MPSC - राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा

MPSC म्हणजे काय आणि MPSC चा पेपर कसा असतो?

5 उत्तरे
5 answers

MPSC म्हणजे काय आणि MPSC चा पेपर कसा असतो?

21

        MPSC -
Maharashtra Public Service Commission
ही परीक्षाचेचा अभ्यास हा इ. 4 पासून 12 आणि BA पर्यंत असतो. ही परीक्षा Science, Art & comerse यातील कोणताही पदवीधर देऊ शकतो.

MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?

सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?

सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?

स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?

तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?

जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.

पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.

सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.

उत्तर लिहिले · 12/12/2017
कर्म · 545
11
एमपीएससी (MPSC) म्हणजे काय? 
MPSC(एमपीएससी)चा अभ्यासक्रम कसा असतो?
सर्वात आधी जाणून घेऊयात MPSC म्हणजे काय?
MPSC म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे. 

लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते – 

– राज्यसेवा परीक्षा
– महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 
– महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 
– महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा 
– महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा 
– दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा 
– साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा 
– पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 
– विक्रीकर निरीक्षक परीक्षा 
– साहाय्यक परीक्षा 
– लिपिक-टंकलेखक परीक्षा 

राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते- 
गट अ
– उपजिल्हाधिकारी (गट अ) 
– पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ) 
– साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ) 
– उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ) 
– उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ) 
– महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ) 
– मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ 
– अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ) 
– तहसीलदार (गट अ) 
गट ब
– साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब) 
– महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब) 
– कक्ष अधिकारी (गट ब) 
– गटविकास अधिकारी (गट ब) 
– मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब) 
– साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब) 
– उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब) 
– साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब) 
– नायब तहसीलदार (गट ब) 
महसूल सेवा 

उपजिल्हाधिकारी :- 

हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो. 

नेमणुका – उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप 
पुढीलप्रमाणे आहे- 

– उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी. 
– विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे. 
– निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे. 

तहसीलदार :- 

या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे – 
– तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत. 
– तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत. 
– आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात. 

नायब तहसीलदार :- 

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे- 

– तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात. 
– महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात. 
– शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत. 
– महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात. 

महाराष्ट्र पोलीस सेवा :- 

राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे- 
– गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे. 
– अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात. 
– शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात. 

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा :- 

शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते. 

राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत – 

– या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते. 
– शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. 
– कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात. 

विक्रीकर (व्हॅट) विभाग :- 

विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते. 
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे. 

विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या – प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर 
निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात. 

मोटार वाहन विभाग :- 

हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत – 

शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते. 

राज्य उत्पादन शुल्क विभाग :- 

उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो. 
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात. 

राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक :- 

या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत- 
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. 
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.

_🚨 *MPSC मुख्य परिक्षेमध्ये कोणते कोणते विषय किती किती मार्कसाठी विचारले जातात ?*_
 
_💁 *राज्यसेवा परीक्षा :*_

_👀राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते._

_👉 *परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :*_

_*गट-अ*_

_● Deputy Collector_
_● Deputy Superintendent of Police (DySP)_
_● Assistant Commissioner of Police (ACP)_
_● Sub-registrar Cooperative Societies_
_● Deputy Chief Executive Officer_
_● Block Development Officer (BDO)_
_● Tahsildar_
_● Desk Officer_
_● Assistant Regional_
_● Transport Officer (ARTO)_
_● M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service)_
_● Chief Officer (Nagarpalika) ( I & II)_
_● Assistant Commissioner of Sales Tax_
_● Mantralaya Section Officer_

_*गट-ब*_
_● Taluka Inspector of Land Records (TILR)_
_● Naib Tahsildar_

_✔ *पूर्व परीक्षा :* पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचावेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे._

_✔ *मुख्य परीक्षा :* यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात._

_🔸 *पेपर-1 :* मराठी गुण-100 वेळ-तीन तास_

_🔸 *पेपर-2 :* इंग्रजी गुण-100 वेळ -तीन तास_

_🔸 *Paper – I* – History & Geography_

_🔸 *Paper –II –* Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law_

_🔸 *Paper – III –* Human Resource Development (HRD) & Human Rights_

_🔸 *Paper – IV –* Economics of Planning & Development Science &Technology Development_

_▪चारही पेपर हे बहुनिष्ठबहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदविस्तरावरची असते, 3:1 या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पद्धत असेल (चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल) प्रत्येकी पेपर 150 गुणांचाअसेल व वेळ दोन तास असतील._

_▪प्रत्येक पेपर मध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45%गुण व राखीव वर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवण आवश्यक आहे._

_🗣 *मुलाखतीसाठी 100 गुण असतील.*_
उत्तर लिहिले · 14/9/2019
कर्म · 569225
0

MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission). ही महाराष्ट्र सरकारमधील पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणारी एक संस्था आहे.

MPSC परीक्षेचे स्वरूप:

MPSC परीक्षा विविध पदांसाठी घेतली जाते, जसे की राज्यसेवा (Rajyaseva), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) इत्यादी. प्रत्येक पदासाठी परीक्षेचे स्वरूप वेगळे असते, परंतु साधारणपणे परीक्षा तीन टप्प्यात होते:

  1. पूर्व परीक्षा (Preliminary Examination):
    • ही परीक्षा चाळणी परीक्षा असते, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQs) विचारले जातात.
    • पेपर १: सामान्य अध्ययन (General Studies) - १५० प्रश्न, गुण २००
    • पेपर २: CSAT (Civil Services Aptitude Test) - ८० प्रश्न, गुण २००
  2. मुख्य परीक्षा (Main Examination):
    • मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) आणि वस्तुनिष्ठ (Objective) दोन्ही प्रकारची असू शकते, हे पदावर अवलंबून असते.
    • उदाहरणार्थ, राज्यसेवा मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन (General Studies) आणि मराठी व इंग्रजी या भाषांवर आधारित पेपर असतात.
  3. मुलाखत (Interview):
    • मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
    • मुलाखतीत उमेदवाराची बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्ये तपासली जातात.

MPSC परीक्षा तयारीसाठी काही महत्वाचे मुद्दे:

  • अभ्यासक्रम (Syllabus): MPSC च्या वेबसाइटवरून अभ्यासक्रम डाउनलोड करा.
  • वेळेचे नियोजन: प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या.
  • मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका: मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा.
  • संदर्भ साहित्य: योग्य पुस्तके आणि नोट्स वापरा.
  • Current Affairs : चालू घडामोडींवर लक्ष ठेवा.

MPSC च्या अधिक माहितीसाठी आणि अभ्यासक्रमासाठी तुम्ही खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

  • MPSC अधिकृत वेबसाइट: mpsc.gov.in
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 840

Related Questions

मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, पण मला माझ्या आसपासच्या वातावरणात खूप वाईट वाटते, त्यामुळे माझ्या मनात नेहमी नकारात्मक विचार येतात. काय करू, काही समजत नाहीये?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, नागपूर याविषयी माहिती मिळेल का, उत्तरे आणि पेपर?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, नागपूर याविषयी माहिती मिळेल का?
स्पर्धा म्हणजे काय? पूर्ण स्पर्धेमध्ये अल्पकाळात प्रयत्न कशाप्रकारे समतोल साध्य करतात?
अशी कोणती स्पर्धा परीक्षा आहे ज्यात घोटाळे होत नाहीत? हुशार मुलांना मागे ठेवून पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा दिली जाते? मग मी कुठल्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे? माझं Diploma in Civil झाले आहे, आता Engineering करत आहे?
स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व गरज काय आहे, ते कसे लिहावे?