Topic icon

Aai

1
ईस्ट इंडिया कंपनी ३१ डिसेंबर १६०० साली स्थापन झाली. त्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते, आणि अकबर हा मुघल बादशाह त्याकाळी होता.
उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 282765
15
🌷म्हणी व अर्थ🌷
🌷एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला------
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे

🌷एक घाव दोन तुकडे------
एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल

🌷एक ना धड भाराभर चिंध्या------
सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण

🌷एक पथ दो काज------
एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे

🌷एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात------
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा

🌷एकटा जीव सदाशिव------
एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते

🌷एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ------
एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो

🌷एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे------
एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी

🌷एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी------
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य

🌷एका पुताची माय वळणीवाटे जीव जाय------
एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷करायला गेलो एक अन् झाले एक------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷करावे तसे भरावे------
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे

🌷करीन ती पूर्व दिशा------
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे

🌷करू गेले काय अन् उलटे झाले काय------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷कवडी कवडी माया जोडी------
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते

🌷कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड------
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते

🌷कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले------
करणे थोडे पण गवगवाच फार

🌷कसायाला गाय धार्जिणी------
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात

🌷का गं बाई उभी, घरात दोघीतिघी------
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो

🌷काकडीची चोरी, फाशीची शिक्षा------
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी

🌷काखेत कळसा अन् गावाला वळसा------
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे

🌷करायला गेलो एक अन् झाले एक------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷करावे तसे भरावे------
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे

🌷करीन ती पूर्व दिशा------
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे

🌷करू गेले काय अन् उलटे झाले काय------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷कवडी कवडी माया जोडी------
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते

🌷कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड------
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते

🌷कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले------
करणे थोडे पण गवगवाच फार

🌷कसायाला गाय धार्जिणी------
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात

🌷का गं बाई उभी, घरात दोघीतिघी------
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो

🌷काकडीची चोरी, फाशीची शिक्षा------
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी

🌷काखेत कळसा अन् गावाला वळसा------
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?------
ज्याला रक्षण करायला ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करुन चोरी केल्यावर कोणालाच सांगता येत नाही

🌷कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच------
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो

🌷कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची तट्टानी------
अतिशय थोर माणूस व अति क्षुद्र माणूस यांची बरोबरी होत नाही

🌷कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं------
लाजलज्जा पार सोडून देणे

🌷कठीण समय येता कोण कामास येतो?------
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही

🌷कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच------
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही

🌷कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी------
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते

🌷कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी------
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही

🌷कर नाही त्याला डर कशाला?------
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही

🌷करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?------
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

🌷करणी कसायची, बोलणी मानभावची------
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर

🌷करायला गेले गणपती अन् झाला मारुती------
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे, नाहीतर त्यातून भलतेच घडते

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷काप गेले नि भोके राहिली------
वैभव गेले नि त्याच्या खुणा राहिल्या / श्रीमंतीचे दिवस गेले, फक्त आठवणी राहिल्या

🌷काम नाही कवडीचं अन् रिकामपण नाही घडीचं------
काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो

🌷कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी------
काम साधण्यापुरते गोड बोलणे

🌷काळ आला होता पण वेळ आली नव्हती------
नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले

🌷काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची------
सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे

🌷कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही------
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

🌷कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते------
पूर्वग्रहदूषिच व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात

🌷काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली------
सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही

🌷शब्दसमूहाबद्दल एक शब्द🌷
   
🌷फार कमी बोलणारा - अबोल

🌷 आधी जन्म घेतलेला - अग्रज

🌷 देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा -   अनुष्ठान

🌷 सीमा नाही असे - असीम

🌷 घरी पाहुणा म्हणून आलेला - अतिथी

🌷 धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

🌷 ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम

🌷थोडक्यात समाधान मानणारा - अल्पसंतुष्ट

🌷 विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य - अतिक्रमण

🌷पायात काहीही न घालणारा - अनवाणी

🌷 कधीही नाश न पावणारे - अविनाशी

🌷 देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म - अवतार

🌷 जाणून घेण्यास अशक्य असे - अज्ञेय

🌷 वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख - अग्रलेख

🌷अनेक चांगल्या गुणांनी युक्त - अष्टपैलू

🌷व्यवसायावर आधारित जाती🌷


🌷आजीवक - भिक्षूक

🌷किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात

🌷कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा

🌷ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

🌷खोत - कोकणातील एक वतनदार

🌷गुरव - शंकराचे पुजारी

🌷धोबी - परीट, रजक

🌷धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

🌷नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

🌷भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

🌷पाथरवट - दगडफोड करणारा

🌷मशालजी - मशाल धरणारा

🌷मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

🌷माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

🌷मोदी - धान्य दुकानदार

🌷मलंग - फकिराचा एक पंथ

🌷माहूत - हत्ती हाकणारा

🌷सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

🌷वडार - दगड फोडणारी एक जात

🌷बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

🌷म्हणी व अर्थ🌷


🌷काट्याचा नायटा करणे------
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे

🌷काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही------
खऱ्या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही

🌷काडी चोर तो माडी चोर------
क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा एखाद्या घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे

🌷काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीत------
थोड्याशा अधिकाराने जे काम होते, ते पुष्कळशा पैशाने देखील होत नाही

🌷कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर------
ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते

🌷कानामागून आली नि तिखट झाली------
मागून येऊन वरचढ होणे

🌷कानाला ठणका नि नाकाला औषध------
रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे

🌷म्हणी व अर्थ🌷


🌷कुडी तशी पुडी------
देहाप्रमाणे आहार

🌷कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस------
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला

🌷कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच------
मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही

🌷कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ------
आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

🌷कुसंतनापेक्षा निसंतान बरे------
वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे

🌷केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले------
पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले

🌷केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी------
अत्यंत गरीब परिस्थिती असणे

🌷केळ्याचा लोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर------
केळीचे पीक भरपूर पैसे देते

🌷कोंड्याचा मांडा करुन खाणे------
आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे

🌷कोरड्याबरोबर ओले जळते-----
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो

🌷कोल्हा काकडीला राजी------
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे

🌷कोळसा कितीही उगाळला तरी काळाच------
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते

🌷मराठी महिने🌷


1) चैत्र
2) वैशाख
3) ज्येष्ठ
4) आषाढ
5) श्रावण
6) भाद्रपद
7) अश्विन
8) कार्तिक
9) मार्गशीर्ष
10) पौष
11) माघ
12) फाल्गुन

🌷मराठी महिने व विविध धार्मिक सण🌷


1) चैत्र : पाडवा, ईद ए मिलाद, रामनवमी

2) वैशाख : अक्षयतृतीया, बुद्ध पौर्णिमा

3) ज्येष्ठ : वटपौर्णिमा

4) आषाढ : आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा

5) श्रावण : नागपंचमी, रक्षाबंधन, पतेती, पोळा

6) भाद्रपद : श्रीगणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, गौरीपूजन

7) अश्विन : घटस्थापना, रमजान, विजयादशमी

8) कार्तिक  : दिवाळी पाडवा, भाऊबीज

9) मार्गशीर्ष : श्रीदत्तजयंती, ख्रिसमस, खंडोबा यात्रा

10) पौष : मकरसंक्रांती

11) माघ : वसंत पंचमी, रथसप्तमी, मोहरम, महाशिवरात्री

12) फाल्गुन : होळी, रंगपंचमी

   

🌷संत व त्यांची मूळ गावे🌷


🌷 श्री शंकराचार्य : कालडी ( केरळ )

🌷संत जनाबाई : गंगाखेड, जि. परभणी ( महाराष्ट्र )

🌷संत तुकाराम : देहू ( महाराष्ट्र )

🌷संत सावता महाराज : अरणभेंडी, पंढरपूर ( महाराष्ट्र )

🌷संत रामदास स्वामी : जांब, ता. अंबड, जि. जालना ( महाराष्ट्र)

🌷संत ज्ञानेश्वर : आपेगाव ( महाराष्ट्र )

🌷संत नामदेव : नरसी-बामणी, जि. परभणी ( महाराष्ट्र )

🌷संत एकनाथ : पैठण ( महाराष्ट्र )

🌷संत बसवेश्वर : बागेवाडी ( विजापूर ) कर्नाटक

🌷संत मुक्ताबाई : आपेगाव ( महाराष्ट्र )

🌷संत नरहरी सोनार : पंढरपूर ( महाराष्ट्र )

🌷संत तुलसीदास : राजापूर, जि. बांदा ( उत्तरप्रदेश )

      

