गुंतवणूक म्युच्युअल फंड

सध्याच्या परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी का?

2 उत्तरे
2 answers

सध्याच्या परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी का?

0
उत्तम परतावा देणारी गुंतवणूक
म्युच्युअल फंडांच्या योजनांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. ज्या वेळी म्युच्युअल फंडाने ६५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिकची गुंतवणूक शेअर्स या प्रकारामध्ये केलेली असते, त्यांना इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणतात, तर इतर म्युच्युअल फंडास नॉनइक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणतात. पहिल्या प्रकारात जोखीम जास्त, तर दुसऱ्या प्रकारात कमी असते व म्हणून परतावाही त्याप्रमाणे जास्त वा कमी असतो. सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या प्रकारांपैकी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमयुक्त असली तरी गेली काही वर्षे परंपरागत मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याच्या मानाने उत्तम परतावा देणारी ठरलेली आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

म्युच्युअल फंडातील सर्वसामान्य व्यक्तींचा सहभाग वाढावा म्हणून कलम ८० सी अंतर्गत सवलत देणाऱ्या इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) योजना उपलब्ध असतात. या योजनेत होणारी गुंतवणूक दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट होण्यासाठी पात्र आहे. मुदत ठेवींवर मिळणारे व्याज करदाता ज्या प्राप्तिकर उत्पन्नाच्या कर देयतेच्या गटवारीत असेल, त्यानुसार त्याला प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु म्युच्युअल फंडावरील लाभांशास हा नियम लागू होत नाही. कारण हा लाभांश पूर्णतः करमुक्त आहे, ही जमेची बाजू. याखेरीज मूळ मुद्दलाची देखील वाढ होऊ शकते, हा वाढीव फायदा.

अर्थव्यवस्था गतिमान राहण्यासाठी तीन टक्‍क्‍यांपर्यंत भाववाढ असणे सुदृढतेचे लक्षण मानले जाते. परंतु, भाववाढीमुळे चलनाची क्रयशक्ती कमी होते, हा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणून ती भरून काढण्यासाठी या भांडवलवृद्धीचा फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. या खेरीज भांडवलवृद्धी पैशात रूपांतरित केल्यास होणारा अल्पकालीन भांडवली नफा पंधरा टक्के दराने किंवा एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांवरील दीर्घकालीन भांडवली नफा दहा टक्के दरने करपात्र होतो. याचा अर्थ यातील एक लाख रुपयांचा दीर्घकालीन भांडवली नफा आजही करमुक्त आहे, हे बऱ्याच गुंतवणूकदारांच्या ध्यानात येत नाही.

‘एसआयपी’ गुंतवणूक फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, किमान पाच- सहा वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असा अनुभव आहे. केवळ एक- दोन वर्षांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावयाची असल्यास प्रथम जोखीम लक्षात घ्यावी. म्युच्युअल फंडात एकरकमी, तसेच दरमहा टप्प्याटप्प्याने (एसआयपी) गुंतवणूक करता येते. बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेत, दीर्घकाळात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने गुंतवणूक करणे हिताचे ठरते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे.

काय आहेत फायदे?
    दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर
    महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता
    बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेण्यासाठी ‘एसआयपी’ उपयुक्त
    उद्दिष्टपूर्तीसाठी गुंतवणुकीचे उत्तम साधन
    तरलता, पारदर्शकता या वैशिष्ट्यांमुळे चांगली गुंतवणूक आहे.🙏
उत्तर लिहिले · 3/4/2020
कर्म · 3350
0

सध्याच्या परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची की नाही, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची आर्थिक उद्दिष्ट्ये, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोन. तरीही, काही सामान्य मुद्दे आहेत जे तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकतात:

सकारात्मक बाजू:

  • एसआयपी (SIP) चा फायदा: बाजारात सतत चढ-उतार होत असतात. अशा स्थितीत, एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. जेव्हा बाजार खाली असतो, तेव्हा जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वर असतो, तेव्हा कमी युनिट्स मिळतात. यामुळे दीर्घकाळात सरासरी खर्च कमी होतो.
  • दीर्घकालीन उद्दिष्ट्ये: जर तुमची गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असेल (उदाहरणार्थ, ५ वर्षे किंवा त्याहून अधिक), तर म्युच्युअल फंड एक चांगला पर्याय असू शकतो. दीर्घकाळात बाजार वाढण्याची शक्यता जास्त असते.
  • विविधता: म्युच्युअल फंड विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे जोखीम कमी होते.

नकारात्मक बाजू:

  • बाजारातील अस्थिरता: सध्या बाजार अस्थिर आहे. त्यामुळे अल्प कालावधीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
  • महागाईचा धोका: महागाई वाढल्यास तुमच्या गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • गुंतवणुकीतील जोखीम: म्युच्युअल फंडात बाजार जोखमी असतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वीscheme information document (SID) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

काय करावे?

  • तज्ञांचा सल्ला: गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील.
  • संशोधन: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी विविध योजनांची तुलना करा आणि तुमच्यासाठी योग्य योजना निवडा.
  • एसआयपी (SIP): एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी एसआयपीच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करा.

Disclaimer: मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे आणि हा कोणताही आर्थिक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 740

Related Questions

म्युच्युअल फंडची सविस्तर माहिती द्या?
Groww ॲप हे सुरक्षित आहे का? त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते का? की फक्त म्युच्युअल फंडाकरिता आहे हे ॲप? आणि ह्या ॲपचे काही धोके आहेत का?
मी घरबसल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो का? आणि कसे?
म्युच्युअल फंड कोर्स आहे का?
म्युच्युअल फंडमधील NAV बद्दल माहिती सांगा?
पेटीएम म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्टमेंट करावी का?
आपण Groww ॲपद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो का?