झााला हे तपासणे विशेष संशोधनाची बात आहे आणि तसेच महत्वाचे ठरते. मुक्ताबाईने आपल्या बंधुंना मांडे खाऊ घातल्याची कथा सर्वांना माहीत आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सतत लढाया आणि् अस्थिरता यामुळे पारंपरिक खाद्य पदार्थांनाच महत्त्व दिले गेले. सण व परंपरा खाद्यपदार्थांच्या अनुषंगाने सांभाळल्या गेल्या.
पेशवाई मध्ये कोशिंबरीचे 56 हून अधिक प्रकार असे(जुन्या काळी त्याचे पुस्तक पण होते). भाताचे पण असंख्य प्रकार.दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना १८०३ मध्ये केळीच्या पानावर साग्र संगीत जेऊ घातले होते. सर बॅरी क्लोज पुण्यात इंग्रजांचा रेसिडेंट असताना व्हॅलेन्शिया या इंग्रज अधिकाऱ्याने पुण्याला भेट दिली होती. त्यांच्या बाजीराव साहेबांनी हिराबागेत खास ब्राह्मणी जेवणाची मेजवानी दिली.केळीच्या पानावर डाव्या बाजूला चटणी, लोणचे, पापड, कुरडया, कोशिंबीर, उजव्या बाजूला सात प्रकारच्या भाज्या, मध्यभागी साधा वरण-भात, साखरभात व सुरळी केलेलीपुरणपोळी, शिर्‍याची मूद. पानाबाहेर सार, कढी, आमटी, तूप, खीर अशा पातळ पदार्थांनी भरलेले द्रोण. अशी ह्या थाळीची मांडणी होती. आख्या पुण्यात अश्या जेवणावळींच्या विविधतेने भरलेल्या पंगती रंगात अस
त्यानंतर पेशवाईत मराठी माणसाची जीभ तृप्त होईल अशी भोजनव्यवस्था असल्याचे इतिहास सांगतो. मग इंग्रजांनी दिडशे वर्ष आणि मुघल बहामनी आणि तुर्क असे 690 वर्ष राज्यनंतर भारतीय जीवनावर त्यांचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. मात्र महाराष्ट्रातील खाद्यजीवन त्यामुळे फारसे प्रभावित झालेले दिसत नाही. महाराष्ट्राने आजही आपली खाद्यपरंपरा टिकवून ठेवली आहे.

