Topic icon

स्वप्न

0
इंग्रज सरकारने 
उत्तर लिहिले · 23/12/2024
कर्म · 0
0

जगावर राज्य करण्याचे स्वप्न अनेक व्यक्ती आणि साम्राज्यांनी पाहिले. त्यापैकी काही प्रमुख व्यक्ती आणि साम्राज्यांचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे:

  • सिकंदर (अलेक्झांडर द ग्रेट):
  • सिकंदरने आपल्या लहान वयातच जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याने ग्रीक साम्राज्याचा विस्तार करत अनेक प्रदेश जिंकले.

    संदर्भ: विकिपीडिया - सिकंदर

  • चंगेज खान:
  • चंगेज खानने मंगोल साम्राज्याची स्थापना केली आणि त्याला जगातील सर्वात मोठे साम्राज्य बनवायचे होते.

    संदर्भ: विकिपीडिया - चंगेज खान

  • नेपोलियन बोनापार्ट:
  • नेपोलियनने फ्रान्सला युरोपमधील सर्वात मोठी शक्ती बनवण्याचे ध्येय ठेवले आणि अनेक देश जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.

    संदर्भ: विकिपीडिया - नेपोलियन बोनापार्ट

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 210
0

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे भारताविषयीचे स्वप्न vision 2020' या नावाने ओळखले जाते. त्यांचे स्वप्न होते की भारत 2020 पर्यंत एक विकसित, समृद्ध आणि सामर्थ्यशाली राष्ट्र बनावे.

त्यांच्या स्वप्नातील भारताची काही प्रमुख वैशिष्ट्ये:

  • आर्थिक विकास: भारताने जगातील पहिल्या तीन आर्थिक महासत्तांमध्ये स्थान मिळवावे.
  • गरिबीमुक्त भारत: देशातील दारिद्र्य पूर्णपणे नष्ट व्हावे आणि कुणीही गरीब व उपाशी राहू नये.
  • शिक्षित समाज: देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळावे, तसेच ते शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे.
  • आरोग्य: सर्वांना चांगले आरोग्य मिळावे, कुपोषण आणि आजारमुक्त समाज निर्माण व्हावा.
  • तंत्रज्ञान: भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असावा.
  • कृषी विकास: शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जावे, ज्यामुळे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • ऊर्जा सुरक्षा: भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा.
  • सुरक्षा: भारत एक सुरक्षित आणि सामर्थ्यशाली राष्ट्र बनावे.

डॉ. कलाम यांचे हे स्वप्न केवळ एक स्वप्नवत कल्पना नव्हती, तर ते एक ध्येय होते. ते नेहमी तरुणांना हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित करत राहिले.

अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 210
0

भारताविषयी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न:

  • विकसित भारत: डॉ. कलाम यांचे भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न होते. त्यांनी 2020 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा 'व्हिजन 2020' चा आराखडा तयार केला होता.
  • आत्मनिर्भर भारत: कलाम भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवू इच्छित होते. त्यांनी देशातच आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला.
  • शिक्षित भारत: डॉ. कलाम यांनी शिक्षणाला महत्व दिले. त्यांचे स्वप्न होते की भारतातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे, जेणेकरून ते देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील.
  • भ्रष्टाचारमुक्त भारत: कलाम यांनी भ्रष्टाचारमुक्त भारताची कल्पना केली होती. त्यांनी लोकांना प्रामाणिक राहण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी काम करण्यासाठी प्रेरित केले.
  • अणुशक्ती संपन्न भारत: भारताला एक मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी अणुऊर्जा कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले.

थोडक्यात, डॉ. कलाम यांनी एक सशक्त, विकसित, शिक्षित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले होते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 210
1
जगावर राज्य करण्याचे स्वप्न ग्रीक राजा तिसरा अलेक्झांडर (सिकंदर ) याने पाहिले होते. ( जुलै २० , इ.स.पू. ३५६ ते जून ११ , इ.स.पू. ३२३ ) हा
मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.
होते.
   सिंकडर अत्यंत कुशल योध्दा व महत्वकांक्षी होता.याच कारणामुळे त्याने जगावर राज्य स्वप्न पाहिले होते.
उत्तर लिहिले · 25/8/2023
कर्म · 51830
1
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न काय होते


डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार:-
१)आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसत,तर आपली झोप उडवत ते स्वप्नं असतं

२)देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गाच्या शेवटच्या बाकावर च सापडतात.

३)स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

४)यशाचा आनंद अनुभावण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणीचा सामना करावाच लागतो.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भाषणे प्रेरणादायी असत. यापैकी एक, कलाम यांच्या ‘इंडिया २०२०’ या पुस्तकाचा पाया ठरणारे हे भाषण.. स्वातंत्र, विकास आणि ‘जगासह-जगासाठी भारत’ अशी त्रिसूत्री देणारे.. कलाम यांचा आनंद कशात होता, हेही विस्ताराने सांगणारे..

