Topic icon

म्युच्युअल फंड

0
म्युच्युअल फंड (Mutual Fund) एक प्रकारची गुंतवणूक आहे. अनेक गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात. हे पैसे शेअर्स, बाँड्स (Bonds) आणि इतर सिक्युरिटीजमध्ये (Securities) गुंतवले जातात. म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन व्यावसायिक फंड व्यवस्थापक करतात, ज्यांच्याकडे गुंतवणूक आणि बाजाराचा अनुभव असतो.
म्युच्युअल फंडचे फायदे
  • विविधता (Diversification): म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने धोका कमी होतो, कारण पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेले असतात.
  • व्यावसायिक व्यवस्थापन (Professional Management): फंड व्यवस्थापक गुंतवणुकीवर लक्ष ठेवतात आणि योग्य निर्णय घेतात.
  • लिक्विडिटी (Liquidity): गरज पडल्यास तुम्ही कधीही युनिट्स विकून पैसे काढू शकता.
  • पारदर्शकता (Transparency): म्युच्युअल फंड नियमितपणे त्यांच्या गुंतवणुकीची माहिती गुंतवणूकदारांना देतात.
म्युच्युअल फंडचे प्रकार
  • इक्विटी फंड (Equity Fund): हे फंड प्रामुख्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. यात जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते, पण धोकाही अधिक असतो.
  • डेब्ट फंड (Debt Fund): हे फंड सरकारी बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करतात. हे तुलनेने सुरक्षित असतात, पण परतावा कमी असतो.
  • हायब्रीड फंड (Hybrid Fund): हे फंड इक्विटी आणि डेब्ट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे धोका आणि परतावा moderate असतो.
  • मनी मार्केट फंड (Money Market Fund): हे फंड अल्प मुदतीच्या गुंतवणुकीत (short term investments) पैसे गुंतवतात आणि ते अत्यंत सुरक्षित मानले जातात.
गुंतवणूक कशी करावी?
  1. म्युच्युअल फंड योजना निवडा: तुमच्या गरजेनुसार आणि धोक्याची तयारीनुसार योग्य योजना निवडा.
  2. अर्ज करा: तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
  3. केवायसी (KYC) पूर्ण करा: ‘नो युवर कस्टमर’ (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
  4. गुंतवणूक सुरू करा: तुम्ही एकरकमी (lump sum) किंवा एसआयपी (SIP) द्वारे गुंतवणूक करू शकता.
एसआयपी (SIP) म्हणजे काय?

एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). यात तुम्ही नियमित अंतराने (monthly/quarterly) ठराविक रक्कम गुंतवता. एसआयपीमुळे बाजारातील चढ-उतारांचा जास्त परिणाम होत नाही, कारण तुम्ही वेगवेगळ्या वेळी युनिट्स खरेदी करता.

निष्कर्ष

म्युच्युअल फंड एक चांगली गुंतवणूक आहे, पण गुंतवणूक करण्यापूर्वीscheme documents काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त वेबसाईट्स:
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 720
0

Groww ॲप सुरक्षित आहे आणि या ॲपद्वारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. हे ॲप म्युच्युअल फंड तसेच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Groww ॲपचे फायदे:

  • वापरण्यास सोपे (Easy to use)
  • शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा पर्याय
  • Demat खाते उघडण्याची सोय
  • कमी ब्रोकरेज शुल्क

Groww ॲपचे धोके:

  • शेअर बाजारात गुंतवणुकीत नेहमी धोके असतात. बाजार अस्थिर असल्यास नुकसान होऊ शकते.
  • Groww ॲप हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे तांत्रिक समस्या येऊ शकतात.
  • तुमच्या खात्याची माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

टीप: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, बाजाराची माहिती असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही Groww ॲपच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: Groww

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 720
10
म्युच्युअल फंड म्हणजे काय ?
११ मित्र होते, त्यांना भाड्याने घर घ्यायचे होते. त्यांनी मिळून एक माणूस नेमला. त्या माणसाचे नाव आपण MF पकडू. MF चे काम आहे की तो सर्वांसाठी घर शोधेल. घरमालकाशी, बोलणी करेल, भाडं पण तोच ठरवेल. ११ मित्रांकडून दरमहा भाडं जमा करेल. घरमालकांना ते घरभाड नेऊन देईल.

इथे MF थोड्या फी मध्ये, सर्व लोकांची सारखी असलेली समस्या सोडवत आहे. त्यामुळे त्या ११ मित्रांना आता घर शोधण्याची चिंता राहिली नाही. ते आपल्या कामावर लक्ष देऊ शकत होते.

MF = MUTUAL FUND

तसंच काहीसे म्युच्युअल फंड मध्ये आहे. म्युच्युअल फंड ही सर्वांची एक समस्या सोडवतो, ती म्हणजे “गुंतवणूक कुठे करावी ?” इथे जसे ११ मित्र मिळून एकत्र आले. तसेच म्युच्युअल फंड मधे होते. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कडे येतात.

काही गुंतवणूकदारांना पैसे काही दिवसांकरिता गुंतवायचे असतात, काहींना काही महिने, काहींना काही वर्ष आणि काहींना तर अनेक दशके. मग गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजांनुसार म्युच्युअल फंडमध्ये योजना दिल्या जातात. लोक आपले पैसे म्युच्युअल फंडकडे देतात, मग म्युच्युअल फंड ठरवतात की पैसे कुठे गुंतवायचे. याबदल्यात ते काही फी घेतात.

सोप्या भाषेत, जे काम तुम्हाला करायला जमत नाही, ज्यात तुम्हाला अनुभव नाही, ज्या कामाचे तुम्ही तज्ञ नाही, ते काम दुसऱ्याला करायला देणे. उदाहरण डॉक्टर, ड्रायवर, आचारी आणि म्युच्युअल फंड. गुंतवणुकीचे तुम्ही तज्ञ नसल्यामुळे आणि तुम्हाला याचा अनुभव नसल्यामुळे, हे काम आपण अशा संस्थेला सोपवणे, जी हेच काम इतर लोकांसाठी पण करते. तर अशी संस्था आहे म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड चे फायदे कोणते ?
तज्ञ
तज्ञ म्हणजे असा व्यक्ती ज्याला एखाद्या क्षेत्राचे ज्ञान आहे किंवा एखाद्या क्षेत्रात लागणारे कौशल्य त्यात आहे.
म्युच्युअल फंड मध्ये तज्ञ व्यक्तीची फंड मॅनेजर म्हणून निवड करण्यात येते. अशा व्यक्तींना सहसा १५-२० वर्ष गुंतवणूक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असतो. फंड मॅनेजर हे पूर्ण वेळ याच क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांना या क्षेत्राबद्दल चांगले ज्ञान असते.

