Topic icon

वाळवंट

1





सौदी अरेबिया हा देश त्याच्या नियमांमुळे आणि तेथील लोकांच्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. हा देश श्रीमंत देशांपैकी एक देश मानला जातो.

येथे खनिज तेलाच्या खूप मोठमोठ्या विहिरी आपल्याला पाहण्यास मिळतात. येथे सगळीकडे झगमगाट दिसून येतो. येथे उंचच उंच इमारती देखील पाहण्यास मिळतात. या देशातील खूप भाग हा वाळवंटाने आच्छादलेला आहे.

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. पण तेल किंमतीमध्ये झालेल्या उतरंडीमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या देशाने तेल कामगारांना देण्यात येणारे मानधन कमी केले आहे.

 



या सर्वांमुळे अर्थवव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अलीकडील काही वर्षात सौदी अरेबियाचे सरकार शेकडो चौरस मैल वाळवंटाचे नवीन शहरामध्ये रुपांतर करणार आहे. त्यासाठीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.

या प्रकल्पातून लोकांना रोजगाराचे नवीन साधन मिळेल. अर्थव्यवस्थेला कच्चा तेलापासून दूर नेता येईल. देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून राहणार नाही.

सौदी अरेबियातील हे शहर २०२० च्या अखेरपर्यंत बांधण्याचे ठरवले आहे. या बांधल्या जाणाऱ्या शहराला नॉलेज इकॉनॉमिक सिटी असे नाव देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सौदी अरेबियामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन शहराबद्दल.

 


Saudi arabia's New city.Inmarathi1
businessinsider.in
 

हा नवीन शहर उभारण्याचा प्रकल्प सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. जी अर्थव्यवस्था फक्त तेलावर आधारित आहे, तिचा भार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.

तेलाच्या किंमती काही प्रमाणत कमी झाल्यामुळे असे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने घोषणा केली 




उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121765
0
भारतात उगम पावणारी आणि थरच्या वाळवंटात पोहोचणारी नदी म्हणजे लुनी नदी.

लुनी नदी:

  • लुनी नदीचा उगम राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील अरवली पर्वतरांगेत होतो.
  • ही नदी नैऋत्य दिशेकडे वाहते आणि गुजरातच्या कच्छच्या रणात प्रवेश करते.
  • लुनी नदीची लांबी सुमारे 495 किलोमीटर आहे.
  • या नदीला 'लवणवती' या नावाने देखील ओळखले जाते, कारण या नदीचे पाणी खारे आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 360