२) पेशवाईचे कर्जे

· कर्ज काढून ती फेडण्यात पेशवाई बुडाली अस म्हणतात. कुठल्याही कारणाशिवाय जेवणावळी घातल्या जायच्या असा आरोप काही लोक करतात, पण हे सर्व काही उत्तर पेशवाई मध्ये घडले तेही माधवराव यांच्या मृत्यू नंतर.
पेशव्यांना कर्ज देणारे मोठे मोठे सावकार पण होते.उदाहरणार्थ: विठोबा नाईक रास्ते, श्रीधर पाठक, सीताराम श्रोत्री, रामकृष्णभट वैद्य, अंतोबा भिडे, जिनभट गाडगीळ, बालंभट वैद्य, रघुनाथराव पटवर्धन, सुरुवातीला शिवाजी महाराज ते संभाजी महाराज आणि राजाराम· महाराजांच्या काळात परिस्थिती वेगळी होती. दुसऱ्या राज्यावर विजय मिळविल्यावर झालेल्या तहात खंडणीचे कलम असे. युद्ध झाल्यानंतर शत्रूच्या प्रदेशातील खंडणी तिथल्या तिथेच सर्वच्या सर्व लगेच गोळा करत धावडशीकरासारखा धार्मिक वृत्तीचा स्वतःला मिळालेली दाने आणी देणग्या साठवून पुढे मोठा सावकार बनला. ह्या ब्रम्हेन्द्रस्वामीने पेशव्यांना व इतर सरदारांना लाखो रुपयांची कर्जे दिल्याची पत्रे उपलब्ध आहेत. बाजीरावाने ब्रम्हेन्द्र स्वामींकडून कर्ज घेतले होते. ते दिलेले कर्ज व्याजासहित परत मिळावे म्हणून ब्रम्हेन्द्रस्वामी यांनीबाजीरावाकडे तगादा लावल्याचे पत्र आहे.
· सावकारामार्फत हुंड्याच्या स्वरूपात त्यांची वसुली करण्यात येई. १७५३ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीत मराठ्यांनी दहा लाख नऊशे रुपयांची खंडणी आकारली होती. ह्या खंडणीची रक्कम सातारच्या बारा सावकारांच्या पेढ्यांच्या नावाने गोळा केली गेली होती.ह्या सावकाराच्या कर्जामुळे पेशव्यांना अश्या सावकारांना देऊन कायम खुश ठेवावे लागत असे. एवढेच नव्हे तर ह्या प्रकरणांमुळे पेशव्यांनी सावकारां घरात लग्नही करावी लागले
1.बाळाजी विश्वनाथ पेशव्याची पत्नी राधाबाई ही सावकार बर्वे यांची मुलगी आहे. राधाबाई पेशवे अत्यंत मुत्सद्दी होती. बाकीच्या पेशव्यांची लग्नही सावकार घरात करण्याची प्रयत्न राधा बाई नी केला.
2. पहिली बाजीराव ची बायको काशीबाई हि महादजी कृष्ण जोशी चासकर सावकार यांची मुलगी होती.थोरली नात सून गोपिकाबाई हि भिकाजीपंत शामजी रास्ते गोखले-वाईकर यांची मुलगी होती. ते सावकार होते
3.नानासाहेब पेशव्याची दुसरी बायको राधाबाई हि पैठणच्या नारायणराव वाणवळे सावकारांची मुलगी होती. सावकार सासरेबुवांनी जावई बापु साहेबांसाठी पैठणला मोठा तीन चौकी वाडाही बांधला होता.
4.रघुनाथराव पेशव्याची बायको आनंदीबाई हिचे वडील रघुनाथ महादेव ओक हे हि सावकार होते.
ह्या सगळ्यांचे वडील हे पेशव्यांस कर्ज देत असत आणि पेशवे ह्या सावकारांचे देणे लागत असत.पेशव्यांच्या सोयरिकीमुळे आपल्याला राजाश्रय मिळेल आणि आपली भरभराट होईल अशी विचारसरणी सावकारांची असावी असे दिसते.
जसे बाजीराव पेशव्याला कर्जाने छळले तसेच बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशव्यालाही कर्जाने छळले. अंतस्थ कारभारातील बेबंदशाहीमुळे नानासाहेब पेशव्याचे कर्ज वाढत गेले.आपल्याला पैश्यांची किती गरज आहे हे दाखवून देणारे एक पत्र उपलब्ध आहे. हे पत्र नानासाहेब पेशव्याने मल्हारराव होळकर आणि जयाप्पा शिंदे याना लिहिलेले आहे.
पत्रात म्हंटले आहे, " नालबंदीस तोटा तूर्त दहा लाखाचा आला. तुम्हीही ऐवज न पाठविला. यास्तव जरूर पोटाचे संकटामुळे रसदा घेतल्या. सर्वांपुढे इलाज आहे.पोटापुढे काही इलाज नाही. तो विचार तरी काय लिहावा."
मल्हारराव होळकरांनी नानासाहेब पेशव्याची मोठं मोठी कर्जे फेडली होती. तशी कर्जे जयाप्पा शिंद्यांनीही पेशव्यांची फेडावीत अशी विनंती पत्रे नानासाहेब पेशव्याची आर्थिक गरज किती भयंकर होती हे दर्शवितात.
उत्तर हिंदुस्थानातून चाळीस लाख पाठवून दिले तर बरे होईल; पण असे काही होताना दिसत नाही अशी नानासाहेब पत्रात बोलून दाखवितो.
नानासाहेबावर कर्जाचा बोजा वाढत असतानाच पानिपतचे युद्ध झाले
'जवळचे सगळे पैसे संपले असून नानासाहेब आजून पैसे पाठवा..' असे सांगणारी भाऊसाहेब ची पत्रे अत्यंत वाईट आहेत.बाबूजी नाईक बारामतीकरांसारखे सावकार तर इतके जबरदस्त होते कि पेशव्यांनी वेळेत कर्जफेड केली नाही तर पेशवाईवर हक्क दाखविण्याचे धाडसही ते करून दाखवत असत.

'पेशवे यांचे कालखंड
1707 ते 1740 : 33 वर्ष
पहिल्या बाजीराव ना त्यांच्या वडील बाळाजी या दोघांना उसंत नाही मिळाली ना उत्कृष्ट खाणे आणि पिणे करून मौज करावी. दोघांनी पूर्ण भारतभर आपल्या पराक्रमाचे डंके गाजवले.
1740 ते 176133 वर्ष स्थिरतेची गेली असली तरी शाहू महाराजांचे (संभाजी पुत्र) यांचे निधन 1749 ला झाले म्हणजे आम्ही 9 वर्ष हे शाहू महाराजांनी बऱ्यापैकी नियंत्रित परिस्थित होती. त्यात सुद्धा पेशेवे नी खाण्यात गेली असे आपण नाही म्हणू शकत.1749 ते 1761 म्हणजे पनिपतच्या युद्धापर्यंत नासाहेब पेशवे बऱ्यापैकी स्थिरावले. सांगोला तह झाला 1755 ला पेशवे हे अनभिषिक्त राजे झाले आणि भोसले हे नाममात्र राहिले. त्याकाळी पुण्याचा विकास झाला.पेशव्याचं महत्त्व वाढले. त्यात शनिवार वाडा वरून पूर्ण भारताची राजकारणाची खलबते होऊ लागली. आधी सातारा पण त्यात असे. पण आता सर्व लक्ष शनिवार वाड्यात स्थिरावली. ठिकठिकणच्या राजांची नवाबाची , फ्रेंच इंग्रज यांचे नजराणे जे आधी भोसले कुटुंब कडे यायची ती आता शनिवार वाड्यावर येऊ लागली. त्यात नाटक शाळा आणि बाकीच्या गोष्टी आल्या. प्रचंड लोक आल्यामुळे लोकांच्या जेवणाच्या पंगती उठू लागला. त्यामुळे खाणे पिंने चे जिन्नसे आणि सर्व प्रकार वाढू लागले.
सावकार कडून घेऊन कर्ज वाढीस लागले. 1757 ते 1758 पर्यंत राघोबा दादांनी आपल्या मराठ्यांचे घोड्याचे टापा वाजवत अटकेपार झेंडे लावले. बंगाल मध्ये राघोजी भोसले आणि भास्कर पंडित ने प्रचंड लूट केली. अवघं शी संबंध चांगलेच होते. दिल्ली मराठ्यांच्य इशाऱ्यावर चालत होती. पहिल्या बाजीराव कडून मार खाल्ले निझाम आपल्या वारसा मध्ये संघर्ष होत होता. टिपू आणि हैदर च उदय झाला नव्हता. राजस्थान माळवा हे शिंदे होळकर फौजांनी जेरीस आणले होते. राघोबा द्दनी जी अब्दालीच्या मुलाला अफगाण पर्यंत हकालासून दिले होते. लाहोर कराची बलुचिस्तान पाकिस्तान बांगलादेश आताचा पूर्ण भारत मराठ्यांच्य तालावर नाचत होता. त्यामुळे सत्तेत स्थिरता आलेली आणि ऐश आराम आणि खानावळी पंगत होणे साहजिक होते.
1761 ते 1772
1761 ला पानिपत झाले आणि सर्व धुळीस मिळाले. माधवराव पेशवे झाले. नि मूळचा ऐयाशी स्वभाव नसलेले माधवराव चे राजकारण कडे दुर्लक्ष झाले . आणि पूजा व्रत कैवाल्याकडे लक्ष होते. न्यायाधीश रामशास्त्री नी त्यांना खडासावल्यानंतर ते राजकारणाकडे पुन्हा लक्ष दिले. खूप कमी वयामध्ये झालेला हा पेशवा पूजा व्रत कैवल्य तर सोडा पान आपल्या आई आणि काकांचा सल्ला झुगारून स्वतः राजकारण करू लागला. माणसाची पारीख असलेला हा पेशवा शिवाजी महाराजांच्या आणि शंभू महाराजां च खऱ्या अर्थाने वारसा चालवत होता असे म्हणालो तर नवल नाही. थोडासा अफरातफरकेल्याच्या आरोपावरून त्यांनी गांगोबा चंद्रचूड जे होळकरांचे मुख्य सचिव होते त्यांना वेताच्या छडीने 100 फटाके मारले. एका प्रतिष्ठित सरदाराने त्यांच्या मुलांना सांगितले की माधवराव च्या पुढे विनाकारण पुढे पुढे करू नका. त्यांना माणसाची जान आहे. त्यांना शंका आली तर तुमची खैर नाही. आपल्या कामाशी काम ठेवा . कामाचा मोठा आव आणू नका.
माधवरावांनी पेशवाई मध्ये कोणत्याही प्रकारचा खेलखंडोबा केला नाही. राघोबादादा मात्र त्यांच्या छंदीपणा चालू ठेवला पण मधवमवरावांचे त्यांचे वर पूर्ण नियंत्रण होते. माधवरावांनी महादजी अहिल्याबाई नाना फडणवीस पुढे आणले. आपल्या काकाच्या गटतले असून साडेतीन शहाणे पैकी सखाराम बोकील यांना राज्य हितासाठी उपयोगी पडेल अशी वागणूक आणि प्रयत्न केले .त्याचा फायदा मराठा साम्राज्याला नंतर बार भाई वेळीस झाला.
1771 ते 1798
पहिल्यांदा नारायणराव पेशवे नंतर काहीकाळ राघोबादादा नंतर बरभाई मग सवाई माधवराव पेशवे या कळत मराठा साम्राज्य अंतर्गत कारणा झालेला
1798 ते 1818
दुसऱ्या बाजीराव च्या काळात नाना फडणवीसांचा अंकुश नव्हता त्यामुळे पेशवाई मधील झालेली सर्व दुकृत्ये दुसरा बाजीरावपेशव्यांनी केली. नाच गाणे, पंगती, उधळपट्टी, असे अनेक प्रकार झाले

संदर्भ : -
१) वैद्य दप्तर - खंड २ व ४
 २) मराठी रियासत - खंड ८
 ३) पुरंदरे दप्तर - खंड ३
 ४) मराठी दप्तर - भाग दुसरा
 ५) काव्येतिहास संग्रह पत्रे व यादी
उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121725
1