सामान्य माणसाला आपला नोकरी-धंदा करून, कुठे ? किती ? गुंतवणूक करावी आणि कधी विकावी ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे कठीण जाते. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून आपले काम करून घेणे सहसा फायदेशीर ठरते.

तुम्ही कधी वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय का ? तुम्ही म्हणणार मला वजन कमी करायला डायटीशिअन ची गरज नाही, मला जिम मध्ये बॉडी बनवायला कोच ची गरज नाही. २-३ वर्ष जातात, तरी आपले वजन काही कमी होत नाही वा आपली बॉडी काही बनत नाही.

काही लोक नक्कीच तज्ञाविना हे काम करू शकतात. पण त्यांना हे काम तज्ञांएवढं चांगलं करायचं असेल, तर त्यांना स्वतःलाच तज्ञ बनाव लागतं. आपण सर्व गोष्टीचे तज्ञ बनू शकतो का ? आपल्याकडे तेवढा वेळ आहे का ?

म्युच्युअल फंड मधे एक तज्ञ – ज्याला या कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तो तुमची गुंतवणूक सांभाळतो. तज्ञाच्या सल्ल्याचा फायदा कसा होतो हे आपण खालील video मध्ये पाहू शकतो.



Diversification (वैविध्यपुर्णता)
म्युच्युअल फंडमध्ये, गुंतवणूक हि अनेक जागी केल्या जाते, म्हणून गुंतवणूक हि वैविध्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉट मधे आहे, फक्त सोन्यातच आहे किंवा फक्त तुमच्या व्यवसायात आहे. अशा वेळेस, तुमच्या गुंतवणुकीवर काही संकट आले तर फार नुकसान होईल. याउलट जर तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल आणि एका गुंतवणुकीवर संकट आले, तर तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेलं नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते.

Liquidity (तरलता)
म्हणजे किती सहजपणे तुम्ही गुंतवणूक विकू शकता. तरलतेबद्दल सविस्तर माहिती आपण गुंतवणुकीचे प्रकार या लेखात पाहिली आहे. समजा तुमची गुंतवणूक घर किंवा जमीन मध्ये आहे आणि तुमच्यावर काही संकट आल्यामुळे तुम्हाला थोड्या मोठ्या रक्कमेची गरज आहे. अशा वेळी पटकन घर विकून रक्कम मिळवणे हे सोपे काम नाही. पण म्युच्युअल फंड मध्ये हे काम फारच सोपे आहे. साधारणतः ४-५ दिवसात तुम्हाला तुमची रक्कम परत मिळते. काही म्युच्युअल फंड च्या योजना मध्ये तर तुमची रक्कम लगेच IMPS द्वारे तुमच्या खात्यात जमा होते.

परतावा
तज्ञ आपली गुंतवणूक सांभाळत असल्यामुळे परतावा चांगला मिळतो. तसेच म्युच्युअल फंडद्वारे तुम्हाला इतर व्यवसायात, बॉण्ड मध्ये गुंतवण्याची संधी मिळते, जिथे परतावा जास्त मिळू शकतो. म्युच्युअल फंड च्या काही योजनांमध्ये तर २० वर्षात १०० पट परतावा मिळाला आहे. म्हणजेच १ लाख गुंतवलेले २० वर्षात १ करोड झाले आहेत. परतावा बद्दल सविस्तर माहिती आपण पुढील येणाऱ्या काही लेखात पाहू.

व्यवसाय न करता व्यवसायाचे मालक व्हा.
म्युच्युअल फंड चा सर्वात मोठा फायदा हा की, व्यवसाय न करता व्यवसायाचे मालक व्हा. TATA, MARUTI, RELIANCE, GODREJ, HUL यासारख्या इतर कंपनीचे तुम्ही अप्रत्यक्षपणे मालक होऊ शकता. तुमचे पैसे म्युच्युअल फंड यांसारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे या कंपणींना होणारा फायदा हा तुमचा फायदा होतो. आपल्या देशातील कंपनी आता विदेशात माल विकू लागल्या आहेत. भारतातील औषधी अमेरिकेत विकल्या जातात. भारतातील कंपनी युरोप आफ्रिकेत गाड्या विकतात. भारतातील बासमती तांदूळ पूर्ण जगात जातो. आपल्या देशातील कंपनी ह्या प्रगती करत आहे. त्यांच्या प्रगतीमध्ये सहभागी होवून आपण आपली संपत्ती वाढवू शकतो.

भारतीय कंपनींचे भविष्य चांगले का असू शकते ?
भारत हा युवकांचा देश आहे. भारताची ६५% लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. तरुण लोक म्हणजे देशाची काम करणारी जनता. एवढे लोक तरुण आहेत, म्हणजे देशात काम करणाऱ्यांची कमी नाही. हे लोक काम करतील, जास्त कमावतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता कंपनी आणखी उत्पादन करतील. तरुण लोकसंख्या असल्यामुळे हि जनसंख्या फक्त बसून खाणारी नसेल तर काम करणारी असेल. भारत जवान होत असताना इतर देश म्हातारे होत असतील. २०२० मध्ये भारतीय जनसंख्येच वय २९ वर्ष असेल. त्याचवेळी चीन चे ३७ आणि जपान चे ४८ असेल. यावरून आपल्याला असे दिसून येते भविष्यात इतर देशांपेक्षा आपल्या देशात युवा जास्त असल्यामुळे आपल देश ताकतवर असेल आणि प्रगती करेल. या प्रगती मध्ये अनेक कंपनी फार मोठ्या होतील. फार पैसा बनवतील. या देशाच्या प्रगतीमध्ये आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून सहभागी होवू शकतो.

