औद्योगिक ट्रेनिंग
Iti वायरमन माहिती मिळेल का?
2 उत्तरे
2
answers
Iti वायरमन माहिती मिळेल का?
1
Answer link
वायरमन Wireman
वायरमन कोर्सचा कालावधी दोन वर्षाचा आहे. दहावी पास किंवा नापास विद्यार्थी वायरमनसाठी प्रवेश घेऊ शकतात.वायरमन आणि इलेक्ट्रिसिटी कोर्स बहुसंख्य प्रमाणात सारखाचं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना मोठे केबल, वायरिंगची माहिती दिली जाते. त्याचबरोबर इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा विकवला जातो. विद्यार्थ्यांना विजेता परिचय, विद्युत उपकरणांची वायरींग करण्याचे अद्यावत ज्ञान शिकवले जाते. हा कोर्स झाल्यानंतर उमेदवारांना शासकीय आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात प्रचंड संधी आहे. वीज निर्मिती केंद्र, महावितरण, महापारेषण, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, भेळ इत्यादी महत्वपूर्ण कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. संरक्षण, इस्रो, इंडियन आर्मी इत्यादी विभागात नोकरीची संधी उपलब्ध आहे.