2 उत्तरे
2
answers
जात प्रमाणपत्र कसे काढावे ?
17
Answer link
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जावे लागेल(जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर डिस्ट्रिक मॅजिस्ट्रेट कार्यालयात जावे लागेल). तेथे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज मिळतो. अर्जावरील सर्व माहिती भरा आणि त्यावर सांगितलेले कागदपत्रे जोडा.
प्रत्येक जातीसाठी लागणारे कागदपत्रे वेगळे असू शकतात. जर तुम्ही OBC (इतर मागासवर्गीय) असाल तर अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतील.
OBC साठी आवश्यक कागदपत्रे:
१. ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .
२. पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
३. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)
४. स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा
अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
क. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र
ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
ग. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
विवाहित महिला असल्यास :
अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा
ब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना
अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र [ ]
मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा
शुल्क
रू. 20 + रू. 2.47 सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 32.47/-
हे सर्व जमा केल्यानंतर जर कुणा अधिकाऱ्याला पैसे खायची सवय नसेल तर १५ दिवसात जात प्रमाणपत्र मिळते.