म्युच्युअल फंड सुरक्षित आहे का ?
SEBI हि सरकारी संस्था म्युच्युअल फंड च्या कामकाजावर लक्ष्य ठेवते. पण कोठे गुंतवणूक करावी ? हे म्युच्युअल फंड स्वतःच ठरवतात. SEBI जरी लक्ष्य ठेवत असेल, तरी किती परतावा मिळेल ? हे SEBI ठरवत नाही. SEBI चे काम म्युच्युअल फंड पारदर्शकरित्या काम होत आहे का नाही हे पाहणे आहे. त्यासाठी SEBI वेळोवेळी दिशानिर्देश देते. गुंतवणूकदारांच्या हिताच रक्षण करण्याच काम SEBI करते. TELECOM क्षेत्रात जसे TRAI, विमा क्षेत्रात IRDA, बँक क्षेत्रात जसे RBI तसेच काहीसे काम SEBI म्युच्युअल फंड क्षेत्रात करते. SEBI कडून परवानगी मिळाल्यावरच म्युच्युअल फंड आपला व्यवसाय सुरु करू शकतात. म्युच्युअल फंड च्या Trustee ची नेमणूक SEBI च्या परवानगीने होते.

म्युच्युअल फंड चे प्रकार
म्युच्युअल फंड धोक्याच्या पातळी नुसार

१. Open Ended Funds- असे फंड ज्यात जुने गुंतवणूकदार कधीपण विकून जाऊ शकतात आणि नवीन गुंतवणूकदार कधीपण सहभागी होवू शकतात.

2. Closed Ended Funds – ह्या म्युच्युअल फंड ला एक ठराविक गुंतवणुकीचा कालावधी असतो. NFO ( New Fund Offer) दरम्यानच गुंतवणूकदार यात सहभागी होवू शकतो. हा फंड stock exchange खरेदी विक्री साठी उपलब्ध असतो. वेळेआधी जर हा फंड विकायचा असल्यास तो तुम्हाला stock exchange वर विकावा लागतो. सामन्या व्यक्तीने, open ended फंड घेणे सोपे पडते.

आता म्युच्युअल फंड चे आणखी एक प्रकारच वर्गीकरण पाहू.

Debt– असे म्युच्युअल फंड जे बॉण्ड, कोषागार बिले (treasury bills) मध्ये गुंतवणूक करतात. आता बॉण्ड सरकारी किंवा खाजगी कंपनीचे असू शकतात, ते त्या योजनेवर अवलंबून असते.
Equity- Equity म्हणजे कुठल्या व्यवसायाचा भागीदार होणे, सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर त्या व्यवसायाचा आपण पण एक मालक होणे. म्हणजे जेव्हा म्युच्युअल फंड हे Equity मध्ये पैसे लावतात, ते कुठल्या तरी व्यवसायाचे भागीदार होतात. यात धोका जास्त आहे, कारण यात आपल्याला ठराविक रक्कम मिळत नाही. तर आपल्याला मिळणारी रक्कम हि त्या व्यवसायाच्या कामगिरीवर अवलंबून असते. कोणत्या व्यवसायात पैसे लावावे, कधी ते काढून घ्यावे, याचा विचार करणे आपले काम नाही. हे सर्व निर्णय म्युच्युअल फंड घेणार.
Hybrid- असा म्युच्युअल फंड जो Equity आणि Debt दोन्ही मध्ये गुंतवणूक करतो.
Debt Fund चे प्रकार
अनेक लोक या फंडस् कडे हीन भावनेने पाहतात. असे म्हणतात, ” हे फंड काही कामाचे नाहीत. आम्हाला पटकन श्रीमंत बनायचे आहे. आम्हाला हे फंड नका देऊ. जास्त रिस्क वाले फंड द्या. ” बहुतांश लोकांचे ह्या फंडस् बद्दल असे मत आहे.

मी माझ्या मित्राचा किस्सा इथे सांगतो.माझा मित्र पण ” दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे “, असे नेहमी बोलायचा. डेट फंड असणे आवश्यक आहे, याकडे दुर्लक्ष्य करायचा.

मार्केट पडले, त्याच्या जीवनात काही अनपेक्षित घटना घडल्या. आता त्याला पैशांची गरज होती. मार्केट पडले असल्यामुळे आता पैसे काढले तर नुकसान होणार होतं.

पण या मित्राकडे जर डेट फंड असता, तर त्या फंड मध्ये नुकसान झाले नसते आणि समजा झालेच असते तर कमी झाले असते. डेट फंड मध्ये कमी धोका आणि कमी परतावा असतो. हे फंड, मार्केट पडले तर लघुअवधी मध्ये आपत्कालीन निधी म्हणून आपण वापरू शकतो.

Warren Buffett यांनी म्हटलेच आहे.
नियम क्र.१- कधीच पैसा गमवू नका
नियम क्र. २- कधीच पहिला नियम विसरू नका.

म्युच्युअल फंड

Source

MIP

असा फंड जो Equity मध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करतो

३ वर्षापेक्षा जास्त, मध्यम ते जास्त धोका

३ वर्षापेक्षा कमी काळ अतिशय जास्त धोका

Gilt –

सरकारी कोषागार बिले आणि बॉण्ड मध्ये गुंतवणूक करतो. यात सरकार हमी घेत असल्यामुळे पैसे पैसे पूर्णपणे सुरक्षित.

३ वर्षापेक्षा जास्त, मध्यम ते जास्त धोका

३ वर्षापेक्षा कमी काळ अतिशय जास्त धोका

Long Term Bond –

३ वर्षापेक्षा जास्त, मध्यम ते जास्त धोका

३ वर्षापेक्षा कमी काळ अतिशय जास्त धोका

Corporate Bond –

सरकारी कंपनी किंवा खाजगी कंपनी च्या बॉण्ड मध्ये

१-३ वर्ष मध्यम धोका

१ वर्ष पेक्षा कमी अतिशय जास्त धोका

Short Term Debt Funds –

कमी धोका ६ महिने ते ३ वर्ष

Ultra Short Term Debt Funds –

कमी धोका १-९ महिने गुंतवणुकीसाठी

Liquid –

अशा जागी गुंतवणूक जिथे फार जास्त तरलता आहे. कमी परतावा पण जास्त तरलता.

