शब्द

सोमरस या शब्दाचा अर्थ काय आहे?

3 उत्तरे
3 answers

सोमरस या शब्दाचा अर्थ काय आहे?

4
धार्मिक ग्रंथांमधून मद्यपानाची, उन्माद आणणा-या पदार्थाच्या सेवनाची सर्वत्र निंदाचं करण्यात आली आहे. वेदांमध्ये सोमरसाला अनन्य साधारण महत्व आहे. सोम एक औषधी वनस्पती असल्याचं वेद-पुराणातील उल्लेखांमधून स्पष्ट होते. सोम या वनस्पतीला चमत्कारी वनौषधी असंही संबोधलं जातं.

ऋग्वेदामध्ये मादक पदार्थाविषयी काय म्हटलंय...
।।हृत्सु पीतासो युध्यन्ते दुर्मदासो न सुरायाम्।।
सुरा म्हणजे नशा आणणारा पदार्थ. सुरापान करणारे किंवा मद्यपान करणारे नेहमीच भांडण, मारामारी आणि हिंसा करतात. 

ऋग्वेदामध्ये सोमरसाविषयी काय म्हटलंय...
।।शतं वा य: शुचीनां सहस्रं वा समाशिराम्। एदुनिम्नं न रीयते।। (ऋग्वेद-1/30/2)
दही आणि दुग्ध मिश्रित सोमरसाचे अनेक घडे इंद्रदेवाला प्राप्त होवोत, असं आवाहन करण्यात आलंय. सोमरसात दही-दूध मिश्रित करण्याचं म्हटलंय. दारूत दूध-दही घातले जात नाही, हे सर्वश्रुत आहे. भांग दूध घालून पिण्यात येते. पण त्यात दही घातल्याचे आजवर तरी ऐकण्यात आले नाही.

।।औषधि: सोम: सुनोते: पदेनमभिशुण्वन्ति।- निरुक्त शास्त्र (11-2-2)
सोम एक औषधी आहे. ज्याला कुटून आणि दळून त्याचा रस काढण्यात येत असे. दुग्ध मिश्रित सोम म्हणजे ‘गवशिरम्’ तर दही मिश्रित सोम म्हणजे ‘दध्यशिरम्’ बनवले जात होते. शुद्ध तूप आणि मध घालूनही सोमरस तयार करण्यात येत असे. याचा अर्थ असा की, मदिरा, सुरा, भांग किंवा दारू या कशातही दही, मध आणि तूप घालण्यात येत नाही. या उलट सोम, दुध, दही, तूप आणि मध यांच्या मिश्रणातून सोमरस तयार करण्यात येत असे. म्हणजे, सोमरस हे दारू किंवा भांग असा मादक-उन्माद आणणारा हानिकारक पदार्थ नव्हे, हे लक्षात घ्यायला हवं. आता दारू ही हानिकारक आहे, असं कोणं म्हणतो? असा वाद निर्माण होऊ शकतो. पण किमान भारतात दारूमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, 'हानिकारक' हा शब्दप्रयोग याग्य ठरावा.
उत्तर लिहिले · 15/6/2019
कर्म · 565
0
सोमर
उत्तर लिहिले · 5/7/2022
कर्म · 0
0

सोमरस या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

सोमरस हा एक वैदिक पेय आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत ह्या पेयाला खूप महत्त्व होते. 'सोम' नावाच्या वनस्पतीपासून हा रस काढला जाई आणि तो धार्मिक विधींमध्ये वापरला जाई.

  • सोमरस हे देवांना अर्पण केले जाणारे पवित्र पेय मानले जाते.
  • यज्ञांमध्ये आणि धार्मिक कार्यांमध्ये याचा उपयोग केला जातो.
  • सोमरसाच्या सेवनाने शक्ती आणि स्फूर्ती मिळते, अशी मान्यता आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 860

Related Questions

शब्दसमूहांबद्दल एक शब्द, जाणून घेण्याची इच्छा असणारा?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द: एक मेकांवर अवलंबून असणे?
समाज या शब्दाचा सविस्तर अर्थ काय होतो?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
अशुद्ध शब्द ओळखा: आशीर्वाद, खेळणी, महत्त्व, निपुण?
अशुद्ध शब्द ओळखा?
मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा?