गुगल
गायक
दुःख देखणे तुझे देखणा वसंत तु; घाव सांगतातना आजही पसंत तू भीमराव पांचाळे (गायक) श्रीकृष्ण राऊत (गझलकार) हे गित कुठे मिळेल ? गुगलवर शोधले मिळाले नाही कृपया सांगा, मी आकाशवाणी अकोला रेडिओ केंद्रावर ऐकले होते ?
3 उत्तरे
3
answers

5
Answer link
ही श्रीकृष्ण राऊत यांची मोक्ष नावाची गजल आहे.
पूर्ण गजल:
दु:ख देखणे तुझे,देखणा वसंत तू;
घाव सांगतातना आजही पसंत तू.
सोसतात लोक हे लाख यातना पहा;
वागवीत बैसला काय एक खंत तू.
वाटल्यास गाळ तू लपून दोन आसवे;
भाषणा, करू नको मरण शोभिवंत तू.
येथली जमीनही नीट ना कळे तुला;
वाचतोस सारखा काय आसमंत तू.
लोचनात ओतुनी प्राण वाट पाहतो;
आणखी बघू नको फार वेळ अंत तू.
स्वर्ग छान कल्पना,मोक्ष फालतूपणा;
चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू.
पूर्ण गजल:
दु:ख देखणे तुझे,देखणा वसंत तू;
घाव सांगतातना आजही पसंत तू.
सोसतात लोक हे लाख यातना पहा;
वागवीत बैसला काय एक खंत तू.
वाटल्यास गाळ तू लपून दोन आसवे;
भाषणा, करू नको मरण शोभिवंत तू.
येथली जमीनही नीट ना कळे तुला;
वाचतोस सारखा काय आसमंत तू.
लोचनात ओतुनी प्राण वाट पाहतो;
आणखी बघू नको फार वेळ अंत तू.
स्वर्ग छान कल्पना,मोक्ष फालतूपणा;
चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू.
0
Answer link
भिमराव पांचाळे यांनी गायलेली गजल आहे . तुम्हाला त्यांच्या अल्बम मध्ये हे गाणं ऐकायला भेटेल.