१ महिनापेक्षा कमी काळ गुंतवणुकीसाठी

टिप – एक गोष्ट इथे लक्ष्यात घ्या, वर जी तुलना केली आहे ती Debt Fund मधे केली आहे, अतिशय धोका म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या Debt Fund पेक्षा, Equity Fund पेक्षा नाही. सर्व Fund ची तुलना करता कोणता Fund किती धोकादायक आहे ते आपण तक्ता करा. १ पहिलेच आहे.

Equity Fund चे प्रकार
Sector Funds – एकाच क्षेत्रात असलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक, जसे Bank, Automobile, Pharma, IT. हा Fund सर्वात जास्त धोकादायक आहे, कारण यात आपली गुंतवणूक एकाच क्षेत्रात असलेल्या कंपनीमध्ये होते.

Small Cap Funds –

लहान कंपनी जिथे अतिशय जास्त परतावा मिळू शकतो, जास्त धोका Mid Cap Funds पेक्षा.

Mid Cap Funds –

अशा मध्यम कंपनी जिथे जास्त वाढ आणि जास्त परतावा अपेक्षित आहे. जास्त धोका Large Cap Funds पेक्षा.

Large Cap Funds –

मोठ्या कंपनी ज्यांचा परतावा आणि कामगिरी जास्त स्थिर असते.

Diversified Equity Fund –

लहान, मोठ्या, विविध क्षेत्रातल्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली जाते, त्यामुळे धोका कमी होतो.

Hybrid Fund चे प्रकार
Debt-Oriented Hybrid Funds –

असा fund ज्यात Equity मध्ये कमी आणि Debt मध्ये जास्त गुंतवणूक आहे.

Equity-Oriented Hybrid funds –

असा fund ज्यात Equity मध्ये जास्त आणि Debt मध्ये कमी गुंतवणूक आहे.

Riskometer
प्रत्येक म्युच्युअल फंड च्या माहितीच्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला हि आकृती दिसून येईल. तुम्ही गुंतवत असलेल्या रक्कमेसाठी किती धोका आहे, हे या आकृतीमध्ये दाखवले असते. यात ५ भाग आहेत. १.कमी धोका २. थोडा जास्त धोका ३. मध्यम धोका ४. मध्यम पेक्षा जास्त धोका. ५. सर्वात जास्त धोका. यानुसार गुंतवणूक करताना तुम्हाला सोपे जाईल, योजनेचा धोका जाणून घ्यायला.



म्युच्युअल फंड कसा घ्यायचा ?
म्युच्युअल फंड आपण २ प्रकारे घेऊ शकतो

Direct
Regular
Direct – म्हणजे आपण म्युच्युअल फंड कंपनीकडे सरळ गेलो, कोणीही मध्ये दुवा नसताना.

Regular – म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड कोणाच्या मार्फत विकत घेता.

म्युच्युअल फंड Direct घ्यावा कि Regular ?
Direct घेतला तर तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. इथे ‘ मिळू शकतो ‘, असे म्हटले आहे, कारण तुमचे निर्णय बरोबर असणे त्यासाठी आवश्यक आहे.

सल्लागाराचे सर्व काम तुम्हाला करावे लागेल, तेही बरोबर. कोणता फंड घ्यावा ? किती पैसे लावावे ? किती काळ लावावे ? सर्व फॉर्म स्वतः भरणे, म्युच्युअल फंड त्याच्या अपेक्षेनुसार काम करतोय का नाही ? हे वेळोवेळी तपासणे, म्युच्युअल फंड क्षेत्रातील येणाऱ्या नवनवीन योजना, नियमांबद्दल वेळोवेळी जागृत राहणे.

योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास आपण चुकीच्या प्लॅन मध्ये पैसे लावू शकतो किंवा चुकीच्या वेळी, चुकीच्या प्लॅन मधून रक्कम काढू शकतो. मार्केट मध्ये येणाऱ्या चढ उतारांमुळे चुकीचे निर्णय घेऊ शकतो. अशा वेळी सल्लागार तुम्हाला भावनिक निर्णय न घेता, तार्किक निर्णय घेण्यास मदत करू शकतो.

सल्लागाराकडून घेतला म्हणजे फायदाच होईल असे नाही. सल्लागार हा पात्र, ज्ञानी, प्रामाणिक निवडावा. तरच त्याच्या सल्ल्याचा तुम्हाला फायदा होईल.

सोप्या शब्दात सांगायचं तर, म्युच्युअल फंड वितरकाच काम तुम्ही करू शकत असाल, तर Direct plan घ्या. म्युच्युअल फंड वितरकाच काम तुम्ही स्वतः करू शकत नसाल, तर Regular plan घ्या.

Regular plan मध्ये Direct पेक्षा थोडा कमी परतावा येईल. पण तुम्हाला ज्ञानी व्यक्ती कडून मार्गदर्शन मिळेल. म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला व्यक्तिशः माहिती हवी असेल तर इथे क्लिक करा.

म्युच्युअल फंड मध्ये नफा कसा ठरवतात ?
खालील उदाहरण हे फक्त समजण्यासाठी आहे. म्युच्युअल फंड एवढा परतावा येईलच असे नाही.

आपण पेट्रोल चे उदाहरण पाहू. समजा, पेट्रोल चे भाव असे होते.

पेट्रोल चा भाव रुपये लिटर YEAR
१० १०० १० १९५०
२० १०० ५ १९७०
५० १०० २ १९९०
१०० १०० १ २०१०
NAV गुंतवणूक UNIT YEAR
१० १०० १० १९५०
२० १०० ५ १९७०
५० १०० २ १९९०
१००
१००

१ २०१०
समजा तुम्ही १०० चा पेट्रोल घेतलं आणि १९५० मधे भाव १० रु/लिटर होता, तर तुम्हाला १० लिटर पेट्रोल मिळेल.

२०१० मधे पेट्रोल चा भाव १०० रु/लिटर तर तुम्हाला १ लिटर पेट्रोल मिळेल. तर पेट्रोल चा भाव झाला NAV. तुम्ही कितीच पेट्रोल घेणार ती गुंतवणूक आणि तुम्हाला किती पेट्रोल मिळणार ते झाले UNITS.

