सोशिअल मीडिया

इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

2 उत्तरे
2 answers

इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

1
आजच्या डिजिटल युगात जवजवळ प्रत्येक व्यक्ती मोबाईल आणि इंटरनेट चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे ज्यामध्ये विविध प्रकारच्या सोशल साईट्स मध्ये खूप व्यस्त असतो. या सोशल मीडिया मध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, लिंक्डइन, इंस्टाग्राम, आणि ट्विटर अश्या साईट्स चा समावेश होतो.

तसेच आज आपण इंस्टाग्राम या सोशल मीडिया बद्दल पाहणार आहोत. यामध्ये आपण इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवू शकतो याबद्दल सोपे मार्ग समजून घेऊया.      
       
इंस्टाग्राम म्हणजे काय?

इंस्टाग्राम हि एक सोशल नेटवर्किंग साईट्स आहे. यामध्ये आपल्याला Facebook प्रमाणेच आपण आपले फोटो, विडिओ खाजगी किंवा सार्वजनिक रीतीने अपलोड करू शकतो.
आज इंस्टाग्राम मध्ये 1 Billion+ Monthly ऍक्टिव्ह युसर्स आहेत, इंस्टाग्राम वर वापरकर्ते अमर्यादित चित्रे आणि विडिओ अपलोड करू शकतात. यामध्ये विडिओ जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी Hashtag चा वापर केला जातो. तसेच इंस्टाग्राम वर आपण Story सुद्धा ठेवू शकतो, ही स्टोरी 24 तासानंतर आपोआप अदृश्य होते.
इंस्टाग्राम वरून पैसे कमावण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इंस्टाग्राम पेज किंवा अकाऊंट तयार करावे लागणार आहे.

इंस्टाग्राम मधून पैसे कमवायचे असतील तर पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.

इंस्टाग्राम वर खाते किंवा पेज तयार करण्याच्या च्या आधी जाणून घ्या की तुम्हाला कोणती फील्ड आवडते, म्हणजेच की तुम्हाला कोणत्या विषयाचे ज्ञान आहे.

जसे की Cooking Tips, Travelling, Yoga instruction, Photography. तुमच्या Instagram अकाऊंट वर फोटो किंवा विडिओ स्वरूपात माहिती देऊन तुम्ही मोठ्या प्रमाणावर फोल्लोवर्स बनवू शकता. जर इंस्टाग्राम वर जास्त फोल्लोवर्स असतील तर तुम्ही इंस्टाग्राम वरून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.

  • इंस्टाग्राम खाते किंवा पेज तयार करताना त्याला आकर्षक आणि Unique नाव द्यावे.
  • आपल्या इंस्टाग्राम खात्याला आकर्षक प्रोफाइल फोटो अपलोड करावा.
  • इंस्टाग्राम पेज चालू करण्याचा हेतू स्पष्टपणे Bio मध्ये ऍड करावा. तसेच Bio मध्ये चुकीची माहिती टाकू नये.

इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे | Best way to Make Money in Instagram

Affiliate Marketing

एफिलिएट मार्केटिंग मध्ये एखाद्या प्रॉडक्ट्स् ला प्रमोट केले जाते आणि त्या प्रॉडक्ट च्या विक्री वर त्यासाठी काही प्रमाणात कमिशन मिळविले जाते.

Sell Your Own Product

तुम्ही काही प्रोडक्ट तयार करत असाल, तर तुम्ही इंस्टाग्राम च्या माध्यमातून तुमच्या प्रोडक्ट ला प्रमोट करू शकता. तसेच तुम्ही इंस्टाग्राम खात्यांवरून प्रॉडक्ट्स ची विक्री सुद्धा करू शकता. प्रोडक्ट विकण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम खात्यामध्ये प्रोडक्ट च्या विषयी सर्व माहिती द्यावी, तसेच प्रोडक्ट चे काही फोटो किंवा विडिओ अपलोड करावे.

