व्यक्तिमत्व
डॉ बाबासाहेबा विषयी संपूर्ण माहिती मिळेल का ?
मूळ प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पूर्ण माहिती मिळेल का?
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर, १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र्य भारताचे पहिले ‘कायदा मंत्री’ आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबासाहेब’ चा अर्थ ‘पिता’ किंवा 'वडील' असा आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, धूरंधर, यूगधंर, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे. जगभरातील आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी जय भीम हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात. ‘जय’ चा अर्थ ‘विजय’, ‘भीम’ चा अर्थ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ’ आणि ‘जयभीम’ या संयुक्त शब्दाचा अर्थ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ असा आहे. ‘जयभीम’ या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी असलेल्या एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वत: बाबासाहेब ‘‘जय भीम’’ लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले. आधुनिक भारतातील प्रथम समतावादी पुरूष हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते.[१][२][३][४] इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे.[५][६] भारतीय बौद्धांसाठी डॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, हि बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषद मधिल आलेल्या बौद्ध भिक्खुंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते. जातिव्यवस्थेविरूद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पिडीत, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती सुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते.
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0

1 उत्तर
1
answers
डॉ बाबासाहेबा विषयी संपूर्ण माहिती मिळेल का ?
20
Answer link
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ –६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत,राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचेकैवारी, स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. याशिवाय बहुआयामी व बहुश्रुत व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. आंबेडकर हेसमाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार,शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, प्राध्यापक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी, मजूरमंत्री आणि भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक सुद्धा होते.भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री
कार्यकाळ
१५ ऑगस्ट १९४७ – सप्टेंबर १९५०राष्ट्रपतीराजेंद्र प्रसादपंतप्रधानजवाहरलाल नेहरूमागीलपद स्थापितपुढीलचारू चंद्र बिस्वार
भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष
कार्यकाळ
२९ ऑगस्ट १९४७ – २४ जानेवारी १९५०
मजूर मंत्री, व्हाईसरॉय एक्झीकेटिव्ह काऊंसिल
कार्यकाळ
इ.स. १९४२ – इ.स. १९४६मागीलफेरोज खान नूनटोपणनाव:बाबासाहेब, बोधीसत्त्व, भीमाजन्म:एप्रिल १४, इ.स. १८९१
महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारतमृत्यू:६ डिसेंबर, १९५६ (वय ६५)
दिल्ली, भारतचळवळ:नव-बौद्ध चळवळ व इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहेशिक्षण:मुंबई विद्यापीठ
कोलंबिया विद्यापीठ
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
ग्रेज इन्, लंडन
बॉन विद्यापीठ, जर्मनीपदव्या:बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-अॅट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या)संघटना:बहिष्कृत हितकारिणी सभा
समता सैनिक दल
स्वतंत्र मजूर पक्ष
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
पीपल्स एज्युकेशन सोसायटी
द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
भारतीय बौद्ध महासभा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाअवगत भाषा:मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली,संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच व पारशी.कार्यक्षेत्र:समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,कायदेपंडित, राजकारणी,मानववंशशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ,पत्रकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ,तत्त्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, लेखक, मानवी हक्कांचे कैवारी, समाज सुधारक, जलशास्त्रज्ञ इत्यादी.पत्रकारिता/ लेखन:मूकनायक (१९२०)
बहिष्कृत भारत (१९२७)
समता (१९२८)
जनता (१९३०)
प्रबुद्ध भारत (१९५६)पुरस्कार:भारतरत्न (१९९०)प्रमुख स्मारके:चैत्यभूमी, मुंबई
दीक्षाभूमी, नागपूरधर्म:नवयान बौद्ध धर्मप्रभाव:गौतम बुद्ध • संत कबीर
महात्मा फुले • जॉन ड्युई
ज्यां-जाक रूसो • व्हाल्टेअर
थॉमस पेन • बैंथम
जॉन स्टुअर्ट मील • हेरॉल्ड लॉस्की
अब्राहम लिंकन • वाशिंगटन
नेपोलियन बोनापार्ट • एडवीन सेलिग्मनप्रभावित:आचार्य अत्रे • ख्रिस्तोफर जेफेलेट
गाडगे महाराज • युजेन इर्श्चिक
के.आर. नारायणन • मार्गारेट बार्नेट
एलिनॉर झेलियट • गेल ऑम्वेट
नरेंद्र मोदी • रावसाहेब कसबे
अमर्त्य सेन • डी. आर. जाटव
मायावती • कांशीराम
आमिर खान • ल्युडवीन व्हॉन माईजेस
पंजाबराव देशमुख • सदा करहाडे
गंगाधर पानतावणे • म. ना. वानखेडे
यशवंत मनोहर • नामदेव ढसाळ
ताराचंद्र खांडेकर • अरूंधती रॉयवडील:सुभेदार रामजी मालोजी सकपाळआई:भीमाबाई रामजी सकपाळपत्नी:रमाबाई आंबेडकर
डॉ. सविता आंबेडकरअपत्ये:यशवंत देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते.[१][२][३][४] इ.स. २०१२मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीयम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादीप्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीम्हणून घोषित केले आहे.[५][६] भारतीय बौद्धांसाठीडॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, ही बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खुंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामाबाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्वसंबोधले होते. जातिव्यवस्थेविरूद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंतीसुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणार्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणिलंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळवलेल्या आहेत.