समजा १९७० मध्ये तुम्ही १०० रु गुंतवले तर तुम्हाला १० NAV प्रमाणे १० UNIT मिळतील

UNIT = INVESTMENT / NAV

१० UNIT = १०० रु / १० NAV

आता २०१० साली NAV ची किंमत जर १०० झाली तर तुमच्याकडे असलेल्या १० UNIT चे मूल्य होईल १०*१००= १०००

म्हणजे १९५० साली १०० गुंतवले ते झाले १०००.

म्हणजे NAV मधे होणारा बदल आपल्या गुंतवणुकीमध्ये होणारा बदल दर्शवतो.

KYC
KYC म्हणजे Know Your Customer, म्युच्युअल फंड घेण्याकारिया आपल्याला २ प्रकारचे पुरावे लागतात. १. ओळखीचा २. राहिवाशीचा आणि Pan कार्ड. जर तुमच्याकडे Pan कार्ड नसेल तर तुम्ही वर्षाला ५०,००० पेक्षा जास्त गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये करू शकणार नाही.

EKYC
ज्या लोकांचा AADHAR कार्ड ला मोबाईल क्रमांक जोडलेला आहे, ते लोक EKYC करू शकतात. त्यांना form भरण्याची आवशक्यता नाही. ते online अर्ज करू शकतात. काही म्युच्युअल फंड NET बँकिंग, ATM कार्ड ने गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. किंवा तुम्ही CHEQUE अथवा DD ने गुंतवणूक करू शकता. E-KYC ची मर्यादा प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी ला प्रत्येक वर्षी ५०,००० आहे. यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन form भरावा लागेल.

SIP
Systematic Investment Plan हि अशी सुविधा आहे, ज्यात तुम्ही दरमहा गुंतवणूक करू शकता. SIP चा फायदा हा आहे कि, तुमची गुंतवणूक नियमितपणे होत राहते. त्यामुळे तुमचा धोका कमी होतो. नियमित गुंतवणूक केल्याने सर्व NAV दरांवर गुंतवणूक होते. त्यामुळे तुमचा धोका LumpSump पेक्षा कमी होतो. LumpSump म्हणजे नियमित गुंतवणूक न करता, एकाच वेळी गुंतवणूक करणे.

SIP काम का करते ?
तुम्हाला जर दर महिन्याला गुंतवणूक करू का ? हा निर्णय घ्यावा लागला, तर अनेक वेळा त्याच उत्तर नाही येईल. कारण प्रत्येक महिण्यात परिस्थिती वेगळी असते. कधी कोणाला उधार द्यावे लागेल, कधी अनावश्यक खर्च करू वाटेल. त्यामुळे गुंतवणूक जे महत्वाचे काम आहे, ते सोडून दुसऱ्या गोष्टी केल्या जातील. पण SIP मध्ये ठराविक रक्कम, ठराविक तारखेला आपोआप गुंतवल्या जाते. त्यामुळे गुंतवणूक करावी का नाही ? हा प्रश्न उरत नाही. आधी गुंतवणूक केल्या जाते आणि नंतर खर्च केला जातो. आपल्या गुंतवणुकी स्वयंचलित करणे योग्य राहते. त्यामुळे शिस्तपूर्ण नियमित गुंतवणूक होते.

Mint तर्फे एक संशोधन करण्यात आले, त्या मध्ये sip खरोखर काम करते का ? ह्या प्रश्नच उत्तर त्यांनी शोधल. त्यांना खालील माहिती मिळाली. सविस्तर माहिती तुम्ही इथे पाहू शकता.



वरील चित्राचा संदेश असा आहे कि, दीर्घावधी साठी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. वरील तक्ता १० वर्ष sip झाल्यावर किती प्रमाणात परतावा आला आहे हे दर्शवितो. निळा रंग तुम्हाला १५% पेक्षा जास्त वार्षिक परतावा किती वेळा आला आहे, हे दर्शवित आहे. पिवळा ६-१५ % परतावा किती वेळा आला आहे, हे दर्शवित आहे.

SWP
Systematic Withdrawal Plan हि अशी सुविधा आहे ज्यात तुम्ही दरमहा गुंतवलेली रक्कम काढू शकता. हि सुविधा तुम्ही Pension सारखी वापरू शकता. यात तुम्ही LumpSump रक्कम गुंतवता आणि मग दरमहा थोडी रक्कम Pension म्हणून अथवा दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून वापरू शकता.

STP
Systematic Transfer Plan या सुविधेमध्ये तुम्ही एका योजनेमधून दरमहा पैसे दुसऱ्या योजनेमध्ये ट्रान्स्फर करू शकता. तुमच्या कडे जर मोठी रक्कम असेल, तर ती रक्कम कमी धोका असलेल्या plan मधे गुंतवून तुम्ही हळू हळू दरमहा जास्त धोका असलेल्या plan मध्ये ट्रान्स्फर करू शकता. याचा फायदा हा होतो कि तुमची गुंतवणूक NAV ची संख्या जास्त असताना होत नाही. यामुळे धोका कमी होतो.

CAGR
Compounded Annual Growth Rate
(एकत्रित वार्षिक वाढ दर)
म्हणजे सरासरी वार्षिक परतावा किती.
समजा तुमचे 10,000 रु ५ वर्षात २०,००० झाले म्हणजे ५ वर्षात १००% वाढले. तर दरवर्षी चा सरासरी परतावा झाला १५%. म्हणजे दरवर्षी १५% या दराने तुमचे पैसे वाढले.
म्युच्युअल फंड मध्ये दरवर्षी ठराविक परतावा नसतो. तो कधी ५% येतो कधी ४०% तरी कधी -१०% पण येऊ शकतो. त्यामुळे CAGR आपल्याला दरवर्षी चा सरासरी परतावा किती ते सांगतो. म्युच्युअल फंड मध्ये मागील १० वर्षाचा CAGR पाहून तुम्ही अंदाज लावू शकता या फंड मध्ये किती परतावा मिळू शकतो. पण मागील परतावा भविष्यात निश्चितच मिळेल असे सांगता येत नाही. मिळू शकतो अथवा कमी जास्तही होऊ शकतो.
Absolute Returns
वरील उदाहरणात आपण पाहिले की १०,००० चे २०,००० झाले. म्हणजे १०० % वाढले, हे १०० % म्हणजे Absolute Return.

