Topic icon

इंदुरीकर महाराज

3
*༆ ‼ इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनांमध्ये महिलांवर टीका का होते?  ‼༆*


श्रीकांत बंगाळे
बीबीसी

             *_☬ निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव आता घरोघरी ओळखीचं झालं आहे. खेडोपाड्यात कीर्तनं करून हसत हसत लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज युट्यूबमुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत._*
पण त्यांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी असतात, असा आक्षेप महिलांनीच नोंदवला आहे. या आक्षेप घेणाऱ्या महिला कोण आहेत, त्यांचे आक्षेप काय आहेत, त्यावर इंदुरीकर महाराजांचं काय मत आहे, हे सारं काही आपण पुढे पाहणार आहोतच.

इंदुरीकर महाराज कोण आहेत, याविषयीही आपण सविस्तर जाणून घेऊया. पण आधी पाहूया की ही वादग्रस्त विधानं काय आहेत.
*❗"चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."*
*❗"पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे."*
*❗"नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."*
*❗"नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"*
*❗"पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"*
*❗"पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."*
*❗"गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."*
*💥इंदुरीकर महाराजांची अशी अनेक विधानं युट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. काहींना ही विधानं विनोदी वाटू शकतात. कदाचित ती विनोदनिर्मितीच्या हेतूनेच केली असावीत. पण त्यात महिलांचा अपमान होत नाही का?ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ* बारामतीच्याअॅड. कविता शिवरकर-कलगुटकर यांनी 22 नोव्हेंबर 2018 ला इंदुरीकर महाराजांविषयी एक फेसबुक पोस्ट लिहिली. 'इंदुरीकर तुम्हाला *'महाराज' म्हणावं इतका महाराष्ट्र नक्कीच बुरसटलेला नाही'* या शीर्षकाची कविता यांची फेसबुक पोस्ट नंतर पत्राच्या स्वरूपात व्हायरल झाली.
पण या एका पोस्टमुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल, शिव्या खाव्या लागतील, याची त्यांना कल्पनाही नव्हती. काही लोकांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यांना 'झोपण्याचा' सल्ला दिला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आपल्या राज्याला थोर संत परंपरा लाभली आहे. गावात लहानाचं मोठं होताना आम्ही कीर्तन ऐकत आलो आहे. कीर्तन म्हणजे काय आम्हाला चागलंच कळतं. पण इंदोरीकर कीर्तनाच्या नावाखाली महिलांना टार्गेट करतात, टुकार विनोद करत सुटतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे मग इंदुरीकरांविषयी माझं जे मत पूर्वी होतं, ते आजही ठाम आहे. इंदुरीकर तुम्हाला 'महाराज' म्हणावं इतका महाराष्ट्र नक्कीच बुरसटलेला नाही, असं मला आजही वाटतं," कविता मतावर ठाम असल्याचं सांगतात.
इंदोरीकरांच्या कीर्तनाच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात. तुम्ही 'इंदुरीकर' असं युट्यबूवर सर्च केलं तर सर्वांत पहिले 'इंदुरीकर कॉमेडी कीर्तन' अशा आशयाच्या कीर्तनाच्या क्लिप्स समोर येतात. यात इंदोरीकरांनी त्यांचे मुद्दे पटवून देण्यासाठी महिलांबद्दल काही वक्तव्यं केली आहेत.
1. लव्ह मॅरेजविषयीचं मत पटवून देताना इंदोरीकर महिलांची तुलना चपलेशी करतात.
ते म्हणतात, "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?
"चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
2.महिलांच्या कपड्यांवर इंदोरीकर टिप्पणी करतात. आई-वडिलांनी मुलींवर सतत लक्ष ठेवायला हवं, मुलींना बंधनात वाढवायला हवं, असा त्यांचा आग्रह आहे. हा मुद्दा पटवून देण्यासाठी ते महिलेला 'जनावर' संबोधतात.
एका कीर्तनात ते म्हणतात, "आपली पोरगी घरातून बाहेर पडताना कसे कपडे घालून बाहेर पडते, हे तिच्या आईला माहिती नाही का? का पारायणाला बसली तिची आई? आपलं जनावर पाहतंय कुणीकडं, चालतंय कुणीकडं, थोबाड कुणीकडं वाशीतय? आपलं जनावर कसं राहतंय, हे तिच्या आईला कळत नाही का? लोकांनी सांभाळायच्या का तुमच्या पोरी? पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
दुसऱ्या एका कीर्तनात इंदोरीकर जीन्स-पँट घातलेल्या आईविषयी आक्षेप नोंदवतात.