आपला इतिहास ३००० वर्षांचा आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे आले, त्यांनी आपल्यावर राज्यही केले आणि केवळ आपली भूमी कब्जात घेण्यावर न थांबता, आपल्या मनांवरही त्यांनी ताबा मिळवला. आक्रमणांचा हा इतिहास अलेक्झांडरपासूनचा आहे. ग्रीक आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आणि फ्रेंच तसेच डचही येथे आले. या सर्वानी आपल्याला लुटले. जे आपले होते ते त्यांचे झाले. तरीही आपण मात्र कोणत्याही देशावर आक्रमण कधीच केलेले नाही. आपण जमिनीवर कब्जा केलेला नाही, आपण सांस्कृतिक अतिक्रमणे केली नाहीत, आपण कुणाची राष्ट्रे ध्वस्त केली नाहीत. असे का? मला वाटते, आपण इतरांच्याही स्वातंत्र्याचा आदर करणारे आहोत, म्हणून.

म्हणूनच, माझे पहिले स्वप्न आहे स्वातंत्र्याचे.

भारताला स्वातंत्र्याचे पहिले विराट दर्शन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातून झाले, असा माझा विश्वास आहे. हेच ते स्वातंत्र्य, जे आपण जोपासले पाहिजे, वाढवून बुलंद केले पाहिजे. आपण स्वतंत्र नसलो, तर कोणीही आपला मान राखणार नाही.

माझे दुसरे स्वप्न आहे, विकास.

जवळपास ५० वर्षे आपण ‘विकसनशील देश’ म्हणून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतकडे विकसित देश म्हणून पाहण्याची. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास आपला क्रमांक जगातील पहिल्या पाच देशांमध्ये लागतो. अनेक क्षेत्रांत आपल्या देशाचा वाढदर दहा टक्के आहे. आपल्याकडली गरिबीची पातळी कमी-कमी होते आहे आणि आपल्या यशाची दखल आता जगाकडूनही घेतली जाते आहे. तरीदेखील आपण स्वतला विकसित – स्वावलंबी आणि स्वतवर विश्वास असलेला देश मानण्यास कचरत असू, तर आपला आत्मविश्वास कमी पडतो आहे, हेच त्यामागचे कारण. खरे ना?

माझे तिसरे स्वप्न आहे..

भारताने जगासोबत आणि जगासाठी उभे राहावे, हे. आपण जगासाठी आणि जगासोबत उभे राहिलो नाही, तर आपल्याला मान मिळणार नाही, असेही मला वाटते. स्वतमध्ये शक्ती असेल, तरच शक्तींची साथ मिळते. आपली ही शक्ती म्हणजे केवळ लष्करी बळ नव्हे. आर्थिक सामथ्र्यसुद्धा आपण वाढवले पाहिजे.. हे दोन्ही बाहू सशक्त असले पाहिजेत.

माझे भाग्य असे की, मला तीन महान मनाच्या माणसांसह काम करायला मिळाले. अंतराळ विभागाचे डॉ. विक्रम साराभाई आणि त्यांच्यानंतर प्रोफेसर सतीश धवन, आणि तिसरे डॉ. ब्रह्म प्रकाश- म्हणजे भारताच्या अणुइंधनाचे शिल्पकार. मी या तिघांना अगदी जवळून पाहू शकलो, ही आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी संधी होती, त्या अर्थाने हा केवळ माझ्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल, म्हणून मी भाग्यवान.

माझ्या आयुष्यात चार महत्त्वाचे टप्पे आले :

पहिला :- ‘इस्रो’ मधली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतली माझी २० वर्षे. ‘एसएलव्ही-३’ या भारतीय बनावटीच्या पहिल्याच उपग्रह-वाहक यानाच्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून- म्हणजे प्रकल्प संचालक म्हणून करण्याची संधी मला मिळाली. याच यानाने ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा सोडला. ही दोन दशके माझ्या वैज्ञानिक आयुष्यात महत्त्वाची होती.

दुसरा :- ‘इस्रो’नंतर मी ‘डीआरडीओ’मध्ये (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत) गेलो आणि तेथेही, क्षेपणास्त्र वाहकांवर काम करण्याची संधी मला मिळाली. ‘अग्नी’चे परीक्षण १९९४ मध्ये सफल झाले, तेव्हा मला जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता.

तिसरा:- अणुऊर्जा विभाग आणि डीआरडीओ यांनी अणुचाचणीसाठी अत्यंत मोलाची भागीदारी केली, तेव्हाचा टप्पा. ११ आणि १३ मे १९९८ या दिवशी मी स्वर्गसुख तिसऱ्यांदा अनुभवले. माझ्या पथकासह माझा सहभाग या चाचणीमध्ये असल्यामुळे, भारत काय करू शकतो हे जगापुढे सिद्ध करून दाखवण्याची संधी मला मिळाली होती. आम्ही यापुढे ‘विकसनशील’ देश नसून विकसित देशांपैकी आहोत, हे भारताने सप्रमाण दाखवून दिले होते. भारतीय असल्याचा अभिमान ओसंडत होता माझ्यातून. ‘अग्नी’ क्षेपणास्त्र नुसते पुन्हा वापरता येण्याजोगे करून आम्ही थांबलो नव्हतो. त्यासाठी नवे साहित्यही आम्ही वापरले होते. हे साहित्य म्हणजे कर्ब- कार्बन, वजनाला अत्यंत हलके.

चौथा :- टप्पा जरा निराळा आहे. एके दिवशी हैदराबादच्या निझाम इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून अस्थिरोगतज्ज्ञ असलेले एक डॉक्टर माझ्याकडे आले. त्यांनीही, आम्ही ‘अग्नी’ साठी वापरलेले कार्बनआधारित साहित्य उचलून पाहिले, तेव्हा त्याच्या हलकेपणाने ते अचंबित झाले. तेवढय़ावर न थांबता, मला रुग्णालयात नेऊन त्यांनी काही रुग्णांशी माझी गाठ मुद्दाम घालून दिली. कितीतरी लहानलहान मुले होती तिथे. त्यांच्या पायांत धातूंच्या कॅलिपर होत्या. वजनाला या कॅलिपर तीनतीन किलो, म्हणजे मुलांसाठी जडच. पाय ओढावे लागत होते या मुलांना. डॉक्टर मला म्हणाले : या मुलांच्या वेदना हलक्या होण्यासाठी काही तरी करा. तीन आठवडय़ांत आम्ही अवघ्या ३०० ग्रॅम वजनाची नवी साधने बनवली आणि रुग्णालयात घेऊन गेलो. मुलांचा तर स्वतच्या डोळय़ांवर विश्वासच बसेना. हरखून पाहातच राहिली ती. आता तीन किलो वजन वागवावे न लागता, त्यांना चालता येणार होते. या मुलांच्या डोळय़ांमध्ये अश्रू तरळले, तेव्हा मला चौथ्यांदा स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता.

इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे गेलो असता मी तेथील एक इंग्रजी वृत्तपत्र वाचत होतो. आदल्याच दिवशी जोरदार बॉम्बहल्ले आणि जीवितहानी झाली होती. परंतु या इस्रायली वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मोठे छायाचित्र होते, ते वाळवंटात अवघ्या पाच वर्षांत ‘धान्याचे कोठार’ पिकवून दाखवणाऱ्या एका ज्यू शेतकऱ्याचे. हे चित्र प्रेरणादायी खरेच. हे चित्र पाहून आदल्या दिवशीच्या संहाराचा, बॉम्बहल्ल्याचा आणि बळींचा विसर पडावा, अशी स्फूर्तिदायी शक्ती या चित्रात नक्कीच होती. अर्थात, या बातम्याही त्या दैनिकात होत्याच. आपल्याकडे मात्र याच बातम्यांना प्राधान्य असते.. मृत्यू, आजार, दहशतवाद, गुन्हे.. असे का? आपण इतके नकारात्मक का आहोत?

आणखी एक प्रश्न :

एक राष्ट्र म्हणून आपल्याला, परदेशी बनावटीच्या वस्तूंचे इतके आकर्षण कसे काय? आपल्याला चित्रवाणी संच ‘फॉरेनचे’ हवे असतात, शर्टसुद्धा ‘इम्पोर्टेड’ हवा असतो.. परकीय तंत्रज्ञान आपल्याला हवेसे वाटते. जे जे आयात केलेले ते ते चांगले, हे कोठले आकर्षण? आत्मसन्मानाची भावना विकसित होऊन सार्थकी लागण्यासाठी आधी स्वावलंबित्व हवे, हे आपल्याला लक्षातच कसे येत नाही? हैदराबादेतील या भाषणाला येत असताना एका १४ वर्षांच्या मुलीने माझी स्वाक्षरी मागितली. मी तिला विचारले : तुझे ध्येय काय? स्वप्न काय? ती म्हणाली- मला माझा देश विकसित झालेला पाहायचा आहे. तिच्यासाठी आपल्याला- तुम्हाला आणि मला- विकसित भारताची उभारणी करायची आहे.

