शेती पिके शेतकरी

वांगी पिकावर अळीसाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

वांगी पिकावर अळीसाठी काय करावे?

2
06/09/2020...

★ बाजारात वांगे खरेदीस गेल्यावर ते निवडूनच घ्यावे लागतात. या फळाच्या बाह्य भागावर एखादा /दुसरा काळा ठिपका दिसतो असे फळ आतूनहमखास किडके निघते. बऱ्याचदा आत अळी सुद्धा आढळते. या प्रकाराने उत्पादन आले तरी अशी फळे फेकून द्यावी लागतात, ग्राहक ती घेत नाही.व्यापारी असा माल कमी भावात मागतात. तसेच शेंडा पोखरून आत गेल्यासझाडाची वाढ खुंटते. ही अळी फिकट गुलाबी रंगाची असते. या अळीचे पतंग झाडाच्या शेंड्यावर, कोवळ्या पानावर, कोवळ्या फळावर चप्पट पांढरी अंडी घालतात. एक मादी २५० पर्यंत अंडी घालते. सात ते पंधरा दिवसात यांचा जीवनक्रम पूर्ण होतो. ही किड वर्षभर सक्रीय असल्याने अनुकूल वातावरण भेटताच प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन एक टक्का आणि ट्रायझोफोस ३५ टक्के इ सी एकत्रित १० लिटर पाण्यात २० मिली मिसळून फवारावे. फवारणी नेहमी फळाचा तोडा झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी करावी.१५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी केल्यास किड नियंत्रणात येते. याशिवाय क्लोरोपायरीफोस, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफोस, फोस्फोमिडॉन, असिफेट आदि औषधे फवारली तरी चालतात. एकच औषध पुन्हा पुन्हा फवारू नये. तसेच पिकात एकरी किमान 50 नग पिवळे/निळे स्टिकी ट्रेप / सापळे लावावे. रात्री उडणारे नर पतंग याला चिटकून मरतात आणि त्यांचे प्रजोत्पादन नियंत्रणात राहते.

★ वांगी अळी नियंत्रन ★

★ सांगली, सातारा, नाशिक, सोलापुर ,नगर या भागात सध्या वांगी या पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, तसेच शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने किडींच्या नियंत्रणासाठी खलील उपाययोजना करावी.

★ 🍆बीजप्रक्रिया
वांगी लागवडीपूर्वी बियाण्यास इमिडॅक्लोप्रिडपाच ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोपे तयार करताना वाफ्यांमध्ये निंबोळी पेंड पाच किलो प्रति वाफा या प्रमाणात वापरावी. जर बीजप्रक्रिया केलेली नसेल, तर वाफ्यात रोपे उगवल्यानंतर दाणेदार फोरेट 20 ग्रॅम प्रति वाफा किंवा डायमेथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा 15 ते 30 दिवसांनंतर रोपे उगवल्यानंतर फवारावे.

★ 🍆लागवडीनंतरचे नियोजन -
- लागवडीनंतर 40-45 दिवसांनी आणि त्यानंतर सात दिवसांच्या अंतराने असे दोन वेळा ट्रायकोग्रामा एक लाख कीटक प्रति हेक्टरी सोडावेत.
*प्रति हेक्टरी ल्युसी ल्युअर असलेले 12 ते 15 कामगंध सापळे उभारावेत. दर 15 दिवसांनी त्यामधील ल्युअर बदलावा. शेतात एकरी 10ते 12 पक्षी थांबे उभारावेत

◆ शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास वेळोवेळी किडलेले शेंडे अळीसह कापून खोल खड्ड्यात गाडावेत.

◆ शेंडे किडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी लागवडीनंतर 45 दिवसांनी करावी.

◆ शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या आळीसाठी शेतात BRINJAL ALI TRAPS सापळे लवावेत.12 nos per acre.

◆ दुसरी फवारणी लागवडीनंतर 60 दिवसांनी बीटी जिवाणू 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.