सुरुवातीचे जीवन
मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधीलमहू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे कुटूंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेले महारकुटुंब होते. वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले, त्यामुळे कुणी भीम, भीमा व भिवा नावानेही त्यांना हाक मारत. भीमरावांचे कुटूंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरीजिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्याआंबडवे गावचे होते. (आंबडवे या गावचा अंबावडेअसा चूकिचा उल्लेख पूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[८][९][१०][११] त्यांचे पूर्वज ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांच्या वडिलांनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना, आणि विशेष करून भीमरावाला शिक्षण देऊन, ज्ञानोपासनेची प्रेरणा दिली. इ.स. १८९६ मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या, म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली.इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनीइ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनीसातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही अंबावडेकर असा चूकीचा उल्लेख केलेला आहे)[१२] सातार्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचेआंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.
पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरून इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि हे कुटुंब मुंबईलानेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[१३] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांनाहिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरश: भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, “ज्या ग्रंथात केवळब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आणि शूद्र वअस्पृश्यांची नालस्ती केली आहे, ते महाभारत वरामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले? तेव्हा वडील म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण व कर्ण ही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही रामायणाचा कर्ता झाला. वडिलांच्या युक्तिवादात त्यांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही, हे त्यांच्या वडीलास स्पष्ट शब्दात सांगितले की, मला भीष्म,द्रोण, किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. रामहीमला आवडत नाही. यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले[१४] आणि त्यामुळे भीमराव तेथूनचबुद्धांकडे वळले. रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.इ.स. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्याएलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्नदापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रविषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांना यशवंत हा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी या दु:खी सुपुत्राने उदार ह्रदयी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला कोलंबिया विद्यापीठातउच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.बी.ए. (बॅचेलर ऑफ आर्ट्स)
भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.
महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर अत्यंत प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे दि. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकार्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत दि. १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता न्यूयॉर्क येथे पोहचले.
बडोदा संस्थानचे स्कॉलर असलेले बाबासाहेब परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतीलन्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले.अर्थशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र,मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया विद्यापीठाच्या धईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४ वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले, कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील त्यांचा एक वर्गमित्र सुद्धा तेथेच होता.
एम.ए. (मास्टर ऑफ आर्ट्स)
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए. ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात पुढे पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय हे लंडनहूनन्यूयॉर्कला आलेले होते. असेच एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तिथे आले. प्रा. सेलिग्मन यांचे संपूर्ण नाव एडविन रॉबर्ट अॅन्डरसन सेलिग्मन होय. त्यांनी सुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत."
प्रा. सेलिग्मन ज्यू धर्मीय होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबाबत म्हणतात, ‘अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील १९१३ ते १९१६च्या वास्तव्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक आले. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना आंबेडकरांना अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्रा. एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते.
पीएच.डी.
‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ (The National Divident of India : A Historical And Analytical Study) हा भीमराव आंबेडकरांचा पीएच.डी.साठीचा विषय होता. त्यांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध लिहिला. अवघ्या २५ वर्षांच्या भीमराव आंबेडकरांनी एवढ्या गहन विषयावर प्रबंध लिहून ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधाकडे वेधून घेतले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना आदरपूर्वक अर्पण केला. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. या ग्रंथात ब्रिटिशांवर प्रखर टीका करून आपण खरे राष्ट्रभक्त असल्याचे २६ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले. दिनांक ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसारभारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी(Caste in India : Their Mechanism, Genesis And Development) हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या सार्याच विद्वानांचे लक्ष वेधले. द अमेरीकन जर्नल ऑफ सोसिओलॉजी (American Journal of Sociology) या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङमय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या सन्मानार्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांनी आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या (Anthropology) शाखांमार्फत चालणार्या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धांत उभा केला.
अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातले चित्र आणि अमेरिकेतील चित्र वेगवेगळे दिसून आले. इथे शिवाशिवीचा/ अस्पृश्यतेचा प्रश्नच नाही, कोणत्याही प्रकारची मानहानी नाही. अमुक विषय घ्यायचा तमुक विषय घ्यायचा नाही असे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कारण अमुकच जातीत जन्म घेतला आहे. अमुक जातीतील जन्मामुळे केस कापणे, कपडे लाँड्रीला देणे, वाहनात बसू न देणे, पिण्याचे पाणी न देणे, शाळांमध्ये शिक्षक दुरून छड्या मारतात असे चित्र अमेरिकेत पहायला मिळत नव्हते. प्रोफेसर कितीतरी आत्मीयतेने शिकवत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील विद्वान प्रोफेसर सेलिग्मन आणि प्रो. सिगर हे विद्यार्थी भीमरावांशी समतेच्या भूमिकेवर चर्चा करत असत आणि शिकवत असत. या घटनांतूनच डॉ. आंबेडकरांना नवचैतन्य प्राप्त झाले. समतेची मिळालेली अमेरिकेतील वागणूक डॉ. आंबेडकरांच्या मनावर खोलवर बिंबली होती. त्यामुळेच पुढे भारतात आल्यावर त्यांनी समतेवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सारे सामाजिक लढे केलेले दिसून येतात.[१५] कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले”, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाइम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
संपादित पदव्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते आणि त्यांना ही कुशाग्र बुद्धी आणि तल्लख स्मरणशक्ती ईश्वरदत्त नव्हे तर आपल्या प्रचंड मेहनतीने मिळाली होती.
इ.स. १९१२ मध्ये बी.ए., इ.स. १९१५ मध्ये डबल एम.ए., इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ.स. १९२१मध्ये एम.एस्सी., इ.स. १९२२ मध्ये बार-अॅट-लॉ,इ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ.स. १९५२ मध्ये एल्एल.डी., इ.स. १९५३ मध्ये डी.लिट् आणि इतर अशा सर्व मिळून एकूण ३२ पदव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केल्या होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ २० व्या शतकातील सर्वात बुद्धिमान भारतीय होते असं नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती आहेत. २० व्या शतकात जगभरात अनेक प्रचंड बुद्धीचे व्यक्ती होऊन गेलेत त्यातही बाबासाहेब नाव अगदी सर्वात वरच्या स्थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नुकतेच जगातील सर्वात महान प्रतिभावंत (बुद्धिवंत) म्हणून इंग्लडच्या केब्रिज यूनिवर्सिटीने घोषित केले आहे. त्यांनी बाबासाहेबांवर संशोधन केले आणि त्यातून समोर आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल६४ विषयांत मास्टर होते. आणि एवढ्या संख्येच्या विषयांवर प्रभुत्व असणार्या बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या जवळपासही कुणाची प्रतिभा किंवा एवढ्या विषयांत प्रभुत्व नाही. जागतिक इतिहासात सर्वात जास्त ज्ञानसंपन्न मणुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. सिम्बॉल ऑफ नॉलेज (ज्ञानाचे प्रतिक) म्हणूनही बाबासाहेबांचा गौरव केला जातो. बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम आणि बुद्धिमान वकील होते. तसेच त्यांनी उलटतपासात अनेकांची भंबेरी उडवली व खटल्यातील सत्य न्यायालयामसोर उघड करून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला, याची फार कमी लोकांना माहिती असेल. बॅ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने माढा तालुका न्यायालय व सोलापूर जिल्हा न्यायालय पावन झालेले आहे. बॅ. बाबासाहेब जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेताना त्यांना अतोनात त्रास झाला. बॅरिस्टर होऊन ते ज्यावेळी भारतात आले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली चालू केली तेव्हा त्यंना अस्पृश्तेचा कटू अनुभव आला. बार लायब्ररीमध्ये ते ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाकडे उच्चभ्रू समाजातील वकील फिरकत नव्हते.खरे म्हणजे तो प्रसंगच त्यांचे पुढील अस्पृश्तेविरूद्धच्या लढय़ाचे स्फुलिंल्ग ठरला व त्यांनी अस्पृश्तेविरूद्ध लढा देण्याचे ठरविले. बॅ. बाबासाहेबांचा उलट तपास अत्यंत भेदक होता. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात थोर विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यच्यावर कडक शब्दात टीका केलेली होती. भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यच्याविरूद्ध खटला दाखल केला होता. बॅ. बाबासाहेब व शंकरराव मोरे, शंकरराव जेधे यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य होते. तरीही त्यांनी आपले वकीलपत्र बॅ. आंबेडकरांना दिले. या खटल्याच्य सुनावणीच्यावेळी बॅ. आंबेडकरांनी अण्णासाहेब भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांच्या उलटतपास अपूर्ण राहिला व त्यांनी पुढील तारीख घेतली. आण्णासाहेब भोपटकर महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ विचारवंत, त्यांची एवढी दमछाक झाली की, त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. बॅ. बाबासाहेब यांची कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे. पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला. ते घटनेचे शिल्पकार झाले. ज्या उच्च न्यायालयात त्यांना अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला त्या उच्च न्यायालयाचे कामकाज आज बॅ. आंबेडकरांनी तयार केलेल राज्यघटनेनुसार चालते, हा एक न्यायच आहे.
अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९१९ बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी डॉ. आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग वआरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. डॉ. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केलीइ.स. १९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथील चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
संपूर्ण देशात बहुसंख्य दलितांवर सवर्ण लोकांनी गुलामगिरी लादलेली होती. देशातील दलितांना उच्चवर्णीयांकडून खूप अपमानास्पद वागणूक मिळत होती. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा साधा अधिकार देखील नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी. के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. त्यानुसार सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालये, बगीचे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असे ठरले. या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. त्यामुळेच अस्पृश्यांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. बाबासाहेबांनी १९ मार्च व २० मार्च इ.स. १९२७ रोजी महाड येथे कुलाबा परिषद भरवली. या परिषदेचे अध्यक्ष स्वत: बाबासाहेब होते. या परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधर पंत सहस्रत्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले.
स्पृश्य (सवर्ण) लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे.स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजाविण्याच्या कामात मदत करावी.मृत जनावरे ज्याची त्यांने ओढावी.स्पृश्यांनी अस्पृश्य विद्याथ्यांना वार लावून जेवण द्यावे.
परिषदेच्या या सभेमध्ये असे ठरले की, सर्व प्रतिनिधींनी तेथे जाऊन पाणी प्यायचे त्यानुसार दुसर्या दिवशी म्हणजेच २० मार्च १९२७ रोजी परिषदेतील सर्वांनी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवला. डॉ. बाबासाहेबांनी सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने पिले, त्यानंतर सत्याग्रहातील त्यांच्या सर्व अनुयायांनी त्यांचे अनुसरण करत तळ्याचे पाणी पिले. ही मानवतावादी घटना रूढीवादी स्पृश्य हिंदूंना सहन झाली नाही. त्यांनी हजारों दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली त्यानंतर दलितांवर लाठ्यां-काठ्यांनी हल्ले केले आणि दलितांनी तळे बाटवले म्हणून त्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले.. पुढेमहाडच्या नगरपालिकेने अस्पृश्यांना चवदार तळे खुले केल्याचा ठरावही रद्द केला. त्यामुळे बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरवले. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “आतापर्यंत आम्ही या तलावाचे पाणी पिऊ शकलो नाही. किंबहूना आम्हाला पिऊ दिले नाही. आता आम्ही पाणी प्यालो म्हणजे आमचे दुःख दूर होईल, आमची परिस्थिती सुधारेल किंवा आमच्यावरील अन्याय कमी होईल असा अर्थ नसून हा केवळ एका मानवाने दुसर्या मानवाला समानतेने कसे वागवाने हे सांगण्याचा व सर्व मानवाला समानतेचा अधिकार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.” समतेची मुहूर्तवेढ रोवण्यासाठी जगाच्या पाठीवरील केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केलेला हा बाबासाहेबांचा महान सत्याग्रह इतिहासातील पहिला आणि एकमेव सत्याग्रह म्हणून ओळखला जातो.
