रेशन कार्ड

रेशनकार्ड (शिधापत्रिका) संदर्भातील माहिती?

2 उत्तरे
2 answers

रेशनकार्ड (शिधापत्रिका) संदर्भातील माहिती?

24


​📌 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) संदर्भात माहिती*
---------------------------------------
🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी अर्ज*
परिमंडळ कार्यालय, अ विभाग, संततुकाराम व्यापारी संकुल, दुसरा मजला, निगडी, पुणे – ४११ ०४४ व महानगरपालिका क्षेत्रातील ठराविक महा ई-सेवा केंद्रात अर्ज मिळतील. या केंद्राची यादी मनपाचे https://www.pcmcindia.gov.in/marathi/ > General info > maha e seva centers


रेशनकार्ड(शिधापत्रिका)साठी संकेतस्थळ

👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

🏉 *नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे*
१. अर्ज कुटुंबातील ज्येष्ट स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज
२.अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन जोडावे
३.अर्जासोबत बँक जॉईंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बँक पासबुकची प्रत
४.आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत
५.नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेलतर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला
६.राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वत:चे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती

🏉 *दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे*
१.रेशन कार्ड (शिधापत्रिका) हरविले असल्यास कार्ड हरविलेबाबत पोलिसांचा दाखला
२.दुकानदारांकडील रेशन कार्ड (शिधापत्रिका) चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला
३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) जीर्ण झाली असल्यास मूळ कार्ड व दुकानदाराचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
४.जीर्ण कार्डवरील अक्षर पुसट असेलतर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे
५.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा

🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये युनिट वाढ करणेसाठी*
१.लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची सांक्षाकित प्रत
२.पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
३.मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा दाखला

🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील युनिट कमी करणेसाठी*
१.मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज
२.मयत असल्यास मयत दाखला
३.परगावी जात असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज
४.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा.

🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्याचा कालावधी*
१.नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – १ महिना
२.दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – ८ दिवस
३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) नुतनीकरण – १ महिना
४.रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील नावात बदल व युनिटमध्ये वाढ अथवा घट असल्यास – ३ दिवस

🏉 *नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी फी*
१.नवीन पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड - रुपये १०/-
२.नवीन केशरी रंगाचे रेशन कार्ड - रुपये २०/-
३.नवीन शुभ्र पांढ-या रंगाचे रेशन कार्ड - रुपये ५०/-

🏉 *दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी फी*
१.दुबार पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड - रुपये २०/-
२.दुबार केशरी रंगाचे रेशन कार्ड - रुपये ४०/-
३.दुबार शुभ्र पांढ-या रंगाचे रेशन कार्ड - रुपये १००/-

🏉 *कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा*
१.पिवळी शिधापत्रिका – रुपये १५ हजारापर्यंत
२.केशरी शिधापत्रिका – रुपये १ लाखापर्यंत
३.शुभ्र शिधापत्रिका – रुपये १ लाख व त्यापुढील


रेशन(राशन)दुकानदाराविरुद्ध तक्रार कुठे करावी?

*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर - २० रू . किलो*
*तुरदाळ- ३५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर असेल व तुम्हाला माल (राशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
      *चोरांना खुलेआम आपली लूट  करन्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
                                जागा ग्राहक जागा !           आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा.  आरबीएम वृत्त वाहिनी महाराष्ट्र (RBM news Maharashtra) तुमच्या सोबत. जाहिरात व बातम्या प्रसारीत करण्यासाठी संपर्क ९९७०२२८२३६ करा. आम्ही तुमची नक्कीच मदत करू.🍃


_*📙 तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळते?*_


📍देशातील गरिबांना मोफत धान्यपुरवठा होणेसाठी रेशनकार्डचा उपयोग केला जातो. तसेच या धर्तीवर गरजूंच्या दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते.

❗दरम्यान काहीवेळा लोकांना लक्षात येत नाही कि आपल्याला क्षमतेनुसार किती धान्य मिळायला हवे , त्यामुळे दात्यांचा गोंधळ उडतो. हि माहिती आपणास मिळवायची असेल तर खालील कृती अवलंबावा.

▪प्रथम  http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटला भेट द्या.