🌷वर्ष व महोत्सव🌷

🌷25 वर्ष : रौप्य महोत्सव

🌷50 वर्ष : सुवर्ण महोत्सव

🌷60 वर्ष : हिरक महोत्सव

🌷75 वर्ष : अमृत महोत्सव

🌷100 वर्ष : शतक महोत्सव

      

🌷विविध महत्त्वपूर्ण स्थळे🌷


🌷संत नामदेव अध्यासन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

🌷महाराष्ट्रातील कीर्तन महाविद्यालय : आळंदी

🌷महानुभावांची काशी : ऋद्धिपूर

🌷श्री गोविंदप्रभूंची समाधी : ऋद्धिपूर

🌷संत सोपानदेवांची समाधी : सासवड

🌷दलित वाङ्मय अभ्यास व संशोधन संस्था : पुणे

🌷संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी : आळंदी

🌷संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेले ठिकाण : नेवासे

🌷संत चोखोबांची समाधी : पंढरपूर

🌷संत मुक्ताबाईंची समाधी : मेहुण

🌷संत निवृत्तीनाथांची समाधी : त्र्यंबकेश्वर

🌷संत जनाबाईंची समाधी : आदिलाबाद

   

🌷विविध महत्त्वपूर्ण स्थळे🌷


🌷केशवसुत स्मारक : मालगुंड

🌷मर्ढेकर स्मारक : मर्ढे ( जि. सातारा )

🌷बालगंधर्व रंगमंदिर : पुणे

🌷महाराष्ट्र साहित्य परिषद : पुणे

🌷भारत इतिहास संशोधन मंदिर : पुणे

🌷मराठी भाषाविकास संस्था : मुंबई

🌷भारतीय साहित्य अकादमी : दिल्ली

🌷एकनाथ संशोधन मंदिर : औरंगाबाद

🌷रा. गो. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर : पुणे

🌷महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ : मुंबई

🌷प्राचीन दुर्मीळ हस्तलिखितांची पोथी शाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

   

🌷मराठीतील पाच प्रमुख संतकवी🌷


🌷संत ज्ञानेश्वर : भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी

🌷संत नामदेव : नामदेव गाथा

🌷संत एकनाथ : चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, भारुडे व गवळणी

🌷संत तुकाराम : तुकाराम गाथा

🌷संत रामदास : दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके

    

🌷गीतेवरील टीका व टीकाकार🌷


🌷संत ज्ञानेश्वर : ज्ञानेश्वरी

🌷संत विनोबा भावे : गीताई

🌷संत दासोपंत : गीतार्णव

🌷संत एकनाथ : गीतासार

🌷लोकमान्य टिळक : गीतारहस्य

🌷वामनपंडित : यथार्थ दीपिका

   

🌷विविध प्राण्यांची पिल्ले🌷


🌷मेंढीचे : कोकरू

🌷गरुडाचे : पिल्लू

🌷सिंहाचा : छावा

🌷कुत्र्याचे : पिल्लू

🌷वाघाचा : बछडा

🌷कोंबडीचे : पिल्लू

🌷हरणाचे : शावक, पाडस

🌷गाईचे : वासरू

🌷घोड्याचे : शिंगरू

🌷मांजराचे : पिल्लू

🌷म्हशीचे : रेडकू

🌷बदकाचे : पिल्लू

🌷हत्तीचे : करभ, पिल्लू

🌷शेळीचे : करडू

🌷डुकराचे : पिल्लू

  

🌷प्राण्यांची राहण्याची ठिकाणे🌷


🌷मधमाश्यांचे : पोळे

🌷घुबडाची : ढोली

🌷वाघाची : जाळी

🌷उंदराचे : बीळ

🌷कुत्र्याचे : घर

🌷गाईचा : गोठा

🌷घोड्याचा : तबेला, पागा

🌷हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

🌷कोळ्यांचे : जाळे

🌷सिंहाची : गुहा

🌷सापाचे : वारूळ, बीळ

🌷चिमणीचे : घरटे

🌷पोपटाची : ढोली

🌷सुगरणीचा : खोपा

🌷कोंबडीचे : खुराडे

🌷कावळ्याचे : घरटे

🌷मुंग्यांचे : वारूळ

   

🌷मराठीतील प्रथम व विशेष🌷


🌷मराठीतील पहिले वृत्तपत्र : दर्पण ( बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832 )

🌷मराठीतील पहिले वर्तमानपत्र (दैनिक ) : ज्ञानप्रकाश ( 1904 )

🌷मराठीतील पहिले मासिक : दिग्दर्शन ( बाळशास्त्री जांभेकर -1840 )

