Topic icon

पॅन कार्ड

1
पॅनकार्ड काढण्यासाठी आधारकार्ड  व २ फोटो लागतात. किंवा  फक्त आधारकार्डने  देखील काढतात येते.
पॅनकार्ड काढण्याच्या २ पद्धती आहेत. १. आभासी (Only e-PAN Card) जे आधारकार्ड द्वारे फक्त डिजिटल स्वरुपात ईमेल मध्ये उपलब्ध होत. 
२.Physical PAN Card & e-PAN Card म्हणजे ते प्रत्यक्ष आपल्या पत्त्यावर व ईमेल मध्ये येते.
पॅनकार्ड काढण्यासाठी जवळच्या online सेवा केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष फॉर्म भरून काढू शकतात.
किंवा आधारक्रमांकानुसार online काढता येते त्यासाठी आधारकार्डला मोबाईलनंबर लिंक असणे गरजेचे आहे. 
उत्तर लिहिले · 3/6/2022
कर्म · 11785
0
तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी खालील प्रक्रिया करू शकता:

ऑनलाइन प्रक्रिया:

  1. NSDL ई-गव्हर्नन्स वेबसाइटला भेट द्या: NSDL च्या वेबसाइटवर जा.
  2. पॅन डेटा बदलण्याची विनंती: 'Services' सेक्शनमध्ये 'PAN' वर क्लिक करा आणि 'Change/Correction in PAN Data' हा पर्याय निवडा.
  3. अर्ज भरा: सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा. जुना मोबाईल नंबर बदलून नवीन नंबर टाका.
  4. ओळख आणि पत्त्याचा पुरावा: तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील, जसे की आधार कार्ड, पासपोर्ट, किंवा इतर valid documents.
  5. शुल्क भरा: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा नेट बँकिंग वापरून ऑनलाइन पेमेंट करा.
  6. अर्ज सबमिट करा: भरलेला अर्ज सबमिट करा आणि पोचपावती डाउनलोड करा.

ऑफलाइन प्रक्रिया:

  1. अर्ज डाउनलोड करा: NSDL च्या वेबसाइटवरून 'Request for New PAN Card or/and Changes or Correction in PAN Data' अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज भरा: अर्ज व्यवस्थित भरा आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर लिहा.
  3. आवश्यक कागदपत्रे जोडा: ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याची कागदपत्रे (self-attested copies) अर्जासोबत जोडा.
  4. अर्ज सादर करा: NSDL च्या कार्यालयात किंवा TIN-FC (Tax Information Network Facilitation Centre) सेंटरवर अर्ज सादर करा.
  5. शुल्क भरा: डिमांड ड्राफ्ट किंवा इतर माध्यमातून शुल्क भरा.

हे लक्षात ठेवा:

  • अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्या.
  • ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी योग्य कागदपत्रे सादर करा.
  • वेबसाइटवर दिलेले शुल्क भरण्याची खात्री करा.

अधिक माहितीसाठी तुम्ही NSDL च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 180
0
पॅन कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

नवीन मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया:

  1. NSDL च्या वेबसाइटला भेट द्या: https://www. Protean-tinpan. Com/panchange. Html
  2. 'Application Type' मध्ये 'Changes or Correction in existing PAN data / Reprint of PAN Card (No changes in existing PAN data)' हा पर्याय निवडा.
  3. 'Category' मध्ये 'Individual' सिलेक्ट करा.
  4. तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका.
  5. कॅप्चा कोड टाका आणि 'Submit' बटनवर क्लिक करा.
  6. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP वेबसाइटवर टाका.
  7. आता तुम्हाला 'e-KYC & e-Sign' किंवा 'Submit scanned images through e-Sign' हे दोन पर्याय दिसतील.
  8. 'e-KYC & e-Sign' आधार कार्ड आधारित असेल. त्यामुळे तुमच्या आधार कार्डमधील माहिती पॅन कार्डमधील माहितीशी जुळणे आवश्यक आहे.
  9. पुढे तुम्हाला तुमचा पत्ता आणि इतर माहिती विचारली जाईल. ती व्यवस्थित भरा.
  10. शेवटी तुम्हाला पेमेंट करावे लागेल.

ऑफलाइन प्रक्रिया:

जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रिया जमत नसेल, तर तुम्ही UTIITSL किंवा NSDL च्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरून अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

  • तुमच्या आधार कार्डमधील माहिती आणि पॅन कार्डमधील माहिती तंतोतंत जुळली पाहिजे.
  • तुम्ही दिलेला मोबाईल नंबर चालू असावा, कारण त्यावर OTP येतो.
  • पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी काही शुल्क लागू शकतात.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 180
0
  Aadhaar Card ला Pan Card लिंक करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सरकारने अनेक सोपे मार्ग उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना जास्त त्रासाला सामोरे जाण्याची गरज नाही.
  Aadhaar Card- PAN Card Link करण्याची शेवटची तारीख आयकर विभागाने 30 जून 2021 दिलेली आहे, त्यामुळे आता आपणास घाबरायची गरज नाही.
   आजच्या या लेख मध्ये मी आधार कार्ड ला पॅन कार्ड सोबत लिंक कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती देत आहे, तरी सर्वांना विनंती आहे की लेख संपूर्ण वाचा.
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे?
    आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आयकर विभागाने दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिला म्हणजे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आणि दुसरा SMS द्वारे संदेश पाठवून.

    मी खाली दोन्हीही पर्यायाची सविस्तर माहिती दिलेली आहे, जेणेकरून आपण कोणत्याही अडचणी शिवाय आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता.

1) आधार कार्डला पॅन कार्ड ऑनलाईन पध्दतीने लिंक कसे करावे?
   ही प्रक्रिया मी आपणास Steps नुसार सविस्तर खाली सांगितली आहे. यांचा वापर करून आपण सहजपणे Aadhaar-Pan Linking ची प्रक्रिया करू शकता.

Step 1) भारतीय आयकर विभागाच्या Income Tax e- Filling Website वर भेट देऊन Quick Links मधील Link Aadhaar पर्यायावर क्लिक करावे.


Step 2) आपला PAN आणि Aadhaar Number दिलेल्या जागेवर टाइप करावा.

Step 3) आपल्या आधार वर आपले नाव जसे आहे, त्याप्रमाणे दिलेल्या जागेवर लिहावे.

Step 4) जर आपल्या आधार वर फक्त आपली जन्मतारीख असेल तर I Have Only Year of Birth in Aadhaar Card या समोरील बॉक्सवर टिक करावे.

Step 5) आता I Agree to validate My Aadhaar Details with UIDAI या समोरील बॉक्स वर टिक करावे.


Step 6) आता चित्रात दाखवलेला Captcha Code दिलेल्या जागेत अचूक भरावा आणि Link Aadhaar बटण वर क्लिक करावे.

Step 7) जर आपल्याला Captcha Code भरायला अडचण येत असेल तर आपण OTP द्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.


Step 8) सर्व प्रक्रिया झाल्यावर आपणास एक सूचना येईल की Your Aadhaar is Successfully Linked with PAN Card म्हणजे आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक झाले आहे.

2) आधार कार्डला पॅन कार्ड SMS पाठवून लिंक कसे करावे?
    आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावे.

Step 1) SMS द्वारे Linking प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या पद्धतीने एक संदेश लिहायचा आहे.

UIDPAN<Aadhaar Number><PAN>

Step 2) उदा… 

  जर आपला आधार नंबर 1234 5678 4567 असा असेल आणि पॅन ABCDEF321FG असा असेल तर संदेश खालील प्रमाणे-

UIDPAN<123456784567><ABCDEF321FG>

Step 3) संदेश कसा असावा हे आता आपणास कळले आहे, आता हा संदेश 567678 किंवा 56161 या नंबर वर पाठवायचा आहे.

Step 4) संदेश पाठवताना आपण Registered Mobile Number वरून पाठवला आहे, याची खात्री करून घ्यावी.

Aadhaar Card PAN Card Link Status कसे पाहावे?
    आपण वरील सर्व Steps पूर्ण करून linking प्रक्रिया केली आहे, पण हे व्यवस्थितरित्या पूर्ण झाले आहे का नाही हे Check कसे करावे हे मी खाली सांगत आहे.

Step 1) भारतीय आयकर विभागाच्या Income Tax e- Filling Website या साईट ला भेट द्या.

aadhaar pan link procedure
Step 2) आपला पॅन टाका.

Step 3) आपला आधार नंबर टाका.

aadhaar pan link status
Step 4) आता View Aadhaar Link Status या बटण वर क्लिक करा. तुम्हाला Aadhaar-PAN Link Status दाखवले जाईल.
 श्रोत - आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे?
उत्तर लिहिले · 3/4/2021
कर्म · 30
0
होय
उत्तर लिहिले · 20/2/2021
कर्म · 0