समाजशास्त्र आवाज

आपल्याला कुजबुज कधी ऐकू येते?

1 उत्तर
1 answers

आपल्याला कुजबुज कधी ऐकू येते?

1

'भलतेच तिखट कान आहेत मेल्याचे. आमच्यातल्या आमच्यातली कुजबूजही बरी ऐकू येते याला.' आपापसात सांगोवांगीच्या रसाळ गप्पा आतल्या आवाजात करणाऱ्या साळकाया-म्हाळकाया तिथुन तशा दूरवरच असणाऱ्या एखाद्या तरुणाबद्दल तक्रार करत असतात. ती खरी असो वा खोटी; पण त्या एखाद्याचेच नव्हे, तर आपल्या सगळ्यांचेच कान तसे तिखट असतात. म्हणून तर हलक्या आवाजातले शब्द किंवा सूरही आपल्याला बऱ्यापैकी ऐकू येतात. हे घडतं कसं? त्याला आपल्या कानाची रचनाच जबाबदार आहे. आपल्या कानाच्या आतल्या भागात एक मोठा विचित्र अवयव आहे. बघायला गेलं तर तो दिसतो गोगलगायीच्या अंगावरच्या कवचासारखा. यालाच कॉख्लिआ म्हणतात. वास्तविक हा अवयव म्हणजे एक लांबलचक नळीच आहे. फक्त ती स्वतःभोवतीच गोल गोल फिरत सर्पिलाकार धारण करत निमुळती होत जाते. एका पातळ पापुद्र्यानं या नलिकेचे दोन भाग केलेले असतात. त्यामुळे नलिकेच्या मोठ्या तोंडाशी असलेले केसासारखे धागे जास्त कंपनसंख्येच्या लहरींना दाद देतात, तर छोट्या तोंडाशी असलेले केस कमी कंपनसंख्येच्या लहरींनी उत्तेजित होतात. आजवर असंच वाटत आलं होतं, की हा जो विचित्र घाट या अवयवाला मिळाला आहे तो केवळ अनेक छोटे-छोटे घटक छोट्याशा जागेत दाटीवाटीनं भरता यावेत यासाठीच. पण तसं नाही. तर हा विशिष्ट आकार त्या अवयवाला आवाजाची पट्टी वाढवायला मदत करतो असं दिसून आलं आहे. ध्वनी किंवा आवाज म्हणजे काय? तर हवेची कंपनं. ही कंपनं जेव्हा आपल्या कानाच्या पडद्यावर येऊन आदळतात तेव्हा साहजिकच तो पडदाही तसाच कंप पावू लागतो. त्या पडद्याला जोडल्या गेलेल्या लहान हाडांकडून मग ही कंपनं कॉख्लिआच्या आत असणाऱ्या द्रवपदार्थाकडे पोहोचवली जातात. त्यापायी मग त्या द्रवातही लहरी उसळू लागतात. निरनिराळ्या कंपनसंख्येच्या लहरी त्या सर्पिलाकार आणि निमुळत्या होत जाणाऱ्या नलिकेच्या निरनिराळ्या ठिकाणी आपली उंच पातळी गाठतात. त्यामुळे त्या नलिकेतला समतोल भंग पावतो आणि तो द्रवपदार्थ छोट्या तोंडाकडे ढकलला जातो. साहजिकच तिथे असलेल्या कमी कंपनसंख्येच्या लहरींना दाद देणार्‍या केसांना बळकटी आल्यासारखं होतं आणि तेही कंप पावू लागतात. एखाद्या ध्वनिवर्धकात जशी आवाजाची पातळी वाढवण्याची क्षमता असते, तशीच या कॉख्लिआच्या त्या विशिष्ट आकारामुळे आणि त्यातल्या द्रवपदार्थात उसळणाऱ्या लहरींच्या असमानतेमुळे आवाजाची पातळी वीस डेसिबलने वाढण्यास मदत होते. कुजबूजही मोठ्या आवाजातल्या संभाषणासारखी स्पष्ट ऐकू येते.

उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105

Related Questions

सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?
सामाजिक समस्या व समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते?
सामाजिक समस्या बाबत समाजशास्त्र कशा तव्हेने उपयुक्त ठरते ती तुमच्या शब्दात थोडक्यात स्पष्ट करा?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा?
वसाहत वाद म्हणजे काय?
समाजशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचे शास्त्र असे का म्हटले जाते?