देश

आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत?

1 उत्तर
1 answers

आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत?

1
आपल्या देशातील मुख्य ऋतू l उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे मुख्य ऋतू मानले जातात. तर 
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंमध्येही आपण वर्षाची विभागणी करतो.  .प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काहीशे किंवा काही हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्त्वाची ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ यांमधील हवामान एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटरपर्यंत वाढविल्यास विविधता आणखी वाढते.

वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. पैकी शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग आहेत..
उत्तर लिहिले · 12/3/2024
कर्म · 765

Related Questions

ब्राझील या देशाचा बोधचिन्हाविषयी माहिती?
भारताकडे एक तरून देश म्हणून पाहिले जाते.?
भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये कोणत्या देशामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे?
कोनता देशाचे सविधान पूर्णत,लिखीत नाही?
भारत देशात किती राज्य आहे?
वास्को द गामा कोणत्या देशाचा दयावरदी होता?
भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.?