XIRR
Extended Internal Rate of Return जर आपण १०,००० एकत्र न गुंतवता १,००० ची sip केली किंवा आपल्याला काही डिव्हिडंड मिळाला, त्यावेळी जो CAGR काढू त्याला म्हणतात XIRR.

Nomination
तुमच्या पश्चात तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कुणाला मिळावी, हि सुविधा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करू शकता. यात तुम्ही ३ व्यक्तींपर्यंत nominee ( नामनिर्देशित व्यक्ती) करू शकता. त्यांना किती प्रमाणात रक्कम द्यायची हे देखील तुम्ही ठरवू शकता.

Market Risk
Mutual fund are subject to market risk, please read offer document carefully before investing. याचा अर्थ काय ? म्युच्युअल फंड च्या जाहिरातीमध्ये असे का बोलतात ? Market Risk म्हणजे बाजार भाव. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य हे बाजारात त्या वस्तूला किती भाव मिळतोय यावर ठरत. जसे काही दिवाळी ऑफर असेल तर तेव्हा तुम्हाला १२,००० चा tv १०,०० मध्ये मिळू शकतो. पण तुम्ही १ महिनेनंतर गेले तर तुम्हाला १२,००० ला tv मिळणार नाही, तर बाजारात जी रक्कम आहे त्या प्रमाणे मिळेल.

असे का होते म्युच्युअल फंड मधे ? म्युच्युअल फंड ठराविक परतावा नसतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक करतात आणि गुंतवणुकीचे मूल्य किती वाढते वा कमी होते, यावर तुमचा परतावा अवलंबून आहे. उदाहरण म्हणजे सोन, काही वर्षापूर्वी सोन्याचा भाव ३३,००० हजार होता. तो आज ३०,००० आहे, तर तुम्ही सोनाराला म्हणाल का ? मला सोन विकायचा आहे. माझ्याकडून तू ३३,००० च्या भावाने घे बाबा, मी त्याचा भावाने ते घेतलं आहे. तर याला म्हणतात मार्केट रिस्क. मग म्युच्युअल फंड गुंतवणूक करू नये का ? मार्केट रिस्क आहे तर ? ज्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला निश्चित रक्कम किती मिळेल हे सांगितलेलं नाही त्या सर्व गुंतवणुकीमध्ये मार्केट रिस्क आहे. हो पण म्युच्युअल फंड मध्ये ती जास्त प्रमाणात आहे. मार्केट रिस्क वर उपाय म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करणे, SIP पद्धतीने गुंतवणूक करणे. दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे काय ? हे आपण गुंतवणुकीचे प्रकार या लेखात पहिलेच आहे. त्यासाठी गुंतवणूक करताना आपण आपल्याला किती काळ गुंतवणूक करत आहे, त्यानुसार plan घ्यावे. दीर्घकालीन गुंतवणुकी करिता आपण जास्त धोका घेऊ शकतो.

TAX
ELSS- Equity Linked Saving Schemes , यामध्ये ८० क अंतर्गत income tax मध्ये सुट मिळते. तुम्हाला सुट १.५ लाखापर्यंत मिळू शकते. हा देखील म्युच्युअल फंड चाच एक Equity plan आहे. पण या plan मध्ये ३ वर lock in period आहे. याचा अर्थ income tax वाचवण्यासाठीच्या या plan मध्ये ३ वर्ष तुम्ही पैसे काढू शकत नाही. FD मध्ये आपल्याला TDS लागतो. तसा म्युच्युअल फंड मधे Capital Gain Tax असतो. शेयर, बॉंड, जमीन, म्युच्युअल फंड इत्यादी गुंतवणुकीवर हा tax लागतो. तुम्ही जो नफा कमावला आहे त्यावर हा tax लागतो. याचे दोन प्रकार आहेत.

Short term Capital Gain Tax
Long Term Capital Gain Tax
म्युच्युअल फंड Equity plan मध्ये एक वर्षांनंतर मिळालेल्या नफ्यावर ०% Capital Gain Tax लागतो. आणि एक वर्षाआधी आपण गुंतवणूक काढली तर त्यावर Short Term Capital Gain Tax लागतो. म्हणून Equity फंड मध्ये गुंतवणूक एक वर्ष पेक्षा कमी कालावधी साठी करू नये. म्युच्युअल फंड च्या Equity plan मध्ये बहुतेक कंपनी गुंतवणुकीचे १ वर्ष पूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर १% Exit Load लावतात. म्हणजे Equity plan मध्ये जी तुमची गुंतवणूक आहे त्याच्या १% रक्कम वजा होवून तुम्हाला पैसे मिळतील.

शेयर मार्केट की म्युच्युअल फंड ?


त्याने जास्त अभ्यास केल्यामुळे वाईट वेळेत, तो स्टॉक विकावा वा अजून विकत घ्यावे ? हे त्याला माहीत असेल. पण तुम्हाला प्रत्येक वेळी त्या माणसाकडे सल्ला घ्यायला जावे लागेल. तुम्ही किती वेळा दुसऱ्याकडे सल्ला घ्यायला जाणार ? कितीवेळा तुम्हाला फुकट सल्ला मिळेल ? आणि तो असे का करेल ?
तुम्ही स्वतः अभ्यास केला तर तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही.
तुम्हाला जर शेयर निवडताना दुसऱ्याची गरज पडते, मग तुम्ही तज्ञाची मदत का घेत नाही ?
म्युच्युअल फंड मध्ये तज्ञ माणूसच तुमच्यासाठी निर्णय घेतो. कोणता शेयर विकत घ्यावा ? कोणता कधी विकावा ? हे सर्व निर्णय तोच तज्ञ घेतो. हे त्याचं पूर्ण वेळ काम असत. आपण पार्ट टाइम काम करून त्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो का ?
तुम्हाला वाटत असेल तुम्ही म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न मिळवू शकता मग शेयर विकत घ्या. अथवा तुम्हाला शेयर मार्केट मध्ये कारकीर्द बनवायची असेल तर स्वतः शेयर विकत घ्या. अन्यथा म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपल्याला काहीच झंझट पण राहत नाही. फक्त दरवर्षी म्युच्युअल फंड ची कामगिरी तपासावी लागते.
शेयर मार्केट की म्युच्युअल फंड ?

