परीक्षा
वैद्यकीय विद्यार्थी upsc ही परीक्षा देऊ शकतो का?
1 उत्तर
1
answers
वैद्यकीय विद्यार्थी upsc ही परीक्षा देऊ शकतो का?
0
Answer link
यूपीएससी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता
यूपीएससी देणारा विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवी सुद्धा यासाठी ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता आहे सर्वोच्च पात्रता काहीही असू शकते.
भारतीय प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी उत्तम प्रशासकांची गरज असते. उत्तम प्रशासकांची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोग कार्यरत आहेत. सनदी सेवकांची नेमणूक लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असते.
योग्य मार्गदर्शन, प्रभावी अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव या आधारे यूपीएससी परीक्षा एक सामान्य विद्यार्थी सुद्धा सहजतेने पास होऊ शकतो. जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या आधारे परीक्षेला सामोरे जा.
आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.