- बाजीराव हे हे वयाच्‍या 20 व्‍या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पेशावा झाले.
- त्‍यांनी 30 ते 35 लढाय्या लढल्‍या आणि त्‍या सर्व जिंकल्‍या.
- मराठ्यांची ही विजयी घोडदौड सुरूच होती.
- बाजीरावांनी 27 फेब्रुवारी 1740 रोजी नासिरजंग त्‍यांनी लढाई जिंकली आणि मुंगीपैठण येथे तह केला.
- या तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण प्रांत बाजीरावांना दिले.
- त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च 1740 रोजी बाजीराव खरगोणला गेले.
- रणरणत्‍या उन्‍हात घोडेस्‍वारी करताना रावेरखेडी या छोट्याशा गावाजवळ त्‍यांना अचानक उष्‍माघात झाला.
- यातच 28 एप्रिलला त्‍यांनी नर्मदेच्‍या तिरावर वयाच्‍या 40 व्‍या वर्षी प्राण सोडले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुठे आहे समाधी ? कशी झाली दुरवस्‍था... समाधी स्‍थळाकडे कसे जाल...


बाजीराव-मस्‍तानींचा मुलगा समशेर बहाद्दूरचे काय झाले, वाचा इतिहास...
बाजीराव-मस्‍तानींचा मुलगा समशेर बहाद्दूरचे काय झाले, वाचा इतिहास...
पुणे
पहिला बाजीराव पेशवा
बाजीराव, पहिला
बाजीराव, पहिला
(१८ ऑगस्ट १७॰॰ – २८ एप्रिल १७४॰). दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनीही तो इतिहासात प्रसिद्ध आहे. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकाऱ्यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यास लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या (1718) मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावाव्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्याची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२॰ रोजी त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली.

पहिला बाजीराव (भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथील चित्रावरून) बाजीराव पेशवा झाला त्या वेळी मराठी राज्याला चोहोबाजूंनी शत्रूंनी वेढले होते. दख्खनचा सुभेदार निजामुल्मुल्क १७२॰ मध्ये दिल्ली सोडून दक्षिणेस कायमचे ठाण मांडून बसला होता. त्याचा बंदोबस्त करणे, त्याच्याकडून दख्खनच्या चौथ-सरदेशमुखीस संमती मिळविणे, हे पेशव्याचे पहिले काम होते. त्याशिवाय मिरज, अहमदनगरसारखी ठाणी मोगलांच्या ताब्यात होती. तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्दी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता. तो मुक्त करणे आवश्यक होते. माळव्यात १७॰॰ पासून मराठी फौजा फिरू लागल्या होत्या. त्याचा फायदा घेऊन दिल्ली दरबारात वर्चस्व स्थापन करण्याचीही गरज होती.

बाजीरावाची प्रारंभीची तीन-चार वर्षे खानदेश –बागलाण-कर्नाटक या भागांत स्वारी-शिकारीत गेली. पेशव्याची फौज कर्नाटकात दूर गेली आहे, असे पाहून १७२७ मध्ये निजामाने कोल्हापूरच्या संभाजीशी संधान बांधले आणि छत्रपती शाहूशी असा दावा मांडला की छत्रपतिपदाचा हक्क दोन्ही बंधूंनी निश्चित करावा, मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. शाहूच्या छत्रपतिपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता. बाजीरावाने निजामाचा हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली. ७२७ चा पावसाळा संपताच मोठ्या फौजेनिशी तो निजामाच्या मुलखावर चालून गेला. खानदेश, बऱ्हाणपूर, सुरत या भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावाने निजामाचा तोफखाना निरुपयोगी केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केले. अखेर निजाम शरण आला. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेवगावच्या तहाने युद्धविराम झाला. शाहूच्या छत्रपतिपदास निजामाने मान्यता दिली; कोल्हापूराच्या पातीशी संबंध सोडला आणि दख्खनच्या सहा सुभ्यांतून चौथ-सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्यास मान्यता दिली. दक्षिणेत संचार करण्यास मराठी फौजांस हरकत राहिली नाही. निजामावरील विजयाने शाहूच्या दरबारात बाजीरावाचे वजन वाढले.
राज्यविस्ताराच्या विभागणीत सेनापती दाभाडे यांच्याकडे गुजरात, अहमदाबाद, काठेवाड हा प्रदेश होता आणि पेशव्यांकडे बागलाण, खानदेश, माळवा आणि त्याजवळचा प्रदेश देण्यात आला होता; पण१७२५पासून पेशव्यांच्या फौजा गुजरातेत जाऊ लागल्या.१७२७मध्ये पेशव्यांच्या बाजी भिमराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर इ. सरदारांनी सुभेदाराशी चौथ-सरदेशमुखीची बोलणी सुरू केली आणि १७३॰मध्ये खुद्द पेशव्याचा भाऊ चिमाजी आप्पा याने गुजरातेत जाऊन चौथ-सरदेशमुखीच्या करारावर शिक्कामोर्तब करून घेतले. आपल्या टापूत पेशव्यांच्या फौजांनी फिरावे, हे सेनापती दाभाडे यास मान्य नव्हते. त्याने छत्रपतींकडे दाद मागण्याऐवजी फौजेची जमवाजमव केली आणि निजामाशी गुप्त बोलणी केली. या कटाची माहिती मिळताच बाजीराव गुजरातेत चालून गेला आणि त्याने १ एप्रिल १७३१ रोजी डभई येथे सेनापतीस गाठले व त्याच्या सैन्याचा पराभव केला. खुद्द त्रिंबकराव दाभाडे गोळी लागून ठार झाला. पेशव्याने छत्रपतींच्या कानावर वस्तुस्थिती घालून त्यांची समजूत घातली. जंजिऱ्याचा सिद्दी कोकणपट्टीत शिवछत्रपतींच्या काळापासून अजिंक्य होता. सुरुवातीस सिद्दी आदिलशाहीचा नोकर होता; परंतु पुढे तो मोगलांचा सरदार बनला; संभाजीच्या वधानंतर महाड, रायगड, दाभोळ, अंजनवेल वगैरे बराचसा मराठी मुलूख सिद्दीच्या ताब्यात गेला. १७२७ मध्ये सिद्दीच्या एका सरदाराने छत्रपतींचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांच्या चिपळूण येथील परशुरामाच्या देवळाचा विद्ध्वंस केला, तेव्हा या शत्रूचा समाचार घेणे प्राप्त झाले.

