अंतराळ

सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेची माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेची माहिती मिळेल का?

0
सुनीता विलियम्स चे प्रारंभिक जीवन – Sunita Williams History
सुनीता विलियम्स चा जन्म सुनीता लिन पांड्या विलियम्स च्या रूपात 19 सप्टेंबर 1965 ला झाला होता. अमेरीकेतील ओहियो राज्यात युक्लिड नगर (क्लीवलैंड) त्यांचा जन्म झाला. नीदरम, मैसाचुसेट्स येथे सुनिता लहानाची मोठी झाली आणि शालेय शिक्षण प्राप्त केले.

सुनीता विलियम्स चे शिक्षण – Sunita Williams Education
सुनीता विलियम्स ने 1983 साली मैसाचुसेट्स येथुन हायस्कुल चे शिक्षण पुर्ण केले पुढे 1987 ला संयुक्त राष्ट्राच्या नौसैनिक अकादमीतुन फिजीकल सायन्स या विषयात बीएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सुनिता ने 1995 ला फ्लोरिडा इंस्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी येथुन इंजिनियरींग मॅनेजमेंट मधुन मास्टर ऑफ सायन्स (एम.एस.) पदवी प्राप्त केली.

सुनीता विलियम्स चे कुटुंब – Sunita Williams Family
सुनिताचे वडिल दिपक एन. पांड्या डॉक्टर असुन एक प्रसिध्द शास्त्रज्ञ देखील आहेत. ते मुळचे भारतातल्या गुजराज राज्यातील आहेत. सुनिताच्या आईचे नाव बॉनी जालोकर पांड्या असुन त्या स्लोवेनिया येथील आहेत. सुनिताला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहिण देखील आहे. त्यांची नावं जय थॉमस पांडया आणि डायना एन, पांडया आहे.

सुनिता चे वय ज्यावेळी एक वर्षापेक्षा देखील कमी होते त्यावेळीच तीचे वडिल अहमदाबाद येथुन अमेरीकेला स्थायीक झाले. हे बहिण भावंड आपल्या आजी आजोबा, बरेचसे काका काकु चुलत भावंडांपासुन दुर जाण्यास ईच्छुक नव्हते तरी देखील वडीलांच्या नौकरीमुळे त्यांना अमेरिकेला स्थानांतरीत व्हावे लागले. अंतराळाची सफर करणारी भारतीय वंशाची दुसरी महिला सुनीता विलियम्स ने आपल्या आई वडिलांकडुन प्रेरणा घेतली आहे.

सुनिता चे वडिल फार सरळ स्वभावाचे आहेत सामान्य जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास आहे. वडिलांचे हे विचार सुनिताला फार प्रभावित करतात. सुनिताची आई बॉनी जालोकर पांड्या यांनी आपल्या कुटुंबाला एका सुत्रात बांधण्यात यश मिळवले आहे.

नात्यांची मुल्य जपणं आणि नात्यांचा गोडवा टिकवुन ठेवणं यावर त्या भर देतात या सोबतच निसर्ग मुल्यांची त्यांना चांगली जाण आहे. प्रकृतीच्या मुल्यांची जाणीव सुनिताला आपल्या आईकडुन संस्कारात मिळाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुनिता आपला रोल मॉडल मानते त्यांच्या विचारांवर चालण्याचा ती नेहमी प्रयत्न करते.

सुनिता जेव्हां 1995 ला Florida Institute of Technology मधुन M.Sc. Engineering Mgmt. चे शिक्षण घेत होती तेव्हां तीची भेट माइकल जे. विल्यम्स् यांच्याशी झाली. हळुहळु मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यांनतर दोघांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. माइकल जे. विल्यम्स् एक नौसेना चालक, हेलीकॉप्टर पायलट, परिक्षण पायलट, नौसैनिक आणि जलतरणपटु देखील आहेत.

1987 ला नौसेनेशी जोडली गेली सुनीता विलियम्स – Sunita Williams Career
मुळ भारतिय वंशाची अमेरीकी नौसेना कॅप्टन सुनीता विलियम्स इतर मुलींपेक्षा वेगळी होती.लहानपणापासुन काहीतरी वेगळं करण्याचे तीचे स्वप्नं होते. जमीन आकाश आणि समुद्र या तीनही ठिकाणी तीला जायचं होतं. बहुदा म्हणुनच मे 1987 ला अमेरिकी नेवल अकॅडमी च्या माध्यमातुन ती नौसेनेशी जुळली आणि त्यानंतर हेलीकॉप्टर पायलट झाली.