◆ तिसरी फवारणी 75 दिवसांनीCartap 15 gm + 15 मि.लि. डायक्लोरव्हॉस प्रति 10 लिटर पाण्यातमिसळून फवारणी करावी.

◆ फळे तोडण्याच्या वेळी किडलेली फळे वेगळी करून खोल खड्ड्यात गाडावीत.

◆ चौथी फवारणी लागवडीनंतर 90 दिवसांनी 10 ग्रॅम बीटी जिवाणू किंवा चार मि.लि. स्पिनोसॅड किंवा इमामेकटिन बेनझोऐट 4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.

◆ रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 40 ग्रॅम व्हर्टिसीलियम किंवा पाच मि.लि. इमिडॅक्लोप्रिडप्रति 10 लिटर पाण्यातून किंवा थिओमिथोक्सम 4 ग्राम प्रति 10 लि. पण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे.

◆ $$$पिवळ्या & Blue चिकट सापळ्यांचा उपयोगसुद्धा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो.

सर्व माहिती आपल्या सल्या नुसार करावी
$$$♦टिप- वरील डोस आणि दिवस हे स्टैण्डर्ड दिले आहेत गरजेनुसार व किडीच्या प्रदुर्भावा नुसार वरील किटकनाशकांची फवारणी करावी..🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
उत्तर लिहिले · 6/9/2020
कर्म · 14865
0

वांगी पिकावरील अळी नियंत्रणासाठी उपाय:

  • अळीचा प्रकार ओळखा: प्रथम आपल्या वांगी पिकावर कोणत्या प्रकारची अळी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण त्यानुसार उपाययोजना बदलतात.
  • नियंत्रणाचे उपाय:
    • रासायनिक नियंत्रण:

      रासायनिक कीटकनाशकांचा वापर गरजेनुसार आणि योग्य प्रमाणात करावा. यासाठी आपण chlorantraniliprole (क्लोरँट्रानिलिप्रोल) 18.5% SC @ 150 मिली प्रति हेक्टर किंवा spinosad (स्पिनोसॅड) 45% SC @ 75 मिली प्रति हेक्टर यांसारखी कीटकनाशके वापरू शकता. स्रोत: PACKAGE OF PRACTICES RABI 2022-23 (पृष्ठ क्र. 128)

    • जैविक नियंत्रण:

      Bacillus thuringiensis (बॅसिलस थुरिंगिएन्सिस) या जैविक कीटकनाशकाचा वापर करणे अळ्यांसाठी प्रभावी आहे. स्रोत: Insecticides and weedicides used for various crops

    • एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM):

      एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये (Integrated Pest Management) रासायनिक, जैविक आणि नैसर्गिक पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो. त्यामुळे किडींचे प्रभावी नियंत्रण होते आणि पर्यावरणावर कमी परिणाम होतो.

    • साफसफाई:

      शेतातून किडलेली फळे आणि पाने नियमितपणे काढून टाकावीत, जेणेकरून किडींचा प्रसार कमी होईल.

  • शेती तज्ञांचा सल्ला:

    आपल्या क्षेत्रातील कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाययोजना करा.


उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 840

Related Questions

सहकारी कारखाने गरीब, कष्टकरी, परिश्रम करणाऱ्या वर्गाची कामधेनू आहे आणि म्हणूनच शेतकरी सभासदांची जाणीव, नेणीव, उणीवांची दखल घेणे आवश्यक आहे ही भावना नोंद घेण्यास योग्य आहे का?
शेतकरी ई-केवायसी (e-KYC) कसे करावे?
शेतकरी पुरावा नसताना शेती खरेदी करू शकतो का?
स्वातंत्र्य काळातील शेतकरी चळवळी विषयी माहिती?
इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे शेतकरी वर्ग शेतकऱ्यांच्या कोणत्या स्थितीत दबलेला होता?
शेतकरी कामगार पक्षाचा पंधरा कलमी कार्यक्रम कोणता?
शेतकरी कामगार पक्षाच्या 15 कलमी कार्यक्रमात कोणत्या बाबींवर भर दिला होता?