कुलाबकर आंग्रे यांना साताऱ्यास बोलावून मोहिमेची चर्चा सुरू झाली. त्याच सुमारास जंजिऱ्याचा किल्लेदार सिद्दी रसूल मरण पावला (१७३३) आणि त्यांच्या वारसांबाबत तंटा सुरू झाला. त्यातील एक पक्ष मराठ्याना येऊन मिळाला. त्याच्या साह्याने शत्रू बेसावध आहे, तोच त्याचे आरमार आणि दर्यातील मोक्याची जागा जंजिरा काबीज करण्याकरता छत्रपतींनी पेशव्यास तातडीने रवाना केले. रायगड आणि दक्षिण कोकणातील ठाणी घेण्याकरिता श्रीपतराव प्रतिनिधींच्या हाताखाली दुसरी फौज पाठविण्यात आली. पेशव्याची फौज त्वरेने कोकणात उतरून सिद्दीच्या मुलखावर चालून गेली. राजपुरीचे बंदर घेऊन बाजीरावाने आरमाराचा काही भागही घेतला; पण जंजिरा मात्र त्यास जिंकता आला नाही. सरखेल आंग्रे यांचे आरमारी साह्य मिळविण्याचा पेशव्याने खूप प्रयत्न केला; पण सिद्दीने इंग्रज-पोर्तुगीजांच्या साहाय्याने आंग्र्यास शह दिला. जंजिरा किल्ल्याने दोन वर्षे लढूनही दाद दिली नाही. अखेर १७३६ च्या सप्टेंबरात दोघांत तह होऊन सिद्दीच्या अकरा महालांपैकी निम्मा मुलूख मराठी अंमलाखाली रहावा असे ठरले. सिद्दीकडील तळे, घोसाळे, बिरवाडी वगैरे ठाणी मराठ्यांकडे आली. जंजिरा, कासा, उदेरी हे जलदुर्ग मात्र मराठ्यांच्या हाती आले नाहीत. पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांचा मराठ्यांनी या सुमारास निकाल लावला. पोर्तुगीजांनी नाविक सत्ता आणि आधुनिक तऱ्हेची शस्त्रास्त्रे यांच्या जोरावर कोचीन, गोवा, चौल, वसई, दमण, दीव इ. ठाणी आणि त्यालगतचा मुलूख बळकाविला होता आणि प्रदेशांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार त्यांनी केला. छत्रपतींनी पेशव्याकडे ही कामगिरी सोपविली. २६ मार्च १७३७ रोजी मराठी सैन्य साष्टी बेटात अचानक घुसले आणि त्याने किल्ल्यात प्रवेश केला. त्याच दिवशी दुसऱ्या तुकडीने वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. साष्टीची मोहीम त्वरित यशस्वी झाली. ठाण्याचा किल्ला आणि साष्टी बेट यांचा कबजा मराठ्यांनी आठपंधरा दिवसांत घेतला. वसईचा किल्ला मात्र पडेना, दोन वर्षे वेढा चालू राहिला. केळवे, माहीम, तारापूर, अशेरी या ठिकाणी तुंबळ युद्धे होऊन शत्रू अगदी जेरीस आला. शेवटी चिमाजी आप्पाच्या पराक्रमाने १२ मे १७३७ रोजी वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
बाजीराव पेशव्याने दक्षिण निर्वेध केली, पण त्याच्या या यशाचे मर्म त्याच्या उत्तरेकडील राजकारणात शोधले पाहिजे. मोगल बादशाहीचा वृक्ष जीर्ण झाला आहे; फांद्यांवर कुऱ्हाड न चालविता बुंध्यासच हात घालावा, हे धोरण पेशव्याने पतकरले. पेशव्याचा संचार सुरुवातीपासून नर्मदेपलीकडे सुरू होता.२९ नोव्हेंबर १७२८ रोजी चिमाजी आप्पाने माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर यास आमझेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल याच्या साहाय्यास गेला. त्याने जैतपूर येथे सुभेदार मुहम्मदखान बंगश यास वेढले आणि त्याच्या सैन्याची वाताहात केली. हरसाल मराठी फौजांच्या उत्तरेकडे हालचाली सुरू झाल्या.१७३३ साली पेशव्याने सवाई जयसिंगाशी सामना दिला.१७३३मध्ये बुंदी, दंतिया, ओर्छा या भागांतून पेशव्याच्या सरदारांनी चौथ वसूल केला. पिलाजी जाधवाने मार्च १७३५ मध्ये वझीर कमरुद्दीनखान याच्याशी ओर्छानजीक लढाई केली. याच वेळी राजस्थानात मुकुंदरा घाट ओलांडून शिंदे-होळकरांनी मीरबक्षी खान-इ-दौरां याच्या सैन्यास घेरले. धावपळीच्या लढाईत मोगली सैन्याचा मराठी फौजांपुढे टिकाव लागेना. माळव्याचा चौथ म्हणून मोगल दरबाराने दरसाल मराठ्यांना बावीस लक्ष रुपये द्यावेत, या अटीवर युद्ध तहकुबी झाली.
मीरबक्षी आणि सवाई जयसिंग यांचे तडजोडीचे धोरण मोगल दरबारात मान्य होईना. तेव्हा फिरून एकदा बाजीराव आपल्या फौजांसहित उत्तरेत चालून आला (१७३६). जयसिंगामार्फत दिल्ली दरबाराशी बोलणी सुरू झाली. माळव्याची सुभेदारी मांडू, धार, रायसीन इ. किल्ले, काही जहागिरी, बंगालच्या वसुलात ५॰ लक्षाचा चौथ, अलाहाबाद, वाराणसी, गया, मथुरा इ. हिंदूंची पवित्र क्षेत्रे, दख्खनची सरदेशपांडेगिरी व दक्षिणेत ५॰ लाखांची जहागीर या मागण्या पेशव्याने दरबाराकडे केल्या.
पेशव्याच्या वाढत्या मागण्या दिल्ली दरबारास मान्य होईनात. चालढकलीचे धोरण दरबाराने स्वीकारले. तेव्हा पुन्हा १७३७च्या सुरुवातीस पेशव्याने उत्तरेकडे चाल केली. पेशव्याचा रस्ता रोखून धरण्याकरिता दोन मोगली दिल्लीतून निघाल्या. दोन्ही सैन्यांची नजर चुकवून मराठी फौज २९ मार्च रोजी दिल्लीजनीक येऊन ठेपली. राजधानी आता उद्ध्वस्त होणार अशी धास्ती सर्वांस वाटू लागली. आपल्या मागण्यास अनुकूल असणाऱ्या पक्षाच्या विचाराने बादशाह वागेल, अशी पेशव्याची अपेक्षा होती; पण दिल्ली दरबारात पेशव्याचे वर्चस्व स्थापन झाल्यास, आपण निर्माल्यवत होणार हे ओळखून निजामाने उत्तरेस प्रयाण केले. मराठ्यांचे आक्रमण हाणून पाडण्याकरता मोठी फौज, जंगी तोफखाना आणि भरपूर खजिना निजामाच्या स्वाधीन करण्यात आला. निजामाची स्वारी पेशव्याशी निकराचा सामना घेण्याच्या इराद्याने निघाली. पेशव्यानेही भोपाळनजीक निजामास गाठले. १५ डिसेंबर १७३७ रोजी निजामाचा पराभव झाला. तो भोपाळच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. पेशव्याच्या फौजेने शत्रूची नाकेबंदी केली. निजामाचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा त्याने पेशव्याच्या मागण्यांस दरबाराकडून मान्यता मिळवून देऊ, या अटींवर संमती देऊन ७ जानेवारी १७३८ रोजी समेट केला.

