सोशिअल मीडिया चीन टिकटॉक

टिकटाॅकवर बंदी घालून काय होईल?

1 उत्तर
1 answers

टिकटाॅकवर बंदी घालून काय होईल?

3
तातडीचे उपाय आणि राष्ट्रीय सुरक्षा अशी कारणं देत भारत सरकारनं या 59 अॅप्सवर बंदी आणलीय.
माहिती व प्रसारण मंत्रालयानं आपल्या पत्रकात म्हटलंय की, "आमच्याकडे अनेकांकडून या अॅप्सबाबत तक्रारी आल्या होत्या. अँड्रॉईड आणि आयओएसवर हे अॅप्स लोकांच्या वैयक्तिक माहितीशी छेडछाड करत होते. या अॅप्सवर बंदी आणल्यानं भारतातील मोबाईल आणि इंटरनेट युजर्स अधिक सुरक्षित होतील. भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व यासाठी हे गरजेचं आहे."
भारत सरकारनं आपल्या पत्रकात कुठेही 'चिनी वस्तू' असा शब्द वापरला नाहीय. ही बंदी कशी लागू केली जाईल, याचीही कुठे उल्लेख नाही.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/
*❍  फेसबुक पेज अवश्य लाइक करा  ❍*
----------------------------------------
🇦 अनेकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये अॅप आहे आणि ते सध्या त्याचा वापर करू शकत आहे. मग नेमकी बंदी कशावर आहे?
तज्ञ म्हणतात की "या बंदीनंतर तुम्ही अॅप नव्याने इन्स्टॉल करू शकत नाहीत. पण सध्या तुमच्याजवळ अॅप असेल तर ते चालू शकतं.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
"पुढे ते चालू द्यायचं की नाही, अपग्रेड होऊ द्यायचं की नाही याचा निर्णय सरकारच घेईल आणि तेव्हाच या अॅपचा वापर करता येईल की नाही हे स्पष्ट होईल,"🇦
"अलिबाबा आणि टेंनसेंट चीनच्या डिजिटल सिल्क रुटचे भाग आहेत. या बंदीमुळे या अॅप्सचे रेटिंग कमी होईल आणि त्याचा परिणाम प्रमोटर्सवरही पडेल. आता टिक टॉकचं IPO सुद्धा येणार आहे. भारतात टिक टॉकचे 30 टक्के युजर्स आहेत."🇦
भारत सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "केंद्रीय गृहमंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटरनं घातक अॅप्सवर बंदीची शिफारस केली होती."
आता चिनी अॅप्सची कमतरता भारतीय अॅप्स भरून काढतात की अमेरिकन अॅप्स हे पाहावं लागेल.


               *✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺*
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍_*
*_❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍_*
-------------------------------------------

Related Questions

चीन व राशियां यांच्यातील सिमरेशेला काय मनतात?
चीन व रशिया यांच्यातील राजकीय सीमा रेषेला काय म्हणतात?
चीन व रशिया यांच्यातील राजकीय सिमरेषेला के म्हणतात?
एका रांगेत चीनच्या पुढे 19 जण आहेत तर त्यामागे 14 जण उभे आहेत तर त्या रांगेत?
चीन व रशिया यांच्यातील राजकीय सीमेला काय म्हणतात?
चीन व रशिया यातील राजकीय सीमा रेषेला काय म्हणतात?
चीन व रशिया यांच्यातील राजकीय सीमारेषेला काय म्हणतात?