चला उद्घोष करू.. भारत हा काही विकसनशील देश नाही. आपले राष्ट्र विकसित राष्ट्र आहे.. भले ते आज घसरणीच्याच विकसित टप्प्यावर का असेना!

राष्ट्रपती असताना फाशीची शिक्षा हे आपल्यापुढील अत्यंत कठीण काम होते. न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर निर्णय घेणे कठीण होते, कारण बहुसंख्य प्रकरणे सामाजिक आणि आíथक विषमतेशी निगडित होती. व्यक्तीचे वैमनस्य नसते आणि गुन्हा करण्याचा त्याचा हेतू नसतो, अशा व्यक्तीला आपण शिक्षा देत आहोत, अशी त्या वेळी माझी धारणा होत होती. तथापि, एका प्रकरणात उदवाहन चालकाने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्या प्रकरणात मात्र मी त्याची फाशीची शिक्षा कायम केली.

मी शिक्षक आहे व अमेरिकेत प्राध्यापक म्हणून शिकवले आहे, त्यामुळे जिथे ज्ञान आहे तिथे मी जातोच. मुख्यत्वेकरून तरुण पिढीला भेटण्यास मला आवडते. त्यांच्या ज्ञानात सहभागी होणेही मला आवडते.
उत्तर लिहिले · 7/8/2023
कर्म · 51830
1
                      अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर)




'दरायस तिसरा' या पर्शियन सम्राटाबरोबरील युद्धात लढताना अलेक्झांडर द ग्रेट, पॉंपेई येथील एक मोझेक





अधिकारकाळ - इ.स.पू. ३३६ - इ.स.पू. ३२३

राज्यव्याप्ती - ग्रीस, अनातोलिया, सीरिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, इजिप्त, बॅक्ट्रिया, मेसोपोटेमिया, इराण, पंजाब.

जन्म - जुलै २०, इ.स.पू. ३५६ पेल्ला, मॅसेडोनिया

मृत्यू - जून ११, इ.स.पू. ३२३

पूर्वाधिकारी - फिलिप दुसरा, मॅसेडोन

वडील - फिलिप दुसरा, मॅसेडोन

आई - ऑलिंपियास

पत्नी - रॉक्सेन

इतर पत्नी - स्टटेरा, बार्सिन

संतती - चौथा अलेक्झांडर, मॅसेडोन.



जगावर राज्यले स्वप्न ग्रीक अक्झांडर तिरे (अलेक्झांडर) याने पाहिले होते. (२० जुलै, ३५६ बीसी ते ११ जून, ३२३ बीसी)

मॅसेडोनियाचा शासक होता. जगाच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि कार्यक्षम सेनापती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यावेळच्या ग्रीक सभ्यतेला ओळखले जाते.
सिंकदर एक अत्यंत कुशल योद्धा आणि महत्वाकांक्षी होती कारण जगावर राज्य स्वप्न पाहिले.

स्पष्टीकरण:

सिकंदर/अलेक्झांडर द ग्रेटचे नाव फिलिप आणि आईचे नाव ऑलिम्पियाझटा होते. अलेक्झांडरला एक बहीण देखील होती, त्या दोघींचे पालनपोषण पेला येथील शाही दरबारात होते. वय 12 व्या वर्ष सिकंदरने घोडेस्वारी सुचली. अलेक्झांडरने आपल्या स्वत: च्या मॅसेडोला एका सामान्य राज्यातून मोठ्या शक्तीची शक्ती बदलताना पाहिले होते. अलेक्झांडर त्याच्या संपूर्ण बाल्कन विजयात सहभागी विक्रमी विजय पाहत मोठा झाला.

329 इ.स.पू. संपूर्ण ते वीस वर्षांचे होते. आशिया मायनर विजयी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, तो शक्तिशाली सेना आणि सर्वोत्तमी सत्ताली उपकरणे देखेला. त्यांनी लहानपणापासूनच 'विश्वविजयी'चे स्वप्न पाहिले होते. अ‍ॅरिस्टॉटल या त्या कालातील महान विचारवंत अलेक्झांडरला जीवन पैलू शिकवून त्याला मानसिक मजबूत केले होते.

अनेक नेत्रदीपक युद्ध मोहिमांच्या मध्यभागी, त्याने आशिया मायनर फिरले, सीरियाचा चुना आणि नंतर इराण, इजिप्त, मेसोपोटेमिया, फिनिशिया, जुडिया, गाझा आणि बॅक्ट्रिया फिरले. इजिप्त मध्ये 327 BC 1600 मध्ये, त्याने अलेक्झांड्रिया नावाचे एक नवीन शहर वसवले, त्याने एक विद्यापीठ देखील राज्य केले.

महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.

आपल्या कारकीर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे.

प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी 'अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्या'वर प्लूटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे.
उत्तर लिहिले · 27/7/2023
कर्म · 9415