माळवा सुभा, नर्मदा आणि चंबळ यांमधील सर्व प्रदेश हे मराठ्यांना बहाल करावयाचे आणि त्याबाबतचे बादशाही फर्मान पेशव्यास मिळवून द्यावयाचे, या अटींवर पेशव्याने वेढा उठविला.
भोपाळचा विजय हा पेशव्याच्या कारकीर्दीतील सवोच्च बिंदू होय. या विजयाने माळवा-बुंदेलखंडात मराठी सत्ता प्रस्थापित झाली आणि मोगल दरबारात मराठ्यांचे वर्चस्व वाढले.
पुढील दोन वर्षांत पेशव्याच्या खानदेश-माळव्यात हालचाली चालू होत्या. पेशव्याने निजामाचा थोरला मुलगा नासरजंग याचे पारिपत्य केले (१७४॰). नर्मदाकाठी रावेरखेडी येथे मुक्काम असता एकाएकी ज्वराचे निमित्त होऊन हा थोर पेशवा मरण पावला.
बाजीरावाचे चरित्र व चारित्र्य रोमांचाकारी घटनांनी भरले आहे. तो स्वभावाने तापट होता. सेनापतीस योग्य असे धैर्य व घाडस त्याच्या अंगी होते. त्याचे खासगी जीवन अत्यंत साधे, मराठी शिपाईगडयास साजेसे होते. वयाच्या तेराव्या वर्षी महादजी कृष्ण जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला (१७१३). त्यांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. उत्तरेकडील स्वारीत त्यांचा मस्तानीशी संबंध आला (१७२९). मस्तानीविषयी अत्यंत विश्वासार्ह असे साहित्य अद्यापि उपलब्ध झाले नाही. मस्तानी एक नर्तकी होती. छत्रसालापासून ती पेशव्यास प्राप्त झाली. त्या वेळेपासून ती पुढे सर्व स्वाऱ्यात त्याच्याबरोबर असे. मस्तानीच्या नादाने पेशवा मद्यप्राशन आणि मांसभक्षण करू लागला. बाजीरावाने मस्तानीचा नाद सोडावा, म्हणून चिमाजी आप्पा व नानासाहेब यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. बाजीरावापासून मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला.