Promote Other Instagram Account

जर आपल्या इंस्टाग्राम पेज वर मोठ्या प्रमाणात फोल्लोवर्स असतील तर आपण आपल्या इंस्टाग्राम पेज वर इतर इंस्टाग्राम अकाऊंटला किंवा पेज ला प्रमोट करू शकतो. एखाद्या नवीन इंस्टाग्राम अकाऊंटला फोल्लोवर्स वाढवायचे असतात, तेव्हा फोल्लोवर्स वाढवण्यासाठी ते मोठ्या इंस्टाग्राम खात्यांना किंवा पेज ला त्यांचे अकाऊंट प्रमोट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देत असतात. अशा प्रकारे Other Instagram account Promot केल्याने आपण पैसे कमवू शकतो.

Get Sponsorship

जेव्हा आपल्या इंस्टाग्राम पेज वर मोठ्या संख्येने फोल्लोवर्स असतात तेव्हा आपल्याला मोठं मोठ्या कंपनी कडून स्पॉन्सरशिप ऑफर्स मिळत असतात. या स्पॉन्सरशिप च्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो.

अश्या प्रकारे आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे आणि इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्यासाठी (Make Money on Instagram in Marathi) कोणते मार्ग उपयुक्त आहेत याबद्दल माहिती बघितली जर तुम्हाला आणखी संपूर्ण आणि विस्तृत माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट ला व्हिसिट करा.

उत्तर लिहिले · 17/6/2021
कर्म · 2195
0

इंस्टाग्रामवरुन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  1. स्पॉन्सर्ड पोस्ट (Sponsored Posts):

    तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एखाद्या ब्रांड (Brand) किंवा प्रोडक्टची (Product) जाहिरात करू शकता. त्या बदल्यात तुम्हाला Brand पैसे देतात.

    उदा: एखाद्या कपड्यांच्या कंपनीने त्यांच्या नवीन कलेक्शनची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले.

  2. ॲफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):

    ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टची लिंक (Link) तुमच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये किंवा स्टोरीमध्ये शेअर करता. जेव्हा कोणी तुमच्या लिंकवरून ते प्रोडक्ट खरेदी करतं, तेव्हा तुम्हाला कमिशन (Commission) मिळतं.

    उदा: ॲमेझॉन (Amazon) किंवा इतर ई-कॉमर्स (E-commerce) वेबसाईटच्या प्रोडक्टची लिंक शेअर करणे.

  3. तुमचे स्वतःचे प्रोडक्ट (Your Own Product):

    तुम्ही तुमचे स्वतःचे प्रोडक्ट इंस्टाग्रामवर विकू शकता. जसे की, तुम्ही बनवलेल्या वस्तू, डिझाईन (Design) केलेले कपडे किंवा तुमचे डिजिटल प्रोडक्ट (Digital product) (ई-बुक, कोर्स) विकू शकता.

  4. इन्स्टाग्राम अकाउंट विक्री (Instagram Account Selling):

    तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट, ज्यावर जास्त फॉलोवर्स (Followers) आहेत, ते विकू शकता.

  5. फोटो आणि व्हिडिओ विक्री (Photo and Video Selling):

    तुम्ही काढलेले फोटो आणि व्हिडिओ (Video) वेगवेगळ्या वेबसाईटवर विकू शकता.

  6. इन्स्टाग्राम मार्केटिंग कन्सल्टंट (Instagram Marketing Consultant):

    इतरांना त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट वाढवण्यासाठी आणि प्रभावी बनवण्यासाठी तुम्ही सल्ला देऊ शकता.

टीप: इंस्टाग्रामवर पैसे कमवण्यासाठी तुमच्या अकाउंटवर जास्त फॉलोवर्स असणे आवश्यक आहे आणि तुमच्या पोस्टवर लोकांचा चांगला प्रतिसाद (Response) मिळणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 220

Related Questions

मल्टीमीडियाचे फायदे कोणते आहेत?
सोशल मीडियाचे प्रकार कोणते आहेत?
सोशल मीडिया म्हणजे काय?
मी एक फुल एचडी व्हिडिओ बनवला, पण व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवल्यावर क्लिअर दिसत नाही. काही पर्याय आहे का व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी?
व्हॉट्सॲपवर 'Use WhatsApp on other devices. Link a device' असे व्हॉट्सॲप वेबवरती (WhatsApp Web) दाखवत आहे, तर कृपया निलेश पाटील सर सांगा.
एखादे युट्युब चॅनेल सुरू करायचे असेल आणि त्या नावाचे दुसरे चॅनेल नाही याची खात्री कशी करावी?
समीर गायकवाड प्रकरण काय आहे?