परीक्षा नीट परीक्षा

नीट परिक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

1 उत्तर
1 answers

नीट परिक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

6
NEET परिक्षा देण्यासाठी आपण कमीतकमी १२ वी पास झालेले असायला हवे किंवा कमीतकमी १२ वी ची परिक्षा दिलेली पाहीजे.

म्हणजेच परिक्षा दिली आहे परंतु अजुन निकाल यायचा आहे असे असतांना सुद्धा आपण NEET देऊ शकतात.

आपले १२ वी चे विषय PCB गृपला असावेत. PCB म्हणजे Physics, Chemistry आणि Biology/Biotechnology आणि PCB सोबत इंग्रजी विषय पण असायला हवा. PCB त परीक्षा दिली आहे परंतु इंग्रजी हा विषय नाही तर मग आपण पात्र नाहीत.

आपलं वय कमीतकमी १७ वर्ष असायला हवं आणि जास्तीतजास्त २५ वर्ष असायला हवं. आरक्षित विद्यार्थी ३० वर्षापर्यत देऊ शकतो.

आपण वरिल पात्रता पुर्ण असतांना किती ही वेळा परिक्षा देऊ शकतात अटेंप्ट करु शकतात.

सध्यातरी NEET परिक्षा अॉनलाईन नाही होत, पेन पेपर नेच होते. आणि त्यात MCQ प्रकारचे प्रश्न असतात.

टिप :

१. मी इंजिनियरींग केलेली आहे. मला NEET किंवा इतर तत्सम मेडिकल परिक्षेबद्दल काहीच माहित नाही. तरी वरिल पात्रता आपण स्वताः एकदा कंन्फर्म करावी.

२. मी फक्त नेट वर उपलब्ध असलेली माहिती सांगितली. परत मला जुने पेपर मिळतील का ? मी एका विषयात नापास आहे, मी देऊ शकतो का ? NEET बरी का दुसरं काही करु? मी SC आहे, कटअॉफ किती असेल? परिक्षा रजिस्टेशन कसं करु ? फॉर्म निघाले का ? अभ्यासक्रम काय आहे? Free PDF मिळेल का? असं विचारू नका. मला ह्या बद्दल अचुक सांगता येणार नाही. मी ह्याबाबतीत तेवढा जाणकार नाही.
उत्तर लिहिले · 9/1/2019
कर्म · 75305

Related Questions

माझी पत्नी 9 वी पास असून ती 12 वी कला शाखेची परीक्षा ह्या वर्षी देऊ शकते काय?
एका विद्यार्थ्याला 35 टक्के मार्क मिळाले व तो 10 माकांनी नापास झाला. दुसऱ्याला 31 टक्के मार्क मिळाले व तो 30 माकांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती.?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
संकलित परी म्हणून आपण दुतीय सत्र परीक्षा वार्षिक परीक्षा आठवी मराठी?
वैद्यकीय विद्यार्थी upsc ही परीक्षा देऊ शकतो का?
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवी सराव क्रमांक 15 मराठी व गणित प्रश्नपत्रिका 150 गुण?
वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प सोय अध्ययन परीक्षा कसे कराल?