परीक्षा
स्पर्धा परीक्षा
प्रवेश परीक्षा
मला एमपीएससी UPSC परीक्षा द्यायची आहे पण मला भीती आहे. कि जर नापास झालो तर काय होणार ?
2 उत्तरे
2
answers
मला एमपीएससी UPSC परीक्षा द्यायची आहे पण मला भीती आहे. कि जर नापास झालो तर काय होणार ?
4
Answer link
अगदी थोडक्यात सांगतो (एक विद्यार्थी म्हणून) की...
.
.
धन्यवाद..🤗
- तुम्हाला या स्पर्धा परीक्षांची तयारी तर करायची आहे परंतु त्याला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधीच तुम्हाला नापास होण्याची भीती आहे, तर सांगू इच्छितो की तुम्ही आधीच तुम्हाला स्पर्धेतून बाहेर फेकत आहेत/ बाहेर पडत आहेत..
- मान्य आहे की सध्या खूप प्रचंड अशी स्पर्धा आहे या क्षेत्रात (तसं तर सर्वच क्षेत्रात आहे) परंतु त्यासाठी प्रयत्न (इथे अभ्यास, अभ्यासक्रम,प्रश्नपत्रिका समजावून घेणे इत्यादी) करणे महत्त्वाचे आहे..
- & प्रत्यक्ष अधिकारी झाल्यावर यापेक्षा कितीतरी आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यावेळेस असाच negative विचार कराल का की त्या आव्हानांना सोमोरे जाल ?
आणि राहीला प्रश्न नापास होण्याच्या भीतीचा तर त्यासाठी तुमचा Plan-B आत्तापासूनच तयार ठेवावा लागेल. (कारण वास्तवाचे भानही ठेवावे लागेल की लाखो उमेदवारांमधून शेकड्यांमध्ये विद्यार्थी निवडले जातात..त्यामुळे प्रश्नातील भीतीसारखे नकारात्मक विचार बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात साहजिकच येतात.)तरी positive way ने ,आपण अधिकारी होऊ या विश्वासाने अभ्यास करा आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा..
.
.
धन्यवाद..🤗