"आमच्या आईचं पोरगं दूध पीत होतं तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं, ते पोरगं दूध पितंय. इतका खानदानी आमच्या आईचा पदर होता. पोराला पूर्वी पदर मिळत होता. आज पोराची आई जीन्स-पँट आणि टी-शर्ट घालते. पोर झाकावं कुठं आणि पोरानं घाईघाई प्यावं कसं? याला नाव दिलंय चेंज."
पुढे एका ठिकाणी शेतकरी आणि सर्व्हिसवाल्याच्या घरातील चहाचा फरक सांगताना ते म्हणतात, "सर्व्हिसवाल्यानं चहा सांगितला की ते (सर्व्हिसवाल्याची बायको) जनावर येतं चहा घेऊन, केसं बिसं मोकळे सोडेल, गाऊन-बिऊन घालेल...आपल्याला वाटतं जोडून अमावस्या आली की काय?
3.लग्नात डान्स करणाऱ्या मुलींना इंदोरीकर खानदान तपासण्याचा सल्ला देतात.
ते म्हणतात, "पोरगी नाचती लग्नात. पोरी कमरापासून वर हालत्या आणि खाली बंद होत्या. काही हालत्या की बंद होत्या हेच कळत नाही. काय लाजा सोडल्या. वरून पोरीची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकिती पोरीवर, दरिद्री! काय मही गुड्डी ताल धरती म्हणती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तूही गुड्डी जेव्हा एखाद्या गड्ड्या घेऊन पळून जाईल तव्हा कळेल तुला. नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
4. मुलींनी कसं राहावं, याविषयी इंदोरीकर काही सल्ले देतात. मुलींनी हातात बांगड्या घालायला हव्यात, हा त्यांचा आग्रह आहे. बांगड्यांचा संबंध ते धर्माशी जोडतात. शिवाय मुलींची नवीन हेअरस्टाईलही त्यांना रुचत नाही.
ते म्हणतात, "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा, बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म? मुलींचे भांग तपासा. एक नवीन भांगाची स्टाईल आली, त्यात पोरगी झटके हानती की खुणवती हेच कळेना माणसाला."
पुढे ते पालकांना शाळेतल्या मुलींवर बारीक लक्ष ठेवायला सांगतात. मोबाईलमुळे मुली बिघडतात, असं त्यांचं मत आहे.
"शाळेतल्या मुलीचं दप्तर तपासत जा. वह्या चेक करीत जा. एसटीचा पास चेक करीत जा. 8-10 दिवस झाले आपल्या पोरीची पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती की काय, हे पाहा.
"मुलीचे मोबाईल चेक करत जा. तीन-तीन सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. दोन नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन आहे तो. सायलेंट असतो. तो घरात फक्त कन्हतो. मुलीच्या मोबाईलमधला बॅलेन्स चेक करत जा. आपण तर 100 रुपये दिले होते, त्याच्यात 200 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बाबा. ही 1 जीबी आहे, 2 जीबी आहे, 4 जीबी आहे, का भूर्र जीबी (महाराज पोरगी पळून जाण्याच्या अर्थानं भूर्र म्हणत आहेत) आहे, जरा चौकशी करा," इंदोरीकर म्हणतात.
*इंदोरीकरांचं म्हणणं काय?*
महिलांचे आक्षेप आणि कीर्तनकारांची टीका, यावर इंदोरीकरांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. ०४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता आम्ही त्यांना फोन केला.
तुमचं कीर्तन नसून कॉमेडी शो आहे आणि यामुळे वारकरी संप्रदायाची पत खालावत चालली आहे, असा आरोप आहे, यावर ते सांगतात, "त्यांच्या मतावर आपण काय म्हणणार, काय सांगणार? ते तुम्हीच सगळं ऐकून ठरवा, तुम्हाला सगळं माहितीच आहे."
तुमच्या कीर्तनातील भाषा आणि मुद्दे समजून सांगण्याची पद्धत महिलांना खटकते, यावर इंदोरीकर सांगतात, "प्रत्येक माणूस वेगळाच विचार करणार ना. आपला दृष्टिकोन तो तर नाहीये ना."
त्यानंतर त्यांनी फोन ठेवला.
पुन्हा फोन केल्यानंतर ते म्हणाले, "सर फक्त पॉझिटिव्ह ठेवा, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त पॉझिटिव्ह ठेवा. मी तुम्हाला एक १० मिनिटानं फोन करतो."

14
ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर 

सर्वाना कळवण्यात येते की महाराजांचे कीर्तन ठेवायचे असल्यास खालील नंबर
9822629344 , 7527559191 , 9604257933
या वर संपर्क साधावा तसेच वेगवेळ्या ठिकाणावरून येण्याचा स्थाइक पत्ता. (संगमनेर ओझर) मु. ओझर , संगमनेर , आळेफाटा , पुणेकरांसाठी | मु. ओझर , संगमनेर, नाशिककरांसाठी | मु. ओझर , संगमनेर , अहमदनगरकरांसाठी )
कायमचा पत्ता मु.इंदुरी ता. अकोले, जि.अहमदनगर

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

आपल्या विनोदाच्या जोरावर समाजप्रबोधन करत  नुसत महाराष्ट्रतच नव्हे तर भारतभर आपल्या किर्तनकार म्हणून  आपला वेगळा ठसा ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांही उमटवला आहे. त्याच बरोबर इंदोरी गावचे नावही आपल्या कर्तुत्वावर मोठे केले आशा समाज प्रबोधनकरास माझाकडून मानाचा मुजरा….



उत्तर लिहिले · 26/2/2019
कर्म · 29320