कवी

क्रांतीचा जयजयकार या कवितेचे कवी कोण आहेत आणि त्यांनी आणखी कोणती साहित्यकृती लिहीली आहे?

2 उत्तरे
2 answers

क्रांतीचा जयजयकार या कवितेचे कवी कोण आहेत आणि त्यांनी आणखी कोणती साहित्यकृती लिहीली आहे?

0
क्रांतीचा जयजयकार या कवितेचे कवी कुसुमाग्रज

क्रांतीचा जयजयकार - कुसुमाग्रज
क्रांतीचा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

उत्तर लिहिले · 19/6/2023
कर्म · 52060
0

क्रांतीचा जयजयकार या कवितेचे कवी वि. वा. शिरवाडकर आहेत.

वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या इतर काही साहित्यकृती:

  • काव्यसंग्रह: Balirajachi Kavita (बळीराजाची कविता), Jaducha Zhala (जादूचा झगा), Yalgar (यल्गार), Vadalvela (वादळवेळ)
  • नाटके: Natasamrat (नटसम्राट), Wele Maya (वीज म्हणाली धरतीला), Yayati Aani Devayani (ययाती आणि देवयानी), Himalayachi Savali (हिमालयाची सावली)
  • कथासंग्रह: Kahi Vyakti Aani kahi Prakar (काही व्यक्ती आणि काही विक्रम)
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 680

Related Questions

कवी अनिल यांचा दशपदी रचना प्रकार विशद करा?
रविकिरण मंडळातील कवींची नावे लिहा?
ग्रेस आणि महानोर या दोन्ही कवींच्या रचनांचे प्रमुख वैशिष्ट्ये विशद करा?
कवी ग्रेस व रोशन?
प्रस्तुत कवितेची कवी/कवयित्री कोण आहे?
मराठी आग्रही कवी म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
देणाऱ्याने देत जावे या कवितेतून कवीने कोणता संदेश दिला आहे?