2 उत्तरे
2
answers
वन्दे मातरम् चा अर्थ काय आहे?
3
Answer link
१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. त्यावेळी हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं प्रतिकही.. सर्वजण् वंदे मातरम त्याच जोशात म्हणायचे. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.
मुळात वंदे मातरम् बंगाली-संस्कृत मिश्रित असल्याने काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत वंदे मातरमचा संपूर्ण अर्थ आपल्या मायमराठीत...
चला तर जाणून घेऊ काय आहे आपल्या राष्ट्रीय गीताचा नेमका अर्थ :
मूळ 🇮🇳 वंदे मातरम् !🇮🇳
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
मराठी स्वैर अर्थ :
हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो.
शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम !
🇮🇳जय हिंद जय भारत🇮🇳

0
Answer link
वन्दे मातरम् ह्या संस्कृतप्रचुर बंगाली भाषेतील गीताचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
- वन्दे मातरम्: मी तुझ्या चरणी वंदन करतो, हे माते!
- सुजलाम् सुफलाम्: तू उत्तम पाणी आणि फळांनी परिपूर्ण आहेस.
- मलयज शीतलाम्: तू मलाय पर्वतावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्यासारखी आहेस.
- शस्य श्यामलाम्: तू धान्यांनी समृद्ध आणि हिरवीगार आहेस.
- मातरम्: हे माते, मी तुझ्या चरणी वंदन करतो.
- शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्: तू शुभ्र चंद्राच्या प्रकाशात आनंदित आहेस.
- फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम्: तू फुललेल्या फुलांनी आणि पानांनी बहरलेल्या वृक्षांनी सुंदर दिसत आहेस.
- सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्: तू हसमुख आणि मधुर बोलणारी आहेस.
- सुखदाम् वरदाम्: तू सुख आणि आशीर्वाद देणारी आहेस.
- मातरम्: हे माते, मी तुझ्या चरणी वंदन करतो.
भावार्थ: या गीतामध्ये भारतमातेचे सौंदर्य, समृद्धी आणिDesire देवी Durge दैवी गुण यांचे वर्णन केले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: वन्दे मातरम् - विकिपीडिया