Topic icon

सावकारी

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
6
तो काय म्हणतो त्याला महत्त्व नाहि तूम्ही जर सावकारी करत असाल तर त्याला ते कोर्टात सिद्ध करावे लागेल. तूम्ही तो चेक 2 वेळा बाऊन्स करा व फौजदारी केस दाखल करा. किंवा वकीलाकडून 402 फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. त्याला ते पैसे व्याजासकट तुम्हाला परत द्यावे लागतील. पण त्याने जर तुम्ही त्याला पैसे व्याजाने ढिले हे सिद्ध केले तर तुम्हालाही शिक्षेस पात्र रहावा लागेल 
उत्तर लिहिले · 9/9/2022
कर्म · 2325
4
सरकारी कर्ज असा काही प्रकार नसतो. जे कर्ज तुम्ही सावकाराकडून न घेता जर स्थानिक पतपेढी, सोसायटी, किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतले, तर त्याला तुम्ही सरकारी कर्ज म्हणू शकता. शेतकऱ्यांसाठी काही सोसायट्यांमध्ये बिनव्याजी कर्ज देखील दिले जाते. या कर्जावर असणारा व्याजदर हा सावकाराच्या व्याजदरपेक्षा कमी असतो म्हणून काही लोक याला सरकारी कर्ज म्हणत असतील
याउलट सावकारी कर्जात व्याजदर भरमसाठ असतो. सावकारी कर्जासाठी सावकाराकडे सरकारी परवाना असणे गरजेचे असते. परंतु काही श्रीमंत लोक बिना परवाना सावकारकी करतात, त्यांचा व्याजदर अजून जास्त असतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर जास्त असतो तर इतर कर्जाचा व्याजदर कमी असतो.
तसेच इतर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते, याउलट सावकार लवकर कर्ज देतो.
उत्तर लिहिले · 26/12/2019
कर्म · 282915