🌷मराठीतील पहिला शिलालेख : अक्षीचा शिलालेख

🌷मराठीतील पहिले व्याकरणकार : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🌷मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण : महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ( गंगाधर शास्त्री फडके )

🌷मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी : मोचनगड ( रा. भि. गुंजीकर )

🌷मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी : यमुना पर्यटन ( बाबा पदमनजी )

🌷मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार : साळूबाई तांबवेकर

 

🌷म्हणी व अर्थ🌷



🌷गरज सरो अन् वैद्य मरो------
ज्याने आपली गरज भागविली त्याला विसरुन जाणे

🌷गरीबाच्या दाराला सावकाराची कडी------
गरिबावर सावकाराचा अंमल

🌷गरीबानं खपावं, धनिकानं चाखावं------
गरिबाने कष्ट करावेत आणि श्रीमंताने माल खावा

🌷गर्जेल तो पडेल काय?------
केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही कृती होत नाही

🌷गर्वाचे घर खाली------
गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानीत होण्याची वेळ येते

🌷गळा नाही सरी, सुखी निद्रा करी------
ज्या स्त्रीच्या अंगावर दागिने नसतात, तिला सुखाने झोप लागते

🌷गळ्यातले तुटले ओटीत पडले------
कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ असणे

🌷गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवाया------
अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करु शकत नाही

🌷गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली------
एखादे काम सिद्धीस गेले तर ठीक, नाही तरी नुकसान नाही

🌷गाड्याबरोबर नळ्याची यात्रा------
मोठयाच्या आश्रयाने लहानांचाही फायदा

🌷गाढव माजला की तो अखेर आपलेच मूत पितो------
मूर्ख व्यक्ती आपल्या उन्मत्ततेने आपलेच हसू करुन घेतो

🌷गाढवांचा गोंधळ नि लाथांचा सुकाळ------
मूर्ख लोक एकत्र जमले तर भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही

🌷गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी------
एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग होत नाही

🌷गावास गेला आणि गावचा झाला------
तो परगावाला गेला आणि इकडच्या मित्रमंडळींस विसरुन गेला

🌷म्हणी व अर्थ🌷


🌷चढेल तो पडेल------
उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही

🌷चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही------
काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत

🌷चांभाराच्या देवाला खेटराची पूजा------
जशास तसे या न्यायाने वागणे चांगले

🌷चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला------
क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च

🌷चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे------
प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच

🌷चालत्या गाडीला खीळ घालणे------
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे

🌷चिंती परा ते ये‌ई घरा------
दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते

🌷चोर तो चोर वर शिरजोर------
गुन्हा करुन वर मुजोरी

🌷चोर सोडून संन्याशाला फाशी------
खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे

🌷चोराच्या उलट्या बोंबा------
स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे

🌷चोराच्या मनात चांदणे------
वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे

🌷चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक------
वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात

🌷चोराच्या हातची लंगोटी------
ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब

🌷चोराला सुटका आणि गावाला फटका------
चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे

🌷चोरावर मोर------
एकापेक्षा एक सवाई

🌷चोरीचा मामला हळू हळू बोंबला------
पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

   

🌷म्हणी व अर्थ🌷


🌷छक्के पंजे करणे------
हातचलाखी करणे

🌷छडी लागे छमछम विद्या येई घमघम------
शरीरदंड सोसल्याने विद्याप्राप्ती लवकर होते

🌷छत्तीसाचा आकडा------
विरुद्ध मत असणे

🌷छाती दाखवत बसणे------
कशालाही न घाबरता एका जागी बसणे

🌷छातीला हात लावून सांगणे------
खात्रीपूर्वक सांगणे

🌷छिन्न विछिन्न करणे------
तुकडे तुकडे करणे

  

🌷मराठीतील प्रथम व विशेष🌷


🌷मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले ( श्रवणबेळगोळ )

🌷मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र ( म्हाईमभट )

🌷मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू ( मुकुंदराज )

🌷मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

🌷मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

🌷मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

🌷मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

🌷मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर ( ययाती )

🌷मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी ( भावार्थदीपिका )

🌷मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील ( कृष्णराव भालेकर )

