Topic icon

जर्मनी

0
स. 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.
उत्तर लिहिले · 3/9/2023
कर्म · 9415
0

इ.स. 1737 मध्ये जर्मनीमधील मॅनहाइम विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.

मॅनहाइम विद्यापीठ हे जर्मनीमधील एक सार्वजनिक विद्यापीठ आहे जे 1737 मध्ये स्थापन झाले. हे जर्मनीच्या बाडेन-वुर्टेंबर्ग राज्यातील मॅनहाइम शहरात स्थित आहे. मॅनहाइम विद्यापीठात इतिहास, कायदा, अर्थशास्त्र, विज्ञान, इंजिनिअरिंग, आर्ट आणि मानविकी यासह विविध विषयांचे शिक्षण दिले जाते.
उत्तर लिहिले · 5/9/2023
कर्म · 34175
1
भारता पेक्षा तुलनेत- बुद्धिमान, व शास्त्रज्ञ, तसेच अनेक शोध व संशोधन, अनेक प्रयोग, मानव उपयोगी तंत्ज्ञानविषयक, अनेक कंपनी, अमेरिका, जपान, रशिया , फ्रान्स, इटली, जर्मनी, चीन, इग्लंड,या देशाचं तंत्रज्ञान खूप पुढे आहे कारण काय असेल? तेव्हा भारत मागे का होता, त्या भूभागात तेथे लोक खूप हुशार व बुध्दीमान जन्मतात का ? , उत्तर अपेक्षीत
उत्तर लिहिले · 9/6/2022
कर्म · 145
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
कोरोना आजार कायमस्वरूपी नष्ट न होता वेगवेगळ्या प्रकारात किंवा रुपात समोर येत आहे . जवळपास सर्वच देशांमध्ये लसीकरण झाल्याने कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे परिमाण दिसून येत आहे.पण लसीकरणाने  मृत्यूप्रमाण अगदी कमी किंवा राहिलेले नाही.भारताचा विचार केल्यास चौथी लाट येऊ शकत नाही कारण लसीकरण झालेले आहे . साधारणपणे पावसाळ्यात कोरोना परत डोके वर काढू शकतो पण जनतेने काळजी घेतली आणि 3ला बूस्टर  डोस जर घेतला तर नक्कीच आपण यावर मात करू शकतो. जसे पूर्वी मलेरिया, टायफॉईड, कावीळ ,डेंगू ,स्वाईन फ्लू याने लोक दगावत होते . तसे या 2 वर्षांत कोरोनाने लोक गेलेत पण त्यावर उपचार व काळजीपूर्वक हाताळणी केल्याने पुढील काळात जास्त प्रमाणात याचा शिरकाव होणार नाही. अगदी 100% होणार नाही असे नाही पण मुत्युइतपत आकडे येणार नाही. जसे तिसऱ्या लाटेत झालं त्यात मुत्युदर कमी राहिला. थोड्याफार प्रमाणात कोरोनाची लक्षणे दिसतील पण लगेच थोड्याच ट्रिटमेंटने बरी होतील. असे मला वाटते.
उत्तर लिहिले · 9/4/2022
कर्म · 11745
1
वेदांचे लिखित स्वरूप करण्याचा प्रयत्न पाश्चात्त्य अभ्यासकांनीच पहिल्यांदा केला. त्यातूनच मॅक्स मुल्लर यांनी १८५६ मध्ये ऋग्वेदाची संस्कृत-जर्मन संहिता प्रकाशित केली. त्यांच्याकडून संस्कृतचा पहिला पाठ गिरवून घेणारे हार्मन ब्रॉकहॉस यांना मॅक्स मुल्लर यांनी हा ग्रंथ समर्पित केला आहे.  




दीडशे वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ऋग्वेदाची संस्कृत-जर्मन संहिता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात अलीकडेच दाखल झाली आहे. मॅक्स मुल्लर यांनी लेखन केलेल्या या संहितेची पहिल्या आवृत्तीची मूळ प्रत अनपेक्षितपणे ठेवा म्हणून हाती आल्याने वेदांचा अभ्यास करणाऱ्या प्राच्यविद्या संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वेद हे अपौरुषेय आहेत आणि मौखिक परंपरेद्वारे पठणाच्या माध्यमातून वेदांचे जतन करायचे, ही भारतीयांची संकल्पना आहे. त्यामुळे वेदांचे लिखित स्वरूप करण्याचा प्रयत्न पाश्चात्त्य अभ्यासकांनीच पहिल्यांदा केला. त्यातूनच मॅक्स मुल्लर यांनी १८५६ मध्ये ऋग्वेदाची संस्कृत-जर्मन संहिता प्रकाशित केली. त्यांच्याकडून संस्कृतचा पहिला पाठ गिरवून घेणारे हार्मन ब्रॉकहॉस यांना मॅक्स मुल्लर यांनी हा ग्रंथ समर्पित केला आहे. ९०० पृष्ठांच्या या ग्रंथामध्ये मूळ संस्कृत ऋचा असून त्याचा जर्मनमध्ये भावार्थ अनुवाद आहे. यामध्ये मूळ आवृत्तीतील ही प्रत भांडारकर संस्थेच्या संग्रहालयामध्ये आली आहे. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये १८९७ आणि १९०६ मध्ये प्रकाशित झालेल्या ऋग्वेद संहिता आहेत. मात्र, अनामिक दात्याने दिलेला हा ठेवा त्याही पूर्वीच्या कालखंडातील आहे.
ऋग्वेदाची संस्कृत-जर्मन संहिता हा ग्रंथ संस्थेकडे आला याचीही एक सुरस कहाणी आहे. दोन युवक हा ग्रंथ घेऊन संस्थेमध्ये आले आणि ‘साहेबां’नी आम्हाला पाठविले आहे असे सांगत हा ग्रंथ आपल्या हाती सुपूर्द केला, अशी माहिती ग्रंथपाल सतीश सांगळे यांनी दिली. आम्ही येरवडा येथून आलो असल्याचे त्यांनी सांगितले खरे; पण हे साहेब म्हणजे कोण याचा उलगडा त्यांनी केला नाही. या ग्रंथाच्या पहिल्या पानावर ‘राजीव जून १९९२’ असे लिहिलेले आहे. हे कदाचित या ग्रंथाच्या मूळ मालकाचे नाव असावे आणि त्याने खरेदी केलेल्या दिवशीची तारीख त्यावर समाविष्ट केली असावी. मात्र, या राजीवची आणखी माहिती संस्थेला उपलब्ध होऊ शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.
काय आहे ग्रंथात?
– ऋग्वेदाचे प्रतिशाख्य म्हणजेच अनुवाद
– ऋग्वेदाच्या ऋचांमध्ये वर्णन केलेल्या स्थळांची सूची
– ऋग्वेद मंडल : संस्कृत संहिता पाठ आणि पदपाठ
– मंडलाची सूची
– देवता, ऋषी आणि प्रतीकं यांची सूची




उत्तर लिहिले · 15/9/2021
कर्म · 121725