इंग्रजी भाषा
इंग्रजी वाक्यरचना
इंग्रजीचे मराठीत भाषांतर
मला इंग्लिश लवकर शिकायची आहे, अगदी थोडं तरी बोलता यायला हवं, तर मी ते कसं शिकू?
2 उत्तरे
2
answers
मला इंग्लिश लवकर शिकायची आहे, अगदी थोडं तरी बोलता यायला हवं, तर मी ते कसं शिकू?
11
Answer link
कमी वेळ म्हणजे किती?
रोज किती वेळ शिकायची तयारी आहे तुमची?
एवढी घाई कशा साठी?
कमी वेळेत सुमार दर्जाची शिकतां येईल, चालेल का?
प्रश्न वाचून एकदम पटकन उत्तर आले कि कुणी उत्तम इंग्रजी जाणकारांना मदतनीस म्हणून ठेवा… झटपट उपाय, तुम्ही कांहीही कष्ट न करता.
अहो, भाषा आहे, ऐकावी, वाचावी, अभ्यासावी… गणित नाही हो… प्रेम असेल तरच आत्मसात होते ती भाषा!
रोज सवय लावा साधारण १५-२० मिनिटे इंग्रजी पुस्तकं हाताळायची, वेळ वाढवत रहा, गोडी वाढेल. शब्दकोश हाताशी ठेवा - शब्द समजले कि वाक्य समजेल, लेखकाचे मन समजेल. आधी साधी सोपी इंग्रजी पुस्तक वाचायला घ्या किंवा मासिक… वाचन वाढवत असतांना, यूट्यूब वर गाणी एकायला सुरू करा, चित्रपट बघा. संभाषणास सुरूवात करा, चुका होतील, प्रयत्न सोडू नका.
चांगली जुनी इंग्रजी गाणी ऐका.
चांगली इंग्रजी पुस्तके वाचा.
वर्तमानपत्र वाचा.
आपली शब्दसंपत्ती वाढवा.
इंग्रजी लिहिण्याचा व बोलण्याचा सराव करा.
व्याकरणाचा अभ्यास करा.
इंग्रजी कोरा वरची उत्तरे वाचा.
शक्य असल्यास एखादा चांगला शिक्षक निवडा.
शिकण्याची मुळीच घाई करू नका. स्वतःला किमान १ वर्ष वेळ द्या.
पुढील वाटचालीस शुभेच्छा

0
Answer link
इंग्रजी लवकर शिकण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता:
1. मूलभूत गोष्टी शिका:
- अल्फाबेट (Alphabet) आणि उच्चार (Pronunciation) शिका.
- सामान्य शब्द (Common words) आणि वाक्ये (Sentences) शिका.
- ग्रामरचे (Grammar) नियम शिका.
2. इंग्रजीमध्ये वाचा आणि ऐका:
- सोपी पुस्तके आणि लेख वाचा.
- इंग्रजी गाणी ऐका आणि चित्रपट/कार्यक्रम (movies/shows) पाहा.
- YouTube वर शैक्षणिक व्हिडिओ (educational videos) पाहा.
3. बोलायला सुरुवात करा:
- इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तींबरोबर बोला.
- मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर इंग्रजीमध्ये संवाद साधा.
- Online language exchange partners शोधा.
4. ॲप्स आणि वेबसाईटचा वापर करा:
- Duolingo, Babbel, Hello English यांसारख्या ॲप्सचा वापर करा.
- BBC Learning English सारख्या वेबसाईटचा वापर करा.
5. नियमित सराव करा:
- दररोज थोडा वेळ इंग्रजीचा सराव करा.
- शब्द आणि वाक्ये लक्षात ठेवा.
- चूक झाली तरी प्रयत्न करत राहा.
टीप: सातत्य आणि नियमित प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे, प्रयत्न करत राहा आणि लवकरच तुम्हाला इंग्रजी बोलता येईल.