सामन्याज्ञान

जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काय करता येईल?

1 उत्तर
1 answers

जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काय करता येईल?

0


जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काय करायचं 



आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि आपण ज्या ग्रुपमध्ये बसलो आहोत, तिथे सगळे जागतिक स्तरावर घडणाऱ्या विविध घडामोडींविषयी बोलत आहेत. पण आपल्याला तर त्यातलं काही माहिती नाही. अशावेळी शांत बसण्याची वेळ आपल्यावर येते. शिवाय, आपल्याला जगात काय घडतंय, यातलं काहीही माहिती नाही, हे इतर सगळ्यांनाही लगेचच कळतं. अशावेळी कुठे तोंड लपवावं असं आपल्याला होतं. पण असं होऊ नये म्हणून जनरल नॉलेज कसं वाढवायचं हे या लेखात पाहू.
जनरल नॉलेजची गरज
आपल्या स्थानिक परिसरात, राज्यात, देशात किंवा अगदी जगभरात काय चाललं आहे, याचं ज्ञान एक सजग नागरिक, माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कोणतीही अडचण आपल्यासमोर अचानक आली, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी, कोणाला मदत करण्यासाठी किंवा इतरांनाही अशा अडचणींविषयी सजग करण्यासाठी या ज्ञानातून आपण मदत करु शकतो. इतकंच नाही, तर आपल्या क्षेत्रात घडणारे बदल, नवनवीन तंत्रज्ञान, जागतिक स्तरावर घडणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचं ज्ञान आपल्याला आकर्षक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वाच्या ठरत असतात.
१. वृत्तपत्र वाचन
जनरल नॉलेज वाढवण्याचा एक पारंपरिक प्रकार म्हणजे वृत्तपत्राचं वाचन. अगदी स्थानिक घडामोडींपासून आपल्याला या माध्यमातून माहिती मिळवता येते. आपल्या राहत्या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काय घडामोडी घडत आहेत, ही सगळी परिस्थिती आपल्या वर्तमानपत्रातून समजते. काही वर्तमानपत्र जनरल नॉलेजसाठी वेगळे कॉलम देतात. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न दिले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरं जाहीर केली जातात. शब्दकोडी दिली जातात. हे सगळं जनरल नॉलेज वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं.
२. बातम्यांचे चॅनल्स
गेल्या काही वर्षात बातम्यांच्या चॅनेल्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंग्रजी या जागतिक स्तरावरच्या भाषेपासून प्रादेशिक भाषांपर्यंत चॅनल्स आपल्याला सहज उपलब्ध आहेत. वर्तमानपत्रापेक्षा बातम्यांच्या चॅनल्सचा आवाका मोठा आहे. घडणाऱ्या घडामोडींची त्वरीत माहिती या माध्यमावर मिळत असल्याने जनरल नॉलेज वाढवण्यासाठी या पर्यायाचा उपयोग आपण करुन घेऊ शकतो.
३. मित्रांशी, सहकाऱ्यांशी चर्चा करा
अनेकांना बातम्या वाचणं, बघणं नकोसं वाटतं. पण गप्पा मारायला मात्र आवडत असतं. अशावेळी सरळ आपल्या मित्रांकडून, सहकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी. बिनधास्त प्रश्न विचारावेत, आपल्याला काही शंका असतील तर त्यावर उत्तरं त्यांच्याकडून जाणून घ्यावीत. आपल्याकडे राजकारण, समाजकारण किंवा इतर घडामोडींवर बोलण्याची आवड अनेकांना असते. असे मित्र आपलं नॉलेज / ज्ञान वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे असतात.
४. बातम्यांचे ॲप्स इन्स्टॉल करा
स्मार्टफोन हल्ली प्रत्येकाच्या हातात आला आहे. आपल्याला वाटेल ते ॲप आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करु शकतो. बातम्यांचे तर भरपूर ॲप्स सध्या उपलब्ध आहेत. जगात कुठेही काहीही घडलं की ताबडतोब ॲपवर अपडेट होत असतं. अवघ्या काही वेळात आपल्याला त्या घटनेची माहिती मिळू शकते, इतकी तत्परता या माध्यमात आहे. त्यामुळे अपडेट राहण्यासाठी, जगाच्या बरोबर चालण्यासाठी बातम्यांच्या ॲप्सचा फायदा जनरल नॉलेज विकासासाठी निश्चितच मोठा आहे.
५. विश्लेषणं ऐका
अनेकदा आपण बातम्या ऐकतो. सध्याचाच विचार केला तर युक्रेन आणि रशियाचं युद्ध आपण बघत आहोत. अशावेळी कोण बरोबर आणि कोण चूक हे आपल्याला बातम्यांमधून लक्षात येत नाही. आपल्याला कुठे मत देण्याची वेळ आली तर तेदेखील त्यामुळे आपल्याला देता येत नाही. अशावेळी जाणकारांनी केलेले विश्लेषणं ऐकण्यावर भर दिला पाहिजे. युट्यूब, फेसबुक या माध्यमावर अनेक न्यूजपेपर, चॅनल्सचे संपादक, त्या–त्या क्षेत्रातील जाणकार विषयांचं विश्लेषण करत असतात. ती व्यवस्थित ऐकूण आपल्याला घडणाऱ्या घडामोडींचा गाभा लक्षात येऊ शकतो.
हल्लीच्या काळात आपण फक्त नोकरी करतो आणि पैसे कमावतो इतकं म्हणून चालत नाही. समाजात प्रतिष्ठा हवी असेल तर आपल्याला सामाजिक भान असणंदेखील तितकंच गरजेचं आहे. हे भान बातम्या, घडामोडींमधून मिळत असतं. साहजिकच यातून आपल्या जनरल नॉलेजचा विकास होत असून, त्यातून आपोआपच बौद्धीक, वैचारिकदृष्ट्या आपण अधिक परिपक्व होतो. त्यामुळे दैनंदिन कामांबरोबरच जनरल नॉलेज विकासावर आपण प्रत्येकाने भर देणं गरजेचं आहे.
उत्तर लिहिले · 26/12/2022
कर्म · 48465

Related Questions

सरकारी कर्मचारी संप कशासाठी करतात?
विधवा स्त्री बद्दल माहिती मिळेल का?
पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कसे मिळवावे?
पुराणांची संख्या किती आहे?
गॅस सिलेंडर पुस्तक हरवल्यास सिलेंडर कसा मिळवायचा?
निवृत्ती नंतर काय करता येवू शकेल?
वसंत ऋतू माहिती मिळेल का?