  *💥🎯ग्रुप वरील सर्व प्रश्न  फक्त वाचू नका, तुमच्याकडे नोंद करून ठेवा.*

*💥🎯 कारण एकदा वाचून ही प्रश्न/माहिती लक्षात राहणार नाही.*

*💥🎯 आणि आपण एखादी प्रश्न /माहिती वाचल्यावर पुन्हा पाहत नाही.*

*💥🎯 त्यामुळे वरील परिक्षाभिमुख माहिती बारकाईने वाचून लिहून ठेवलीत तरच तुम्हाला फायदा होईल*

🌷म्हणी व अर्थ🌷


🌷जातीसाठी खावी माती------
जातीसाठी जे करायचे ते करणे, प्रसंगी कमीपणाही पत्करणे

🌷जात्यावर बसले की ओवी सुचते------
काम करावयास प्रारंभ केला की ते पूर्ण करण्याचे अनेक मार्ग सुचतात

🌷जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही------
बाहेरुन एखाद्या माणसाचा देखावा केला, तरी त्याचे गुण देखावा करणाऱ्याच्या अंगी येत नाहीत

🌷जाळाशिवाय नाही कढ अन् माये शिवाय नाही रड------
ज्याला एखाद्याविषयी प्रेम, आपुलकी आहे त्यालाच ती व्यक्ती संकटात सापडली असता दुःख होईल

🌷जावयाचं पोर, हरामखोर------
जावयाच्या पोराला कितीही चांगले वागवा तरी तो उपकार स्मरत नाही

🌷जावा जावा आणि उभा दावा------
जावा-जावांचे कधी पटत नाही

🌷जावा जावा हेवा देवा------
जावा-जावांचे कधी पटत नाही

🌷जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे------
प्रत्यक्ष काम करु लागल्यावर अडचणी कळतात

🌷जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी------
ज्याच्याकडून काही  लाभ होत असेल त्याचीच लोक खुशामत करतात

🌷साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य🌷


🌷वि.स.खांडेकर : ययाती (१९६० )

🌷श्री.ना.पेंडसे : रथचक्र (१९६३ )

🌷रणजीत देसाई : स्वामी ( १९६४ )

🌷पु.ल.देशपांडे : व्यक्ती आणि वल्ली ( १९६५ )

🌷इरावती कर्वे : युगांत ( १९६८ )

🌷गोदावरी परुळेकर : जेंव्हा माणूस जागा होतो ( १९७२ )

🌷जी.ए. कुलकर्णी : काजळमाया ( १९७३ )

🌷वि. वा.शिरवाडकर : नटसम्राट (१९७४ )

🌷गो.नि.दांडेकर : स्मरणगाथा (१९७६ )

🌷आत्माराम रावजी देशपांडे : दशपदी ( १९७७ )

     

घासावा शब्द | तासावा शब्द|
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी||

शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

बोलावे मोजके | नेमके, खमंग, खमके |
ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे

बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||

थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे|
मुद्देसुद बोलणे | ही संवाद कला

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी, वाणी, नाणी | नासू नये  🙏🙏

- संत तुकाराम

🌷मराठी महिने🌷

1) *चैत्र* नेसतो सतरा साड्या
2) *वैशाख* ओढतो
    व-हाडाच्या गाड्या
3) *ज्येष्ठ* बसतो पेरित शेती
4) *आषाढ* धरतो छत्री वरती
5) *श्रावण* लोळे गवतावरती
6) *भाद्रपद* गातो गणेश महती
7) *आश्विन* कापतो आडवे भात
8) *कार्तिक* बसतो दिवाळी खात
9) *मार्गशीर्ष* घालतो शेकोटीत लाकडे
10) *पौषा* च्या अंगात उबदार कपडे
11) *माघ* करतो झाडी गोळा
12) *फाल्गुन* फिरतो जत्रा सोळा
वर्षाचे महिने असतात बारा
प्रत्येकाची न्यारी त-हा।

🌷भावीपिढीला हिंदू महिने शिकवण्यासाठी एक प्रयत्न🌷

*💥🎯ग्रुप वरील सर्व प्रश्न  फक्त वाचू नका, तुमच्याकडे नोंद करून ठेवा.*

*💥🎯 कारण एकदा वाचून ही प्रश्न/माहिती लक्षात राहणार नाही.*

*💥🎯 आणि आपण एखादी प्रश्न /माहिती वाचल्यावर पुन्हा पाहत नाही.*

*💥🎯 त्यामुळे वरील परिक्षाभिमुख माहिती बारकाईने वाचून लिहून ठेवलीत तरच तुम्हाला फायदा होईल.*
उत्तर लिहिले · 8/9/2018
कर्म · 569205