अंतराळ खगोलशास्त्र

आकाशगंगा कशी निर्माण झाली?

1 उत्तर
1 answers

आकाशगंगा कशी निर्माण झाली?

1
आकाशगंगेचा जन्म
त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो.

आकाशगंगा हे, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून ही आकाशगंगा पसरत गेली आहे.

आकाशगंगा
ESO-VLT-Laser-phot-33a-07.jpg
रात्रीच्या आकाशातील पॅरनाल वेधशाळेवरील आकाशगंगेचे केंद्रक
निरीक्षण डेटा (J2000 युग)
प्रकार
Sb, Sbc, किंवा SB(rs)bc[१][२] भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका
वस्तुमान
०.८–१.५×१०१२[३][४][५] M☉
आकार (प्रकाशवर्ष)
१००–१८० kly (३१–५५ kpc)[६] (व्यास)
ताऱ्यांची संख्या
१००–४०० अब्ज (२.५×१०११ ±१.५×१०११)[७][८][९]
हेही पहा: दीर्घिका
सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण २७००० प्रकाशवर्षे दूर आहे.[१०] सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षे आहे.[११][१२]

सूर्य, या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलॅक्टिक इयर म्हणून ओळखला जातो.

आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी (सुमारे २५० अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत.

विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.[ 

आकाशगंगेचा जन्म 
ग्रीक लोककथा 
एके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.


उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 121725

Related Questions

अंतराळात ग्रह कसे फिरतात तेथे हवा का नसते?
सुनिता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिल्या व कशासाठी राहिल्या?
मिशन ज्यूस हे कोणत्या अंतराळ संस्थेचे मिशन आहे?
सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेची माहिती मिळेल का?
सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमांविषयी माहिती लिहा?
सुनीता विलीयम्ससुनिता विल्यम अंतराळात कशासाठी गेल्या होत्या?
जगात असा कोणता देश आहे की तिथे सहा महीने रात्र व सहा महिने दिवस असते तो कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी होते अंतराळात ग्रह कसे फिरतात तिथे हवा का नसते?