2 उत्तरे
2
answers
वंजारी समाज एनटीडी (ओबीसी) मध्ये येतो का?
5
Answer link
वंजारी ही महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D म्हणजेच NT-3) मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती-जामाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. महाराष्ट्र राज्या बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा, वंजरी संबोधले जाते. स्व. गणपत पांडुरंग संखे यांच्या महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया मधील प्रदीर्घ लढ्यामुळे वंजारी समाज OBC मधून NT-3 मधे वर्गीकृत केला गेला.
0
Answer link
वंजारी समाज हा महाराष्ट्र शासनाच्या एनटीडी (Nomadic Tribes D) म्हणजेच भटक्या जमाती 'ड' मध्ये येतो. या प्रवर्गाला इतर मागासवर्गीय (OBC) म्हणून देखील गणले जाते.
अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या: