कर्ज फरक सावकारी

सरकारी कर्ज आणि सावकारी कर्ज यात काय फरक आहे?

1 उत्तर
1 answers

सरकारी कर्ज आणि सावकारी कर्ज यात काय फरक आहे?

4
सरकारी कर्ज असा काही प्रकार नसतो. जे कर्ज तुम्ही सावकाराकडून न घेता जर स्थानिक पतपेढी, सोसायटी, किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतले, तर त्याला तुम्ही सरकारी कर्ज म्हणू शकता. शेतकऱ्यांसाठी काही सोसायट्यांमध्ये बिनव्याजी कर्ज देखील दिले जाते. या कर्जावर असणारा व्याजदर हा सावकाराच्या व्याजदरपेक्षा कमी असतो म्हणून काही लोक याला सरकारी कर्ज म्हणत असतील
याउलट सावकारी कर्जात व्याजदर भरमसाठ असतो. सावकारी कर्जासाठी सावकाराकडे सरकारी परवाना असणे गरजेचे असते. परंतु काही श्रीमंत लोक बिना परवाना सावकारकी करतात, त्यांचा व्याजदर अजून जास्त असतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर जास्त असतो तर इतर कर्जाचा व्याजदर कमी असतो.
तसेच इतर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते, याउलट सावकार लवकर कर्ज देतो.
उत्तर लिहिले · 26/12/2019
कर्म · 282915

Related Questions

मी एका व्यक्तीला 200000 रु RTEGS व 40000 रोख अशी मदत केली, तो 2 दिवसात पैसे देतो बोलला, त्याबदल्यात त्याने मला 240,000 रु चेक दिला आता तो पैसे देत नाही व सावकारी केली म्हणून केस करेल म्हणतो तर काय करावे?