बहिष्कृत हितकारिणी सभा
अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेऊन, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. आपल्या समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली. त्यात त्यांनी भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.
मनुस्मृतीचे दहन
मनुस्मृतिकाराची चूक
शूद्रावर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खाली दिलेले आहेत. स्मृतिकाराने अस्पृश्यांवरकेलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचाउल्लेख करावा लागेल.
समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदली असावे.शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याची उपस्थितीत करू नये.इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या जीवासारखी शूद्राच्याजीवास एका कवडीची पण किंमत नाही. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.शुद्राने कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर ते शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये.वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्यांची मुक्ती आहे.उच्चवर्णियांनी शुद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत. शुद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिया करावी.शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.
मनुस्मृतीची होळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो प्रचंड तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. कुप्रसिद्ध मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[१६] मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणार्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून सर्व प्रकारची विषमता व शोषण नष्ट करण्यासाठी समतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेचा पुरस्कर्ता असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले .[१७] या मनुस्मृतीने हिंदू समाजाचे दीड-दोन हजार वर्षे नियमन केलेले होते. आणि त्यामुळे ती, परिषदेच्या ठरावातील भाषेनुसार, शूद्रजातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटवणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करून सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी होती. मनुस्मृतीचे दहन ही घटना म्हणजे इतिहासातील एक महान मूर्तिभंजक कृती होती होती आणि हजाराहून अधिक वर्षाच्या कालावधीत बसला नसेल असा सनातनी हिंदू धर्माला बसलेला तो जबरदस्त धक्का होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दूरगामी होते की, त्या घटनेची तुलना त्यांच्या काही अनुयायांनी ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केले.
१९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावर जोर देऊन म्हटले होते, ‘‘ते एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वत: समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!’’ तेव्हापासून दरवर्षी ‘२५ डिसेंबर’ हा दिवस मनुस्मृती दहन दिन[१८] म्हणून आंबेडकरी समाज हा देशभरचनव्हे तर जगभर साजरा करतो.
मंदिर सत्याग्रहे
अंबादेवी मंदिर सत्याग्रह
हिंदू धर्म हा प्राणी मात्रावर दया करावी, सर्व मानव हे ईश्वरांची लेकरे अशी शिकवण देतो. परंतु याच हिंदू धर्मात त्या ईश्वरांची पूजा करणासाठी देखील बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी एकेकाळी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतीलही प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह डॉ. पंजाबराव देशमुखयांच्या नेतृत्वाखाली २६ जून १९२७ रोजी सुरू झाला. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.
पर्वती मंदिर सत्याग्रह
अमरावती नंतर पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोंबर१९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. सवर्ण हिंदूनी सत्याग्रहींवर शिव्या व काठ्यांचा वर्षाव केला असला तरी सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी केलेला हा एक क्रांतिकारी प्रयत्न इतिहास विसरू शकणार नाही.
काळाराम मंदिर सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामीकाळाराम मंदिर सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे कमिटीचॆ सभासद म्हणून समाविष्ट झाले होते. या कमिटीतर्फे महाराष्ट्रभर सत्याग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली.शंकरराव गायकवाड हे मूळचे निफाड तालुक्यातले, पण नाशिकला ‘मोठा राजवाडा’ परिसरात स्थायिक झाले होते. रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटिश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. शहरात तणावपूर्ण शांतता होती.
अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टिळा अशा वेशात शंकरराव २ मार्चला रामकुंडावर आले व अंगातील वेश उतरवून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत त्यांनी पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वार्यासारखी पसरली. ब्रिटिशजिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.
सत्याग्रह यशस्वी करणार्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठया राजवाड्याच्या परिसरातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल करण्यात आली. सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. डॉ. आंबेडकर यांनी भारतात परतल्यावरदादासाहेब गायकवाड, सावळीराम दाणी, सखाराम वस्ताद काळे, तुळशीराम काळे, अमृतराव रणखांबे, रंगनाथ भालेराव व भादुजी निकाळे यांच्या उपस्थितीत बेलमास्तरांचा सत्कार केला. कर्मवीर शंकरराव गायकवाड यांचे १६ ऑक्टोबर १९५६ ला निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नाशिक-पुणे रोडवर वडाळा नाक्यावरील चौकाचे भूतपूर्व नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते शंकरराव श्रावण गायकवाड ऊर्फ बेलमास्तर चौक असे नामकरण करण्यात आले.[१९] इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनबरोबरकाम केले.