▪पुढील स्क्रीनवर ऑनलाईन रास्तभाव असे विंडो दिसेल. पुढील विंडोत Aepds सर्व जिल्हे या नावाची कोलाम दिसेल, त्यावर क्लिक करा.

▪RC Details New वर क्लिक करा. पुढील विंडोत आपला (SRC No) रेशनकार्ड नं. टाका.

▪Submit या बटनावर क्लिक करा.

💁🏻आता आपल्या स्क्रिनवर तुमच्या रेशनकार्डवरील माहिती व आपल्याला मिळत असलेल्या मालाची माहिती तसेच मागील एक वर्षांपूर्वीची माहिती याद्वारे मिळू शकेल.

राशन विषयी अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ लिंक उघडा.
https://youtu.be/xwEytlXzxPI


उत्तर लिहिले · 12/10/2018
कर्म · 569225
0

रेशनकार्ड (शिधापत्रिका) हे एक महत्त्वाचे शासकीयDocument आहे. हे केवळ धान्य खरेदी करण्यासाठीच नाही, तर अनेक सरकारी कामांसाठी उपयोगी आहे.

रेशनकार्ड म्हणजे काय?

रेशनकार्ड हे सरकारद्वारे जारी केलेले एक अधिकृतDocument आहे, जे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत स्वस्त दरात धान्य आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पात्र ठरवते. हे कार्ड भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून देखील वापरले जाते.

रेशनकार्डचे प्रकार:
  • एपीएल (APL) रेशनकार्ड: हे रेशनकार्ड दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या लोकांसाठी आहे.
  • बीपीएल (BPL) रेशनकार्ड: हे रेशनकार्ड दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी आहे.
  • अंत्योदय अन्न योजना (AAY) रेशनकार्ड: हे रेशनकार्ड अत्यंत गरीब लोकांसाठी आहे.
रेशनकार्डसाठी पात्रता:
  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदाराकडे इतर कोणतेही रेशनकार्ड नसावे.
  • एका कुटुंबातील सदस्य म्हणून अर्ज करता येतो.
आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा (लाईट बिल, पाणी बिल, भाडे पावती)
  • ओळखपत्र ( Voter ID, ड्रायव्हिंग लायसेन्स)
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
रेशनकार्ड कसा काढायचा?
  1. ऑफलाइन प्रक्रिया: तुमच्या এলাকার तहसील कार्यालयात किंवा अन्न आणि नागरी पुरवठा विभागात जाऊन अर्ज भरा.
  2. ऑनलाइन प्रक्रिया: काही राज्यांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
रेशनकार्डचे फायदे:
  • स्वस्त दरात धान्य आणि इतर वस्तू मिळतात.
  • ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून उपयोग होतो.
  • सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी:

तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.

उदाहरणार्थ, महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 840

Related Questions

एका माणसाचे नवीन रेशन कार्ड बनते का? (विशेषत: जर घटस्फोट झाला असेल तर?)
पिवळ्या रेशन कार्ड योजना काय आहे?
पिवळे रेशन कार्ड कसे काढायचे?
रेशन कार्ड वरती आडनाव बरोबर आहे, पण ऑनलाइन पाहिल्यास माझ्या आई आणि बाबा यांचे बरोबर आहे, पण माझे, माझ्या भावाचे आणि माझ्या आजी आजोबांचे चुकीचे आहे, तर काय करावे लागेल?
रेशन कार्ड वरती आडनाव बरोबर आहे पण ऑनलाइन पाहिल्यास माझ्या आई आणि वडिलांचे नाव वेगळे दिसत आहे, काय करावे?
रेशन कार्ड वरती आडनाव बरोबर आहे पण ऑनलाइन पाहिल्यास वेगळे दिसत आहे, काय करावे?
मला माझे रेशनकार्ड दुसऱ्या गावी दाखल करायचे आहे, यासाठी मी माझे जुने रेशनकार्ड घेऊन अर्ज करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी माझे ओरिजिनल रेशनकार्ड हरवले. आता माझ्याकडे फक्त रेशनकार्डची झेरॉक्स प्रत आहे, तर फक्त झेरॉक्स प्रतीवर रेशनकार्ड दाखल करता येईल का?