तो पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. मस्तानी ही बाजीरावाच्या निधनानंतर लगेच मरण पावली. तिच्या नावाचा महाल शनिवार वाड्यात बांधला होता.
बाजीरावाने मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर कले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवी क्षितिजे निर्माण केली. पेशव्याच्या चपळाईच्या हालचालींपुढे प्रचंड मोगली फौजा आणि त्यांचे तोफखाने कुचकामी ठरले, याबद्द फील्ड मार्शल मंगमरी याने बाजीराव पेशव्याची प्रशंसा केली आहे. त्याने दिल्ली दरबारात मराठी सत्तेला मानाचे स्थान प्राप्त करून दिले; तथापि राजकारभारात त्यास शिस्त निर्माण करता आली नाही आणि राज्य सुसंघटित करता आले नाही. बाजीराव पेशवा स्वत:च एक बलाढय सरंजामी सरदार बनला आणि मराठ्यांचे राज्य बलाढय सरदारांच्या जहागिरीचा संघ बनले.

 
बाजीरावांचा मृत्‍यू कसा झाला, कुठे आहे समाधी, वाचा रंजक माहिती
5 वर्षांपूरS : बाजीरावांचा मृत्‍यू कसा झाला, कुठे आहे समाधी, वाचा रंजक माहिती|पुणे,Pune - 
बाजीरावांचे समाधी स्‍थळ. इन्‍सेट बाजीराव.

थोरले बाजीराव पेशवे यांची गुरुवारी पुण्‍यतिथी आहे. गत वर्षी त्‍यांच्‍या जीवनावर आधारित 'बाजीराव-मस्‍तानी' या हिंदी चित्रपटाने 100 कोटींपेक्षा अधिक गल्‍ला जमवला. मात्र, या वीर योद्ध्याचे समाधीस्‍थळ अजूनही उपेक्षित असून, या  टाकलेला हा प्रकाशझोत...
कसा झाला मृत्‍यू ?
- बाजीराव हे हे वयाच्‍या 20 व्‍या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पेशावा झाले.
- त्‍यांनी 30 ते 35 लढाय्या लढल्‍या आणि त्‍या सर्व जिंकल्‍या.
- मराठ्यांची ही विजयी घोडदौड सुरूच होती.
- बाजीरावांनी 27 फेब्रुवारी 1740 रोजी नासिरजंग त्‍यांनी लढाई जिंकली आणि मुंगीपैठण येथे तह केला.
- या तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण प्रांत बाजीरावांना दिले.
- त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च 1740 रोजी बाजीराव खरगोणला गेले.
- रणरणत्‍या उन्‍हात घोडेस्‍वारी करताना रावेरखेडी या छोट्याशा गावाजवळ त्‍यांना अचानक उष्‍माघात झाला.
- यातच 28 एप्रिलला त्‍यांनी नर्मदेच्‍या तिरावर वयाच्‍या 40 व्‍या वर्षी प्राण सोडले.
पुअपराजित योद्धा - पहिला बाजीराव


मराठ्यांना नर्मदेपलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावाने मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. राजपूत राजांपासून मुस्लिम नबाब आणि शाह्यांना या रावबाजीने नमवले मराठी जरीपटका डौलात उत्तर हिंदुस्तानात फडकविला.

बाजीरावाचा जन्म भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके १६२२ अर्थात १८ ऑगस्ट १७०० साली झाला. पहिले पेशवे बाळाजी बाजीराव हे बाजीरावाचे पिता. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकला. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्याच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. दुर्देवाने त्यानंतर लगेचच बाळाजी बाजीरावांचा मृत्यू झाला नि पेशवेपदाची सुत्रे बाजीरावाच्या हातात आली. पण हे इतके सहज घडले नाही. शाहू महाराजांच्या दरबारी मंडळींचा बाजीरावाला विरोध होता. पण शाहूंनी त्यांचे न ऐकता बाजीरावाला या पदाची शिक्के नि कट्यार सोपवली. शाहूंचा हा निर्णय बाजीनेही सार्थ ठरवला.

