संत
संत तुकाराम महाराजांचे मुस्लिम धर्मीय संदर्भातील विचार?
1 उत्तर
1
answers
संत तुकाराम महाराजांचे मुस्लिम धर्मीय संदर्भातील विचार?
2
Answer link
संत तुकाराम महाराजांचे मुस्लिम धर्मीय संदर्भातील विचार
इस्लामचे भारतातील योगदान:
कदाचित हा विषय मुळात आश्चर्यकारक वाटलं असेल अनेकांना. इस्लाम भलेही अरब भूमीतून आलेला संदेश असेल परंतु भारतातील ९७% मुस्लिम हे धर्मांतरित मुस्लिम आहेत. याच मातीचे सुपुत्र आहेत. याच मातीत जन्मतात आणि याच मातीची पुरले जातात. त्यांना पुरण्यासाठी कोठे परदेशी नेले जात नाही. मागील ८०० वर्षांपासून भारतात राहतात. यांच्या कित्येक पिढ्या जन्मल्या आणि संपल्या. कसे शक्य आहे की यांनी कोणतीच सामाजिक भूमिका बजावली नसेल? सामाजिक भूमिकादेखील बजावली आहे आणि वैचारिक देवाणघेवाणदेखील झाली आहे. सत्य इतकंच आहे की हे पुढे येऊ दिलं गेलं नाही. दडवून ठेवण्यात आलं. सुधारणावादी चळवळींचा इतिहास पाहता आपल्या देशात ज्या काही सुधारणावादी चालवली जन्माला आल्या त्या भारतात इस्लामच्या प्रवेशानंतरच जन्माला आल्या हे वास्तव कोणत्याही इतिहास अभ्यासकाला नाकारता येणारच नाही. हे का झालं? कारण मुस्लिमांनी इस्लामी विचारांची देवाणघेवाण केली. राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले, न्या. रानडे, स्वामी विवेकानंदसारख्या विचारवंतांनी हे उघडपणे मान्य केलं आहे की शोषित समाजात चेतना निर्माण करण्याचे काम इस्लामने केले. एम. एन. रॉयसारख्या प्रकांड विद्वान भारतीय सुधारणावादी आंदोलनांचा जनक म्हणून इस्लामचा गौरव करतो.
संत तुकाराम महाराज आणि हजरत शेख महंमद:
अहमदनगर येथील श्रीगोंदा या ठिकाणी हजरत शेख महंमद हे एक मुस्लिम विचारवंत होते. त्यांची आणि संत तुकाराम महाराजांची घनिष्ट मैत्री. हजरत शेख महंमद साहेब कुरआन प्रवचन घ्यायचे. त्याला तुकाराम महाराजांची आवर्जून उपस्थिती असायची. कुरआनाच्या कित्येक आयती तुकारामांच्या गाथेत अभंग स्वरूपात सापडतात. त्यांची ही मैत्री त्यांच्या मृत्यूनंतरदेखील टिकून आहे. देहू गावातून निघणारी दिंडी आजही श्रीगोंदा येथे शेख महंमद यांच्या दफनस्थळी तीन दिवस मुक्कामाला असते. इतका मान हजरत शेख महंमद यांचा. बरे चालता चालता हेदेखील स्पष्ट करतो की हजरत हा फारशी शब्द असून आदरणीय, माननीय या अर्थी वापरला जातो. ‘हजरत’ असा उल्लेख करणे म्हणजे मुस्लिमच असणे असे नाही.
संत तुकाराम महाराज आणि अल्लाह:
संत तुकाराम महाराज आस्तिक होते आणि सृष्टीच्या निर्मात्यावर त्यांची श्रद्धा होती. आ. ह. साळुंखे सारखे विद्वान जेव्हा तुकाराम महाराजांची नास्तिक अशी मांडणी करतात तर ती निर्मात्याचा नकार देणारा या अर्थाने नसून ‘वेदांना न मानणारा’ या अर्थाने असते. तुकाराम महाराज आपल्या अभंगात अल्लाहचा उल्लेख अनेक ठिकाणी करतात. अल्लाहचे सार्वभौमत्व स्पष्टपणे मान्य करतात. एका ठिकाणी ते म्हणतात,
।। अल्लाह देवे अल्लाह दिलावे । अल्लाह दारू (दाता) अल्लाह खिलावे
अल्लाह बिगर नाही कोय । अल्लाह करे सो ही होय ।।
तर दुसऱ्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात,
।। अल्लाह करे सो होय बाबा करतार का सिरताज
जिकर करो अल्लाह का बाबा सावल्या अंदर भेस
कहे तुका जो नर बुझे सोही भया दरवेस ।।
असे एक नाही अनेक अभंग तुकारामांच्या गाथेत आढळतात. यावरून असे दिसते की विश्वाचा परमेश्वर तोच हरी तोच अल्लाह ही संकल्पना शेख फरीद यांच्या संपर्कातून तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचली होती. सामन्यात जसा गैरसमज आहे की अल्लाह मुस्लिमांचा देव आहे, हे तुकारामांना मान्य नव्हते. इस्लाम सर्वांच्या परमेश्वराचा अल्लाह या नावाने उल्लेख करतो ही संकल्पना त्यांना माहित होती. तसेच ते जर ‘निर्माता’ न मानणारे नास्तिक असते तर त्यांचे हे विचार दांभिकता ठरतात. एका संताने असा दांभिकतेचा मार्ग पत्करावा हे बुद्धीला कधीही पटणारे नाही. म्हणून सत्य हेच आहे की ते आस्तिक होते.
तुकाराम महाराज आणि समाज सुधारणा:
तुकाराम महाराज मुस्लिम संतांच्या संपर्कात असल्याने ते समाजसुधारणांचा अध्यात्मिक मार्ग स्वीकारताना दिसतात. त्यांच्या अभंगावर सामाजिक विकृतीपेक्षा जास्त भर वयक्तिक विकृतीवर देण्यात आला आहे. व्यक्तीच्या चारित्र्याचा उद्धार केल्याशिवाय समाजाची सुधारणा होणार नाही हे त्यांच्या अभंगातून जाणवते. समाज सुधारणा करायची असेल तर स्वतःच्या चरित्रापासून सुरुवात करायला हवी हे तुकाराम महाराजांच्या अभंगात पावलोपावली जाणवते. आजच्या काही ढोंगी सुधारकांचा ‘आमचे नीच चरित्र पाहू नका, आमचे उच्च विचार पहा’ अश्या प्रकारची संत तुकारामांची सुधारणा नाही. आपल्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,
।। का रे ना आठविसी कृपाळू देवासी । पोसितो जगाशी, एकला तो ।।
।। बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती । वाढवे श्रीपती सवे दोन्ही ।।
।। फुटती तरुवर उष्णकाळ मासी । जीवन तयासी कोण धारी ।।
।। तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनी ।।
।। तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करी ।।
प्रेषितांचे उपदेश आणि तुकारामांचे अभंग:
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगातून प्रेषितांच्या हदीसींना व्यक्त केले आहे. प्रेषित मुहम्म्मद (शांती असो त्यांच्यावर) यांनी अनेक ठिकाणी मानवतेला उपदेश करताना सांगितले की आपल्या घरांना स्मशान बनवू नका. ईशभय मणी बाळगा. (संदर्भ: बुखारी, मुस्लिम) तोच संदेश तुकाराम महाराज आपल्या अभंगातून खालील शब्दांत देतात,
।। हरी नाही चित्ती तो शव जाणा । स्मशान ती भूमी प्रेत रूप जण ।।
तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागेल. तुम्ही इतरांच्या मार्गात काटे लावून स्वतःसाठी फुलांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. हा संदेश देताना तुकाराम महाराज म्हणतात,
।। पेरी कडू जिरे, मागी अमृत फळे । अरके वृक्षा कैसी येती ।।
पैगंबर, प्रेषित, संत कशासाठी?
पैगंबर, संतांची भूमिका काय होती? ते जगाची सत्ता मागू इच्छित होते? की त्यांना लोकांना गुलाम करायचे होते? कुरआन प्रेषित मुहम्मद यांचा उल्लेख करताना त्यांची तळमळ पाहून म्हणतो, हे प्रेषित काय या लोकांच्या कल्याणापोटी स्वतःचे प्राण पणाला लावणार काय?
तर दुसऱ्या ठिकाणी कुरआन म्हणतो लोकांचे दुःख पाहून तुमचा जीव कासावीस होतो याची आम्हाला जाणीव आहे. याच संदेशाला तुकाराम महाराज आपल्या अभंगात अश्याप्रकारे व्यक्त करतात,
।। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परोपकारें ।।
प्रेषित मुहम्मद म्हणतात निवाड्याच्या दिवशी माणसाला त्याच्या कर्माचे फळ दिले जाईल. तेच अल्लाह विचारेल, हे मानव तू माझी मदत का नाही केलीस? मानव उत्तर देईल हे परमेश्वरा, तू जगाचा पोशिंदा, मी तुझी मदत कसा बरे करू? अल्लाह उत्तर देईल गरजवंतांची मदत केली असतीस तर मी तुला तेथे भेटलो असतो. (अर्थातच ही केवळ उपमा आहे) याचा उल्लेख संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात अशाप्रकारे करतात,
।। जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ।।
।। तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||
प्रेषित मुहम्मद म्हणतात मृत्यूची जाणीव ठेऊन मानवाने सत्कर्म करीत जावे. मृत्यूला सदा स्मरावें. संत तुकाराम महाराज म्हणतात,
।। नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।
अल्लाह आणि नबी वर संत तुकारामांचा विश्वास:
अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांचा उल्लेख करताना संत तुकाराम महाराज निर्भीडपणे म्हणतात, माझे डोके, हात, पाय जरी कापून टाकले तरी माझा जीव मुळीच घाबरणार नाही. अल्लाह तूच एकटा आहेस, नबी तूच एकटा आहेस.
।। अल्लाह एक तु । नबी एक तु ।।
।। काटते सर पावो हाते । नही जीव डराये ।।