प्रॉपर्टी

NA प्लॉट किंवा Non NA म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

NA प्लॉट किंवा Non NA म्हणजे काय?

5
जमिनीचे साधारणतः दोन प्रकार शासनाने ठरवून दिलेले आहेत.
१) Agriculture Land
२) Non Agriculture Land ज्याला आपण NA म्हणतो.

एखादी जागा जर Agriculture Land असेल तर त्या जागेवर कोणतेही कमर्शियल बांधकाम करता येत नाही. ती जागा शेतीसाठीच वापरली गेली पाहिजे असा नियम आहे. तसेच ती जागा शेतकऱ्यालाच विकली पाहिजे असाही नियम आहे. म्हणून अश्या जागेवर बांधकाम करायचे असेल तर ती जागा नगरपालिका, किंवा जिल्हा परिषदेकडून NA करून घ्यावी लागते.
आता शहरिकारणात अश्या अनेक जागा NA करून घेऊन बांधकाम करण्यात येते.
NA म्हणजेच non agriculture जागा. हि जागा राहण्यासाठी बांधकाम, कमर्शियल कॉम्प्लेक्स, इत्यादी साठी वापरता येते. NA आणि Agriculture लँड मध्ये पाणीपट्टी, मालमत्ता कर इत्यादी गोष्टींमध्ये फरक असतो. म्हणून घरासाठी जागा घ्यायची असेल तर लोक NA आहे की नाही हे पाहून घेतात.

उत्तर लिहिले · 2/8/2017
कर्म · 48240
2
NA म्हणजे Non Agricultural. म्हणजेच अशी जमीन जिचा वापर आपल्याला शेती सोडून इतर कामांकरिता करायचा असतो.
Non NA हा शब्द सहसा कुणी वापरत नाही, पण याचा अर्थ शेतीसाठी वापरली जाणारी जमीन होतो.
जेव्हा तुम्हाला शेतजमिनीवर बांधकाम करायचे असते किंवा व्यवसायासाठी ती जमीन वापरायची असते, तेव्हा ती NA असणे गरजेचे असते.
शेतजमीन NA कशी करावी याची प्रोसेस खालील उत्तरात सांगितली आहे.

उत्तर लिहिले · 2/8/2017
कर्म · 283280
0

NA प्लॉट म्हणजे 'नॉन-ॲग्रीकल्चरल प्लॉट' (Non-Agricultural Plot).

  • NA प्लॉट: ज्या जमिनी कृषी कामांसाठी वापरल्या जात नाहीत, त्या जमिनीला नॉन-ॲग्रीकल्चरल जमीन म्हणतात. या जमिनीवर घर बांधणे, औद्योगिक बांधकाम करणे किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे कायदेशीर असते.
  • Non NA: Non NA म्हणजे कृषी जमिनीला बिगरशेती जमिनीत रूपांतर करणे. जर तुम्हाला शेतजमिनीवर बांधकाम करायचे असेल, तर ती जमीन NA करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील वेबसाईटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 29/3/2025
कर्म · 840

Related Questions

फ्लॅटचा प्रॉपर्टी इन्शुरन्स कमीत कमी किमतीमध्ये कसा काढायचा?
मी 20 गुंठे जमीन खरेदी करत आहे, ती माझ्या नावावर होऊ शकते का? यापूर्वी माझ्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी नाही.
ग्रीन प्रॉपर्टी सात बारा वर कशी ओळखावी?
ग्रीन प्रॉपर्टी, येलो प्रॉपर्टी यात काय फरक आहे?
तहसील ऑफिसमधून प्रॉपर्टी व्हॅल्युएशन आणि ७/१२ काढण्याची प्रोसेस सांगा?
प्रॉपर्टी मिळवण्याबाबत तहसीलदार यांना अर्ज कसा करावा?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?