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळवलेला हा पेशवा वयाच्या चाळिसाव्या वर्षी मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे मरण पावला. पण या वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत त्याने 'अतुलनीय' पराक्रम केला. या काळात त्याने एकूण ३० ते ३५ लढाया खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्याही. त्यातल्या २१ तर मोठ्या लढाया होत्या. लढाईत शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हारणारा हा एकमेव वीर आहे.



बाजीने माळवा, निमाड प्रांत ताब्यात घेतला. गुजरातमध्येही धडक मारली. पुढे आणखी उत्तर हिंदुस्तानात पसरण्याची संधीही त्याला मिळाली. बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादच्या बंगश पठाणांनी हल्ला चढवून त्याला कैद करून ठेवले. छत्रसालाने बाजीला पत्र लिहून "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.

छत्रसालाने यानंतर बाजीरावाच्या पराक्रमावर खुष होऊन आपल्या उपपत्नीपैकी एकीची मुलगी 'मस्तानी' बाजीरावाला दिली. तीही रितसर लग्न लावून. मराठी इतिहासात पेशवाईचा उल्लेख करताना बाजीरावाचे नाव येते. पण का कुणास ठाऊक त्याच्या पराक्रमाचे योग्य दान त्याच्या पदरात टाकले गेले नाही. अतुलनीय पराक्रम गाजवूनही तो उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी हे कदाचित त्याचे कारण असावे. हिंदू जोधाबाईला पत्नी करून घेणारा सम्राट अकबर सर्वत्र चर्चिला जातो, पण एका मुस्लिम (?- मस्तानी ही प्रणामी पंथाची होती, ज्यात हिंदू व मुस्लिम यांची मिश्र उपासना पद्धत आहे.) बाईला कायद्याने पत्नी म्हणून घरी आणणारा आणणारा बाजीराव मात्र उपेक्षित ठरविला जातो हे दुर्देव आहे.

बाजीरावाची आपण उपेक्षा केली तरी जगाच्या इतिहासात मात्र तो तितका उपेक्षित राहिला नाही. म्हणूनच अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे. या लढाईत बाजीने निजामाला पाणी पाजले. या लढाईत अतिशय वेगवान हालचाल करून बाजीने निर्णय घेतले आणि निजामाला दाती तृण धरायला लावले. याशिवाय नादिरशहाला पराभूत केले ती लढाईसुद्धा त्याच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देणारी आहे. १७३९ मध्ये नादिरशहाने दिल्ली लुटली. बाजीरावाने चंबळच्या खोर्‍यात आणले आणि चक्क लढाई न करताच शत्रूचे सैन्य परत गेले. बाजीरावाकडे योजना आखण्याची बुद्धी होती आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी हात होते, हे इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफनेही लिहून ठेवले आहे.

बाजीरावाच्या लढाईची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तो एक चांगला सेनापती होता. युद्ध कसे लढावे आणि कुठे लढावे याचे यथायोग्य ज्ञान त्याच्याकडे होते. घोडेस्वारांचे पथक हे त्याचे मुख्य बळ होते. त्याच्या शिस्तबद्ध फौजा ७५ किलोमीटर प्रती दिन या वेगाने जायच्या. त्यांच्याबरोबर सामान अगदीच कमी असे. महिला नव्हत्या. रात्री झोपण्यापेक्षा जास्त हल्ला कसा करायच्या याच्या योजना ठरत. शत्रूची रसद तोडणे आणि त्याला होणारा सगळा पुरवठा तोडणे यावर भर दिला जाई. स्वतः बाजीराव घोड्यावरच झोप घेई. त्यावरच तो जेवण करत असे.

पुण्याचा शनिवारवाडाही बाजीरावानेच बांधला. पुण्यातून हललेले मराठी सत्तेचे केंद्र त्यानेच कोल्हापुरातून आणून पुण्यात वसविले. हिंदूस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कारवायांना मात्र तोंड देऊ शकला नाही. मस्तानीवर त्याने अफाट प्रेम केले तरी पुण्यातल्या तत्कालीन ब्रह्मवृंदाला, त्याच्या आईला आणि बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून त्याल समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला. घरच्या कारवायांनी सतत वैतागलेला बाजी लढाईच्या मोहिमांवरच राहू लागला. याच वातावरणात २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून मध्य प्रदेशातील खांडवा- इंदूर मार्गावर असलेल्या सनावदजवळ नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे हा महापराक्रमी पेशवा विषमज्वराने मरण पावला. मृत्यूवेळी तो अवघ्या चाळीस वर्षांचा होता.

' जीवाची बाजी लावणे' हा वाक्प्रचार आपल्या कर्तृत्वाने जन्माला घालणार्‍या या महान योध्याला सलाम.


उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 121725
4
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.

उत्तर लिहिले · 4/8/2021
कर्म · 34195