6 महिन्यांच्या नेवल तटवर्ती कमांड मधील अस्थायी नियुक्ती नंतर सुनिता ला ’बेसिक डाइविंग ऑफिसर’ या पदावर निवडण्यात आले. पुढे तीला नेवल एयर टेªनिंग कमांड म्हणुन ठेवले व जुलै 1989 मधे तीला नेवल एवियेटर चे पद देण्यात आले. त्यानंतर सुनिता यांची नियुक्ती ’हॅलीकॉप्टर कॉम्बैट सपोर्ट स्क्वाड्रन’ म्हणुन करण्यात आली
1998 साली सुनिता यांची निवड NASA करीता झाली त्यावेळी त्या यूएसएस सैपान वरच कार्यरत होत्या. त्यांची एस्ट्रोनॉट कैंडिडेट ट्रेनिंग जॉनसन स्पेस सेंटर मधे ऑगस्ट 1998 ला सुरू करण्यात आली.

सुनीता विलियम्स ने आपल्या चिकाटी, दुर्दम्य आशावाद आणि साहसाने हे टेनिंग यशस्वीरित्या पुर्ण केले त्यानंतर त्यांना 9 डिसेंबर 2006 मधे अंतरिक्षयान ’डिस्कवरी’ मधुन ’आंतराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात’ पाठविण्यात आले तेथे त्यांना एक्सपीडिशन 14 या दलात सहभागी व्हायचे होते.

एप्रील 2007 मधे रूस च्या अंतरीक्ष यात्रीला बदलण्यात आले त्यामुळे हे एक्सपीडिशन 15 झाले.एक्सपीडिशन 14 आणि 15 दरम्यान सुनीता विलियम्स यांनी तीन स्पेस वाक केले.

6 एप्रील 2007 ला त्यांनी अंतराळातच ’बोस्टन मॅराथन’ मध्ये सहभाग घेतला आणि त्याला सुनिता यांनी फक्त 4 तास 24 मिनीटांमधेच पुर्ण केले. या स्पर्धेमुळे सुनीता विलियम्स अंतराळात मॅराथन मधे धावणारी पहिली व्यक्ती ठरली आणि 22 जुन 2007 ला ती पृथ्वीवर परतली

लहानपणापासुन अंतराळात उडण्याचे सुनीता विलियम्स ने पाहिलेले स्वप्नं 9 डिसेंबर 2006 ला पुर्ण झाले ज्यावेळी ती पहिल्यांदा अंतराळात गेली. तीची ही पहिली अंतराळ यात्रा स्पेस शटल डिस्कव्हरी च्या माध्यमातुन सुरू झाली.

आपल्या पहिल्या अंतराळ यात्रे दरम्यान भारतिय वंशाची सुनीता विलियम्स अंतराळात एकुण 321 दिवस 17 तास आणि 15 मिनीटं राहीली. सुनीता विलियम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन च्या स्थायी अंतराळ यात्री चमु ची फ्लाईट इंजिनीयर होती पुढे ती स्थायी अंतराळ यात्री दल 15 ची देखील फ्लाईट इंजिनीयर झाली.

यासोबतच ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन ची कमांडर होणारी जगातील दुसरी महिला देखील आहे. आपल्या दुसऱ्या अंतराळ यात्रे दरम्यान सुनीता विलियम्स ने तीन स्पेस वाॅक देखील केलेत.

उत्तर लिहिले · 26/1/2023
कर्म · 7460

Related Questions

अंतराळात ग्रह कसे फिरतात तेथे हवा का नसते?
सुनिता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिल्या व कशासाठी राहिल्या?
मिशन ज्यूस हे कोणत्या अंतराळ संस्थेचे मिशन आहे?
सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमांविषयी माहिती लिहा?
सुनीता विलीयम्ससुनिता विल्यम अंतराळात कशासाठी गेल्या होत्या?
जगात असा कोणता देश आहे की तिथे सहा महीने रात्र व सहा महिने दिवस असते तो कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी होते अंतराळात ग्रह कसे फिरतात तिथे हवा का नसते?
भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळ संशोधनात घेतलेल्या गरुड भरारीचे वर्णन सहा ते आठ ओळीत तुमच्या शब्दात कसे लिहाल?