समाजशास्त्र

समाजशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचे शास्त्र असे का म्हटले जाते?

1 उत्तर
1 answers

समाजशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचे शास्त्र असे का म्हटले जाते?

0

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[१] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[२] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रूप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.

व्यवस्थाबद्द ज्ञान समुच्चयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.

नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.

सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.

थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाशी निगडित असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.

शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्शनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.

आदर्श प्रमाणभूत मानून अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नीतिशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे
उत्तर लिहिले · 15/7/2023
कर्म · 48465

Related Questions

सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?
सामाजिक समस्या व समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते?
सामाजिक समस्या बाबत समाजशास्त्र कशा तव्हेने उपयुक्त ठरते ती तुमच्या शब्दात थोडक्यात स्पष्ट करा?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा?
वसाहत वाद म्हणजे काय?
समाजशास्त्र जनक ... यांना मानले जाते?