आधार कार्ड पॅन कार्ड

आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे?

2 उत्तरे
2 answers

आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे?

0
  Aadhaar Card ला Pan Card लिंक करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सरकारने अनेक सोपे मार्ग उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना जास्त त्रासाला सामोरे जाण्याची गरज नाही.
  Aadhaar Card- PAN Card Link करण्याची शेवटची तारीख आयकर विभागाने 30 जून 2021 दिलेली आहे, त्यामुळे आता आपणास घाबरायची गरज नाही.
   आजच्या या लेख मध्ये मी आधार कार्ड ला पॅन कार्ड सोबत लिंक कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती देत आहे, तरी सर्वांना विनंती आहे की लेख संपूर्ण वाचा.
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे?
    आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आयकर विभागाने दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिला म्हणजे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आणि दुसरा SMS द्वारे संदेश पाठवून.

    मी खाली दोन्हीही पर्यायाची सविस्तर माहिती दिलेली आहे, जेणेकरून आपण कोणत्याही अडचणी शिवाय आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता.

1) आधार कार्डला पॅन कार्ड ऑनलाईन पध्दतीने लिंक कसे करावे?
   ही प्रक्रिया मी आपणास Steps नुसार सविस्तर खाली सांगितली आहे. यांचा वापर करून आपण सहजपणे Aadhaar-Pan Linking ची प्रक्रिया करू शकता.

Step 1) भारतीय आयकर विभागाच्या Income Tax e- Filling Website वर भेट देऊन Quick Links मधील Link Aadhaar पर्यायावर क्लिक करावे.


Step 2) आपला PAN आणि Aadhaar Number दिलेल्या जागेवर टाइप करावा.

Step 3) आपल्या आधार वर आपले नाव जसे आहे, त्याप्रमाणे दिलेल्या जागेवर लिहावे.

Step 4) जर आपल्या आधार वर फक्त आपली जन्मतारीख असेल तर I Have Only Year of Birth in Aadhaar Card या समोरील बॉक्सवर टिक करावे.

Step 5) आता I Agree to validate My Aadhaar Details with UIDAI या समोरील बॉक्स वर टिक करावे.


Step 6) आता चित्रात दाखवलेला Captcha Code दिलेल्या जागेत अचूक भरावा आणि Link Aadhaar बटण वर क्लिक करावे.

Step 7) जर आपल्याला Captcha Code भरायला अडचण येत असेल तर आपण OTP द्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.


Step 8) सर्व प्रक्रिया झाल्यावर आपणास एक सूचना येईल की Your Aadhaar is Successfully Linked with PAN Card म्हणजे आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक झाले आहे.

2) आधार कार्डला पॅन कार्ड SMS पाठवून लिंक कसे करावे?
    आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावे.

Step 1) SMS द्वारे Linking प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या पद्धतीने एक संदेश लिहायचा आहे.

UIDPAN<Aadhaar Number><PAN>

Step 2) उदा… 

  जर आपला आधार नंबर 1234 5678 4567 असा असेल आणि पॅन ABCDEF321FG असा असेल तर संदेश खालील प्रमाणे-

UIDPAN<123456784567><ABCDEF321FG>

Step 3) संदेश कसा असावा हे आता आपणास कळले आहे, आता हा संदेश 567678 किंवा 56161 या नंबर वर पाठवायचा आहे.

Step 4) संदेश पाठवताना आपण Registered Mobile Number वरून पाठवला आहे, याची खात्री करून घ्यावी.

Aadhaar Card PAN Card Link Status कसे पाहावे?
    आपण वरील सर्व Steps पूर्ण करून linking प्रक्रिया केली आहे, पण हे व्यवस्थितरित्या पूर्ण झाले आहे का नाही हे Check कसे करावे हे मी खाली सांगत आहे.

Step 1) भारतीय आयकर विभागाच्या Income Tax e- Filling Website या साईट ला भेट द्या.

aadhaar pan link procedure
Step 2) आपला पॅन टाका.

Step 3) आपला आधार नंबर टाका.

aadhaar pan link status
Step 4) आता View Aadhaar Link Status या बटण वर क्लिक करा. तुम्हाला Aadhaar-PAN Link Status दाखवले जाईल.
उत्तर लिहिले · 3/4/2021
कर्म · 30
0
हा विडीओ बघा
उत्तर लिहिले · 9/9/2021
कर्म · 5255

Related Questions

पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला खालीलपैकी कोणती एक कागदपत्रे असणे आवश्यक आहे? पॅन (PAN) डिन (DIN) सिन(CIN?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
पॅन कार्ड हरवलं आहे?
पॅनकार्ड हरवलं असल्यामुळे जुना पॅन नंबर कसा मिळवावा?
पॅन कार्ड हरवल्यास पॅन नंबर मिळविणे?
पॅन कार्ड वरील जन्मतारीख चुकीचे आहे ?