शेयर मार्केट
म्युच्युअल फंड
दोन्ही

View Results

म्युच्युअल फंड घेताना काय विचार करावा ?
उद्देश – माझा उद्देश काय ? निवृत्ती ? मुलाचं शिक्षण ? लग्न ? घर ? कार ? मी गुंतवणूक का करत आहे ? आज त्या गोष्टीला किती खर्च लागेल ? मी ही गोष्ट किती वर्षांनी करणार आहे ? तेव्हा महागाई पकडून किती खर्च येईल ?
वेळ – तुमचा उद्देश पूर्ण करण्याकरिता तुमच्या कडे किती वेळ आहे ?
किती – तुम्हाला या काळात लक्ष्य पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल ? जर तुम्ही गुंतवणूक Lump Sump केली तर किती करावी लागेल ? जर गुंतवणूक दरमहा केली तरी किती करावी लागेल ? किंवा गुंतवणूक दरवर्षी वाढवत गेलो, तर कितीने वाढवावी लागेल ?
टॅक्स – ELSS मध्ये तुम्ही income tax वाचवू शकता का ? इतर टॅक्स काय आहेेेत ?
परतावा – तुम्हाला अंदाज येईल कि तुम्हाला किती % परतावा हवा आहे. मग त्या जवळपास परतावा देणारे म्युच्युअल फंड चे plan शोधा. त्या म्युच्युअल फंड चा मागील १० वर्षाची कामगिरी पहा. तो फंड सातत्यपूर्ण कामगिरी करतोय का ते पहा ?
जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जमत नसतील तर म्युच्युअल फंड वितरकाची तुम्ही मदत घेऊ शकता. अशी मदत हवी असल्यास तुम्ही येथे संपर्क करू शकता.

तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय स्मार्ट कसे असावे ? हे तुम्ही इथे पाहू शकता.

बेस्ट म्युच्युअल फंड कोणता ?
अनेक लोक हा प्रश्न विचारतात, बेस्ट फंड कोणता ? आता बेस्ट कशावरून ठरवावं ?

ज्याने सर्वात चांगला परतावा दिला आहे की जो देईल ? पण म्युच्युअल फंड मध्ये तर परतावा किती मिळेल हे ठराविक नसत. मागील परतावा भविष्यात मिळेल, हे पण नक्की नसतं. परतावा कमी-जास्त पण होऊ शकतो. मग बेस्ट म्युच्युअल फंड कसा निवडणार ?
सर्व म्युच्युअल फंड वेगवेगळ्या जागी गुंतवणूक करतात. आता कोणत्या फंडला अनुकूल वातावरण होते म्हणून जास्त परतावा आला की योग्य निर्णयामुळे ? हे सांगणे फार कठीण काम आहे. आणि हो मागे निर्णय बरोबर आले किंवा परिस्थिती अनुकूल होती म्हणून पुढेही राहील का ? हे सांगता नाही येत.

मग काय करायचं ?
प्रत्येक म्युच्युअल फंड ला बेंचमार्क असतो. बेंचमार्क म्हणजे असा निर्देशांक, ज्याच्याशी तुलना करून आपण फंड ची कामगिरी तपासू शकतो. भविष्यात सर्वात जास्त परतावा देणारा फंड शोधून काढणे अशक्य आहे. पण जो फंड मागील अनेक वर्षांपासून बेंचमार्क पेक्षा जास्त परतावा देतोय, त्याची निवड करणे सोपे आहे.
नेहमी सर्वात जास्त परतावा मागे फिरू नका. बेंचमार्क पेक्षा सतत जास्त परतावा देणारा फंड निवडा. दीर्घकालीन गुंतवणुकीमधे एक अपेक्षित परतावा असतो, तो मिळतोय का ? ते पहा. सर्वात जास्त परताव्या मागे पळू नका.

मग कंपनी कोणती निवडावी ?
ज्या कंपनीच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकून तुम्हाला शांत झोप येईल, त्यात.

तुम्ही जो गुंतवणुकीचा उद्देश ठरवला आहे, फक्त त्यासाठीच म्युच्युअल फंड चे पैसे काढा. म्युच्युअल फंड च्या Equity plan मध्ये परतावा हा कमी जास्त होत असतो. कोणत्या वर्षी २% तर कोणत्या वर्षी ४०%. लगेच पैसे वाढले किंवा कमी झाले म्हणून काढून घेऊ नका. तर ते फक्त तुमचा उद्देश पूर्ण करण्यासाठीच वापरा. फक्त जर आपत्कालीन स्थिती आली आजारपण, नोकरी जाणे तरच हि रक्कम काढा.
उत्तर लिहिले · 23/7/2020
कर्म · 11370
0
म्युच्युअल फंड (Mutual Fund) संदर्भात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस तुम्हाला म्युच्युअल फंडाची माहिती, गुंतवणूक कशी करावी, आणि त्याचे फायदे काय आहेत हे शिकवतात.
तुम्ही खालील पर्याय विचारत घेऊ शकता:
  1. ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन म्युच्युअल फंड्स (Advanced Certificate Course in Mutual Funds): हा कोर्स म्युच्युअल फंड उद्योगाची मूलभूत माहिती देतो. यात म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे प्रकार, फायदे आणि गुंतवणूक कशी करावी हे शिकवले जाते.
  2. सर्टिफिकेशन कोर्स ऑन म्युच्युअल फंड्स (Certification Course on Mutual Funds): हा कोर्स खासकरून म्युच्युअल फंड वितरक (Distributor) आणि गुंतवणूक सल्लागार (Investment Advisor) यांच्यासाठी असतो.
  3. ॲमफीचे कोर्सेस (AMFI Courses): Assosiation of Mutual Funds in India (AMFI) म्युच्युअल फंड वितरकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी अनेक प्रकारचे कोर्सेस आयोजित करते. AMFI India
  4. ऑनलाईन कोर्सेस (Online Courses): Udemy, Coursera आणि NSE Academy सारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर म्युच्युअल फंडांवर आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत.
हे कोर्सेस तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये मदत करू शकतात.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 720
0
उत्तम परतावा देणारी गुंतवणूक
म्युच्युअल फंडांच्या योजनांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. ज्या वेळी म्युच्युअल फंडाने ६५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिकची गुंतवणूक शेअर्स या प्रकारामध्ये केलेली असते, त्यांना इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणतात, तर इतर म्युच्युअल फंडास नॉनइक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणतात. पहिल्या प्रकारात जोखीम जास्त, तर दुसऱ्या प्रकारात कमी असते व म्हणून परतावाही त्याप्रमाणे जास्त वा कमी असतो. सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या प्रकारांपैकी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमयुक्त असली तरी गेली काही वर्षे परंपरागत मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याच्या मानाने उत्तम परतावा देणारी ठरलेली आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

म्युच्युअल फंडातील सर्वसामान्य व्यक्तींचा सहभाग वाढावा म्हणून कलम ८० सी अंतर्गत सवलत देणाऱ्या इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) योजना उपलब्ध असतात. या योजनेत होणारी गुंतवणूक दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट होण्यासाठी पात्र आहे. मुदत ठेवींवर मिळणारे व्याज करदाता ज्या प्राप्तिकर उत्पन्नाच्या कर देयतेच्या गटवारीत असेल, त्यानुसार त्याला प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु म्युच्युअल फंडावरील लाभांशास हा नियम लागू होत नाही. कारण हा लाभांश पूर्णतः करमुक्त आहे, ही जमेची बाजू. याखेरीज मूळ मुद्दलाची देखील वाढ होऊ शकते, हा वाढीव फायदा.

अर्थव्यवस्था गतिमान राहण्यासाठी तीन टक्‍क्‍यांपर्यंत भाववाढ असणे सुदृढतेचे लक्षण मानले जाते. परंतु, भाववाढीमुळे चलनाची क्रयशक्ती कमी होते, हा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणून ती भरून काढण्यासाठी या भांडवलवृद्धीचा फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. या खेरीज भांडवलवृद्धी पैशात रूपांतरित केल्यास होणारा अल्पकालीन भांडवली नफा पंधरा टक्के दराने किंवा एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांवरील दीर्घकालीन भांडवली नफा दहा टक्के दरने करपात्र होतो. याचा अर्थ यातील एक लाख रुपयांचा दीर्घकालीन भांडवली नफा आजही करमुक्त आहे, हे बऱ्याच गुंतवणूकदारांच्या ध्यानात येत नाही.

‘एसआयपी’ गुंतवणूक फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, किमान पाच- सहा वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असा अनुभव आहे. केवळ एक- दोन वर्षांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावयाची असल्यास प्रथम जोखीम लक्षात घ्यावी. म्युच्युअल फंडात एकरकमी, तसेच दरमहा टप्प्याटप्प्याने (एसआयपी) गुंतवणूक करता येते. बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेत, दीर्घकाळात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने गुंतवणूक करणे हिताचे ठरते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे.

काय आहेत फायदे?
    दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर
    महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता
    बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेण्यासाठी ‘एसआयपी’ उपयुक्त
    उद्दिष्टपूर्तीसाठी गुंतवणुकीचे उत्तम साधन
    तरलता, पारदर्शकता या वैशिष्ट्यांमुळे चांगली गुंतवणूक आहे.🙏
उत्तर लिहिले · 3/4/2020
कर्म · 3350
0

म्युच्युअल फंडमधील NAV म्हणजे 'नेट ॲसेट व्हॅल्यू' (Net Asset Value) होय. NAV म्हणजे म्युच्युअल फंड योजनेच्या प्रति युनिट किंमत असते.

NAVची गणना:

NAVची गणना खालीलप्रमाणे केली जाते:

NAV = (ॲसेट - लायबिलिटी) / युनिट्सची एकूण संख्या.

NAV चा अर्थ:

NAV आपल्याला हे दर्शवते की म्युच्युअल फंड योजनेतील प्रत्येक युनिटची किंमत किती आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही NAV च्या आधारावर युनिट्स खरेदी करता. NAV नियमितपणे बदलते कारण फंडामध्ये असलेल्या सिक्युरिटीजचे बाजार मूल्य बदलत असते.

NAV चा उपयोग:

  1. गुंतवणूक करताना युनिट्सची किंमत समजते.
  2. गुंतवणुकीच्या वाढीचे मूल्यांकन करता येते.
  3. एकाच प्रकारच्या इतर योजनांशी तुलना करता येते.

NAV चे प्रकार:

  1. सुरुवातीची NAV: नवीन फंड ऑफर (NFO) मध्ये युनिट्स जारी करतानाची किंमत.
  2. अंतिम NAV: दिवसाच्या शेवटी नोंदवलेली NAV, जी दिवसाच्या व्यवहारांनंतर निश्चित होते.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 720
0

पेटीएम म्युच्युअल फंडमध्ये (Paytm Mutual Fund) गुंतवणूक करायची की नाही, हे तुमच्या गुंतवणुकीच्या ध्येयांनुसार आणि जोखमीच्या क्षमतेवर अवलंबून असते.

पेटीएम म्युच्युअल फंडाचे फायदे:

  • सोपे आणि सुलभ: पेटीएम ॲपद्वारे (Paytm App) तुम्ही सहजपणे गुंतवणूक करू शकता.
  • कमी खर्च: इतर म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचे खर्च कमी असू शकतात.
  • विविध योजना: गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत.

तोटे:

  • नवीन फंड हाऊस: हे तुलनेने नवीन फंड हाऊस असल्यामुळे, त्यांच्या योजनांचा इतिहास पाहणे महत्त्वाचे आहे.
  • जोखीम: म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नेहमीच बाजारातील जोखमी असतात.

गुंतवणूक करण्यापूर्वी काय करावे?

  1. तुमची उद्दिष्ट्ये निश्चित करा: तुम्हाला किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे आणि तुमचे ध्येय काय आहे?
  2. जोखीम क्षमता: तुम्ही किती जोखीम घेऊ शकता?
  3. योजनांचा अभ्यास करा: पेटीएम म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांची माहिती घ्या. त्यांचे भूतकाळातील प्रदर्शन (past performance), खर्च आणि इतर माहिती तपासा.
  4. तज्ञांचा सल्ला: आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन घ्या.

निष्कर्ष: पेटीएम म्युच्युअल फंड एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवस्थित संशोधन करणे आवश्यक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड गुंतवणुका बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 720