शब्दाचा अर्थ शब्द

चोराच्या मनात चांदण याचा अर्थ काय?

3 उत्तरे
3 answers

चोराच्या मनात चांदण याचा अर्थ काय?

5
सर माफ करा पण मि तुमच्या उत्तराशी सहमत नाही .तुमचे उत्तर छान आहे पण समर्पक नाही असे मला वाटते...
पिते दुध डोळे मिटूनी जात मांजराची..
मनी चोरट्याच्या कारे भिती चांदण्याची...
सरावल्या हातानाही कंप का सुटावा.....
चोराला कायम चांदण्यारात्रीची भिती वाटते कारण चोरी हि
अंधारचा फायदा घेऊन व चोरी झाल्या नतंर काळोखात पसार होण्यासाठी अंधार हा गरजेचा असतो .... परंतु चांदण रातीत प्रकाश असल्यामुळे चोराला पकडला जाण्याची भिती वाटते
म्हणून ही म्हण वापरली आहे....
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 4380
4
चोर जेव्हापण चोरी करतो तर ते जे कृत्य असते ते घृणास्पद, दंडात्मक असते. आणि त्याला क्षणोक्षणी आपण पकडले जाण्याची भीती असते.

चांदण्याची उपमा आपण ह्यासाठी देतो कारण आकाशात असंख्य तारे असतात पण जे चमचम करतात त्यांना आपण चांदण्या म्हणतो अगदी बरोबर ना.. म्हणजे आहेत असंख्य पण काही चांदण्या जास्त चमकतात आणि पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात.

अगदी तसेच चोरी केलेली व्यक्ती सारखी लपत असते, पळत असते आणि स्वताःचा बचाव करण्यासाठी खोट बोलत असते. आणि ह्याच पळपळ फडफड करण्यात ती पकडली जाते..

म्हणुन म्हणतात "चोराच्या मनात चांदणे"..अर्थात त्याला आपण पकडले जाऊ अशी भीती असते.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 75305
0

चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ:

अर्थ: वाईट काम करणारा माणूस नेहमी साशंक असतो. त्याला सतत भीती वाटते की त्याचे दुष्कृत्य उघडकीस येईल.

उदाहरण: रमेशने परीक्षेत कॉपी केली, त्यामुळे तो Result लागेपर्यंत टेन्शन मध्ये होता, यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणे.

इंग्रजीमध्ये: A guilty conscience needs no accuser.

टीप: ह्या म्हणीचा उपयोग बहुतेक वेळा उपदेश देण्यासाठी किंवा एखाद्याच्या भीतीवर प्रकाश टाकण्यासाठी केला जातो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

शब्दसमूहांबद्दल एक शब्द, जाणून घेण्याची इच्छा असणारा?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द: एक मेकांवर अवलंबून असणे?
समाज या शब्दाचा सविस्तर अर्थ काय होतो?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
अशुद्ध शब्द ओळखा: आशीर्वाद, खेळणी, महत्त्व, निपुण?
अशुद्ध शब्द ओळखा?
मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा?