कागदपत्रे निकाल

माझी १० वी ची मार्क लिस्ट हरवली आहे तर काय करावे लागेल?

2 उत्तरे
2 answers

माझी १० वी ची मार्क लिस्ट हरवली आहे तर काय करावे लागेल?

8
Hi मित्रानो आपल्या भविष्याची पहिली पायरी म्हणजे 10th आणि 12th board exam.
     पण कळत-नकळत आपल्या छोट्याश्या चुकीमुळे ते board certificate गहाळ किंवा हरवले जातात व आपण स्वत:ला दोष देत बसतो, पण आता चिंता करण्याची काहीच गरज नाही.
     महाराष्ट् सरकारच्या नविन धोरणानुसार सन 1990 पासुनचे दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता PDF File स्वरूपात DOWNLOAD करता येतील ते कसे आता आपण क्रमा-क्रमाणे जाणुन घेवू.

 
1). खाली दिलेली वेबसाईट open करा.

http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp






2). तुम्ही नविन user असल्यामुळे तुमची details fill up करुन register करा.






3). registration पूर्ण झाल्यावर log in करा.







 4). 10th किंवा 12th select करुन तुमचा seat no. आणि total मार्क fill up करुन submit करा.


 





 
5). तुमच्या समोर result ची एक soft copy दिसेल.






 
6). तुम्हाला जर PDF format मध्ये पाहिजे असतील तर " GET MARKSHEET PDF " OR " GET CERTIFICATE PDF " वर click करा, downloading start होईल व तुम्हाला तुमचा result मिळून जाईल. धन्यवाद🙏
उत्तर लिहिले · 27/4/2017
कर्म · 465
0
तुम्ही जुनी फोटो कॉपी घेऊन तुमच्या शाळेत जा.
तिथून तुम्हाला मुख्यध्यपकांच्या सहीचे एक पत्र देतील त्यात उल्लेख केलेला असेल की तुम्ही कोणत्या वर्षी परीक्षा दिलीये.
ते पत्र घ्या अन तुमच्या जिल्ह्याच्या SSC बोर्ड मध्ये जा.
तिथं तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. फॉर्म अन शुल्क भरा पोहोच घ्या.
१५ दिवसात तुमचा result तुम्हाला मिळून जाईल.
धन्यवाद..
उत्तर लिहिले · 28/4/2017
कर्म · 12915

Related Questions

25 वर्षे जुनी गाडी आरसी मिळेल का व किती खर्च येईल?
महिंद्रा पिकअपसाठी कोणकोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात?
अनुसूचित जातीचा दाखला काढायला 1950 च्या आधीचा कोणता पुरावा जोडावा आणि तो पुरावा कुठे मिळेल? बाकी सर्व कागदपत्रे तयार आहेत.
जैविक/सेंद्रिय खते परवाना काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचे उमेदवार जातीचा दाखला न जोडताच निवडणूक लढवून जिंकले तसेच अनुसूचित जमातीसाठीची राखीव जागा असताना उमेदवाराने खोटे कागदपत्रे सादर करून निवडणूक जिंकली, तर तो उमेदवार अपात्र होण्यासाठी काय करावे लागेल?
शैक्षणिक संस्थेचे बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच अटी काय आहेत?
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराने बोगस कागदपत्रे सादर केले असून गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवलेली असल्यास काय करावे? अर्जाची छाननी करताना आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो का? त्यासाठी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी?