राजधानी

महंमद बिन तुघलक यांनी केलेल्या राजधानी स्थलांतरावर संक्षिप्त चर्चा करा?

1 उत्तर
1 answers

महंमद बिन तुघलक यांनी केलेल्या राजधानी स्थलांतरावर संक्षिप्त चर्चा करा?

0
राजा असावा प्रजेची काळजी घेणारा आणि संपूर्ण राज्यात सुखाचे साम्राज्य प्रस्थापित करणारा ! असे अनेक राज्यकर्ते होऊन गेले ज्यांनी आपल्या प्रजेसाठी सर्वस्व अर्पण केले.

या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आघाडीने घेतले पाहिजे. प्रत्येक क्षणी त्यांच्या डोक्यात आपल्या रयतेच्या सुखाचा आणि स्वराज्याचा संरक्षणाचाच विचार चालत असे.


असा राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला हे आपले सौभाग्य! पण इतिहासाची पाने पालटताना काही असे राजे देखील समोर येतात, ज्यांनी रयतेचा छळ केला, संपूर्ण राज्य देशोधडीला नेऊन सोडले.

स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारख्या कृती करत त्यांनी आपण अकार्यक्षम राज्यकर्ते असल्याचे सिद्ध करून दाखवले. या यादीमध्ये सर्वात आघाडीवर नाव घेतले पाहिजे मुहम्मद बिन तुघलक याचे!


आजवर जितक्या सुलतानांनी दिल्लीच्या तख्तावर बसून कारभार पहिला त्यांमध्ये मुहम्मद बिन तुघलक हा सर्वात विद्वान सुलतान होता, हे फारच कमी जणांना ठावूक असेल, पण तरीही त्याने स्वत:च्या कारकिर्दीत अक्कल गहाण ठेवून असे काही निर्णय घेतले ज्यामुळे त्याला इतिहासातील सर्वात मूर्ख राजाची पदवी मिळाली.

तुघलक राजवंशाचे संस्थापक गयासुद्दिन तुघलक यांचा पुत्र उलुग खां उर्फ जौना खां हाच पुढे मुहम्मद बिन तुघलक या नावाने ओळखला जाऊ लागला. वडील गयासुद्दिन यांच्या मृत्यूनंतर मुहम्मद बिन तुघलक याने सन १३२५ ते सन १३५१ या काळात दिल्लीमध्ये बसून अखत्यारीत असलेल्या संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळला.

मुहम्मद बिन तुघलक हा फारशी आणि अरबी भाषेचा विद्वान होता. गणित, खगोलशास्त्र, भविष्य, तर्कशास्त्र या विषयांमध्ये देखील तो अतिशय पारंगत होता.

तो दान धर्म देखील करायचा. हा त्याकाळचा पहिला सुलतान होता जो हिंदूंच्या होळी आणि दिवाळी सारख्या सणांमध्ये स्वखुशीने सहभागी व्हायचा. मुख्य म्हणजे तो कुशल योद्धा देखील होता.


तर अशा या उत्तम राज्यकर्त्याने अजिबात विचार न करता काही असे निर्णय घेतले ज्याचे चांगलेच विपरीत परिणाम त्याला भोगावे लागले. सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी ताब्यांची नाणी चलनात आणली. 

मुहम्मद बिन तुघलकाच्या लक्षात आले होते, की आपल्याकडे सोन्या चांदीपेक्षा तांबे आणि पितळ मुबलक प्रमाणत आहे आणि म्हणून त्याने स्वत:च्या राजवटीत “दोकानी” नावाचे एक चलन जारी केले. जे तांबा आणि पितळ यापासून बनवले जात असे आणि ही नाणी लोहारांकडून बनवून घेतली जात असतं.

ज्यामुळे आपसूकच तुघलकाचं त्यांवर नियंत्रण राहील नाही आणि त्याची बनावट नाणी बनू लागली. लोकांच्या हातात पैसा येऊ लागला. गरजेपेक्षा जास्त नाणी बाजारात फिरू लागली, परिणामी महागाईने उच्चांक गाठला.

जेव्हा ही गोष्ट तुघलकाच्या लक्षात आली तेव्हा त्याने पुन्हा नवीन नाणी रद्द करून त्या जागी जुनी नाणी चलनात आणली आणि असे जाहीर केले की तांब्या-पितळेच्या खऱ्या नाण्यांच्या बदल्यात तेवढ्याच किंमतीचे सोने आणि चांदी देण्यात येईल.

मग काय लोकांच्या या योजनेवर उड्या पडल्या आणि इकडे राजाच्या खजिन्यातील सोने आणि नाणी काही दिवसातच संपुष्टात आली.


राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवण्याचा मूर्खपणा…

या एका निर्णयामुळे मुहम्मद बिन तुघलक इतिहासात अधिकृतरीत्या मूर्ख घोषित केला गेला. मंगोली सैन्याच्या वारंवार कारवायांनी त्रस्त झालेल्या तुघलकाने आपली राजधानी दक्षिणेमध्ये देवगिरी अर्थात आजचा दौलताबाद किल्ला येथे हलवण्याचा निर्णय घेतला.

मुहम्मद बिन तुघलकाला दक्षिणेचे फारच आकर्षण होते, त्यामुळे त्याने त्वरित आपल्या संपूर्ण प्रजेसह देवगिरीच्या दिशेने कूच केले.

परंतु किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता असल्याकारणाने त्याने आपली दिल्लीच बरी असे म्हणत राजधानी पुन्हा दिल्लीला हलवण्याचे ठरवले. ४० दिवसांत ७०० मैलांचा प्रवास करून आलेल्या प्रजेला सुलतानच्या या निर्णयावर हसावं की रडावं तेच कळेना, पण शेवटी तो ठरला सुलतान त्याच्या विरोधात कोण जाईल.

दिल्ली ते देवगिरी आणि पुन्हा दिल्ली या संपूर्ण प्रवासात कित्येक लोक आजाराने, थकव्याने मृत्यूमुखी पावले. ही घटना म्हणजे मुहम्मद बिन तुघलकाच्या कारकिर्दीवर लागलेला सर्वात मोठा कलंक ठरली
उत्तर लिहिले · 19/2/2023
कर्म · 9415

Related Questions

पल्लव घराण्याची राजधानी कोणती होती?
दिल्ली चि राजधानी?
...... ही भारताची राजधानी आहे?
उत्तर प्रदेशची राजधानी?
युक्रेनची राजधानी कोणती आहे?
भारताची एक दिवसाची राजधानी कोणती आहे?
युक्रेनची राजधानी कोणती?