2 उत्तरे
2
answers
औरंगाबादच्या पाणचक्की बद्दल माहिती द्या?
0
Answer link
औरंगाबाद शहरामधील पाणचक्की हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे शहर मध्ययुगीन काळात महत्वाचे केंद्र होते आणि या पाणचक्कीचा उपयोग पाणी वापरून धान्य दळण्यासाठी केला जात असे.
इतिहास:
- पाणचक्कीची निर्मिती 17 व्या शतकात झाली.
- याचा उद्देश हा शहरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी आणि गरजू लोकांसाठी अन्न उपलब्ध करणे हा होता.
- या चक्कीला पाणी हर्सूल तलावातून एका भूमिगत नलिकेद्वारे आणले जाते.
रचना:
- पाणचक्कीची रचना अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. यामध्ये पाण्याचा प्रवाह वापरून चक्कीच्या पात्या फिरवल्या जातात, ज्यामुळे धान्य दळले जाते.
- परिसरात एक मशीद, काही निवासस्थाने, आणि एक न्यायालय देखील आहे.
आजची स्थिती:
- आज पाणचक्की एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
- येथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात आणि या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती घेतात.
पाणचक्की हे औरंगाबादच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आजही ते आपल्या कार्यामुळे आणि रचनेमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
*🏪 चारशे वर्षापुर्वीची औंरगाबादची पाणचक्की*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारे प्रचंड दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर धान्य दळून सैन्याची रसद भागवणे, ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये झाला. https://bit.ly/4jjMVOh त्यावेळचे शास्ते अभियांत्रिकीत कसे जाणकार होते याचाच हा पुरावा.. पाणी आणि दैनंदिन रसद याची गरज भागवण्यासाठी पाणचक्कीच्या निर्मितीतून जल अभियंत्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा प्रयोग मराठवाडा भूमीत औरंगाबाद येथे झाला. ती म्हणजे पर्यटक तसेच अभ्यासकांना अवाहने करणारी बाराशे वर्षांची पुरातन पाणचक्की.. औरंगाबाद शहर दर्शनामध्ये या पानचक्कीला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारावरती दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर दळण दळून सैन्याची रसद भागवणे ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबाद नगरीत झाला. त्यावेळचे आमचे शास्ते अभियांत्रिकीत कसे जाणकार होते याचाच हा पुरावा आहे.‘खाम’ नदीच्या काठावरचे पाणचक्की या ठिकाणी पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा हे दोन्हीही उद्देश साधले आहेत.मोघल सरदार मलिक अंबर यांने आपल्या अधिपत्याखालील औरंगाबाद शहराला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर करून ‘नहर-ए-अंबरी’ नावाची पाणीपुरवठा योजना आखली होती. जेथे पाणचक्की आहे त्याच्या प्रांगणात सुफीसंत बाबा शहा मुसाफिर हे अवतारी पुरुष राहात असत. तेव्हा या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यांचे शिष्य बाबा शहा महदूम यांनी पाणचक्कीचे बांधकाम पूर्णत्वास नेले. याव्यतिरिक्त दरगा, खामनदीवरील वेस व वाहतुकीसाठी पूल ही बांधकामे देखील त्यांच्याच कल्पकतेने पूर्ण झाली.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫कोणत्याही अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाची जोड नसताना मनुष्यबळाच्या साह्याने खामनदीच्या उगमस्थानी प्रथम पाणीअडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जी भिंत उभारली आहे त्यासाठी विटा आणि चुन्याचा वापर केला गेला. तलावातील साठवलेले पाणी सुमारे चारमैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी ‘नहरी’ म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले. या पाणीपुरवठा योजनेसाठी त्या काळी चार लाख रुपये खर्च झाल्याची नोंदआहे.औरंगाबादच्या उत्तरेकडे ५ कि.मी. अंतरावर भरपूर पाणी साठय़ाचे ‘जटवडय़ा’चे पहाड आहेत. येथील पाणीसाठा एकत्रित करून कालव्यांनी बीबीच्या मकबऱ्यापर्यंत आणण्यात यशस्वी झाल्यावर त्या पाणी प्रवाहाला बंदिस्त करून भूमिगत मातीच्या नळांनी हे पाणी पाणचक्की प्रांगणात आणले गेले. हा जलप्रवाहनळाच्या साह्याने उंच भिंतीवर चढवून एका मोठय़ा हौदात सोडला गेलाय. येथे एक ध्यानी घेतले पाहिजे की, पाणचक्कीच्या पातळीपेक्षा पाण्याच्या उगमस्थानाची पातळी उंचावर असल्याने कोसळणाऱ्या पाण्याच्या दाबाद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करण्यात अभियंते यशस्वी झालेत.सायफन पद्धतीचा वापर करून जे पाणी भिंतीवर नेण्यात आले तेथून ते ज्या हौदामध्ये पडते तो हौद सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद वचार फूट खोल आहे. तसेच त्यामध्ये १ लाख २८ हजार गॅलन पाणी साठवण्याची त्याची क्षमता आहे.
या हौदाच्या नजीकच पुरातन मशीद असून त्याचे बांधकाम म्हणजे बंगाली-ईस्लामी वास्तुशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे.. जो जलप्रवाह कोसळतो तेथून उतरंडीच्या भिंतीत नळ बसवून हे पाणी एका छोटेखानी खोलीत आणले गेले आहे. याच ठिकाणी भलेभक्कम भव्य लोखंडी पात्याचे चक्र भक्कम लोखंडी दांडय़ावर बसवले आहे. भिंतीवरून कोसळणारा जलप्रवाहाचा दाब लोखंडी पात्यावर पडल्याने त्या लोखंडी चक्राला गती प्राप्त होऊन लोखंडी दांडा फिरता राहतो.त्या दांडय़ाच्या मध्यभागी जे भलेमोठे दगडी जाते आहे ते या दांडय़ाच्या गतीच्या आधारे सतत फिरते राहिल्याने धान्य दळण्याचेकाम विनासायास पार पाडले जाते. थोडक्यात, पाणी प्रवाहातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर करून दळणाच्या दगडी जात्याला गती प्राप्त झाली.पाणचक्की हे ठिकाण फक्त जल व्यवस्थापनासाठी सर्वश्रुत होते असे नव्हे तर ते एक यात्रेकरू, पांथस्थ तसेच धार्मिक अध्यापन करणाऱ्यांचे सांस्कृतिक शैक्षणिक केंद्रही होते. मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळी पाणचक्कीला जोडून निवास व्यवस्थेसाठी बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला ‘खानका’ असे म्हणतात. या निवासात अध्ययन- पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास-भोजनाची सोय होती. तेथील अरेबी, फारसी ग्रंथसंपदेचे ग्रंथालय आशियातील सर्वात मोठे ग्रंथालय होते.पाणचक्कीच्या परिसरात बाबा शहामुसाफीर व त्यांचे शिष्य बाबा महदूम यांच्या कबरी आणि दर्गावास्तू असून त्यांच्या बांधकामासाठी काळय़ा पाषाणाचा वापर केला असून त्याला विटांसारखा लाल रंग दिला आहे.सध्या या पाणचक्की आणि त्याचे व्यवस्थापन तथा नियंत्रण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे आहे. ही पुरातन जलव्यवस्थापन पद्धती आणि वास्तुकला बघण्यासाठीदेश-विदेशातील पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात.चार शतकांपूर्वीचे हे जल अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि त्यासाठी उभारलेली वारसा वास्तू बघितत्यावर त्यावेळच्या प्रजाहितदक्ष- दूरदृष्टीच्या शासनकर्त्यांच्या कल्पकतेची जाणीव होणारच.
https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
