नाव बदल इंटरनेटचा वापर कागदपत्रे

मला नावात बदल करावयाचा आहे तरी तो कसा करावा व नावात बदल करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत याविषयी मार्गदर्शन मिळेल का ?

3 उत्तरे
3 answers

मला नावात बदल करावयाचा आहे तरी तो कसा करावा व नावात बदल करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत याविषयी मार्गदर्शन मिळेल का ?

34
यासाठी तुम्हाला नावात बदलाचे शासकीय राजपत्र(गॅजेट) करून घ्यावे लागेल. ही सुविधा आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे.
ऑनलाईन नाव बदल प्रक्रिया करण्यासाठी खालील स्टेप्स पहा:
१. https://dgps.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लीक करा
२. नंतर ऑनलाईन सेवा या सेक्शनखाली "नावात बदल करणे" या लिंक वर क्लीक करा.

३. नंतर तुमचे अकाउंट तयार करा
४. पुढे येणारी सर्व माहिती भरा.
५. रेशनकार्ड़,शाळेचा दाखला, आधार कार्ड, लग्नाचे सर्टिफिकेट, लग्न पत्रिका, तसेच संबंधित डॉकुमेंट्सच्या स्कॅन फाईल्स जवळ असुद्या आणि योग्य रकान्यात अपलोड करा.
६. नंतर इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाईन फी भरा. (उत्तर लिहिते वेळी फी ३५० रुपये).
७. १५ दिवसात नाव बदलाचे गॅजेट तयार होईल.

हा पुरावा वापरून तुम्ही तुमच्या सध्याच्या कागदपत्रात (जसे कि पासपोर्ट, आधार कार्ड, राशन कार्ड, पण कार्ड, इत्यादी.) बदल करू शकता. यात मात्र वेळ आणि पैसे जातील याची नोंद घ्यावी.
उत्तर लिहिले · 11/5/2017
कर्म · 282915
6
नाव बदलण्याची प्रक्रिया ऑनलाइन;
संगणक निरक्षरांसाठी स्वतंत्र केंद्रे

नाव, आडनाव, जन्मतारीख आणि धर्म बदलाच्या जाहिराती शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठीची छापील अर्ज भरण्याची पद्धत संपुष्टात आणण्यात आली असून आता ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.


नवी प्रक्रिया अशी
ऑनलाइन अर्ज भरताना पासपोर्ट, वाहन चालक परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड यापैकी कुठल्याही एकाची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे.  www.dgpt.mahrashtra.gov.in या वेबसाइटवर बदलाबाबतचे अर्ज करता येतील. शासन राजपत्रही ऑनलाइनच प्रसिद्ध होईल.   20 दिवसांत प्रसिद्धी
आधी बदलाच्या नोंदीची जाहिरात राजपत्रात प्रसिद्ध होण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागत होता. ऑनलाइन प्रक्रियेमुळे आता 15 ते 20 दिवसांत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यामुळे अर्जदार व सरकारच्या वेळ आणि खर्चातही मोठी बचत होणार आहे.
उत्तर लिहिले · 12/3/2019
कर्म · 1245
1
नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापञ कसे करावे
उत्तर लिहिले · 15/10/2021
कर्म · 20

Related Questions

जैविक/सेंद्रिय खते परवाना काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
जमीन खरेदी करताना कोणते कागदपत्रे बघायचे?
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, कसा बदलता येईल?
मी पांढरे रेशनकार्ड धारक आहे, ते मला केशरी करायचे आहे. त्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे माझ्याकडे नाहीत, तर मला माझे रेशनकार्ड कसे बदलून मिळेल?
माझ्या मित्राला आधार कार्ड काढायचे आहे पण कोणतेही कागदपत्रे नाही काय करावे?
पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
शाळा मान्यतेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?