दिनविशेष

२३ नोव्हेंबरचे दिनविशेष कोणते येईल?

1 उत्तर
1 answers

२३ नोव्हेंबरचे दिनविशेष कोणते येईल?

2
Ramprasad Doiifode:
त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील 'अदा' या मालिकेत तिला भूमिका मिळाली. 

तिने झी म्युझिक वाहिनीवरील 'बॉलिवुड टुनाइट' या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील कॉमेडी एक्सप्रेस (२०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै २०१२ मध्ये तिने 'कॉमेडी एक्सप्रेस' कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले. मराठी चित्रपटसृष्टितील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर ने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा याच्याशी लग्न केले आहे. 

अमृता खानविलकर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*सौजन्य : विकीपिडीया*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********
[23/11, 8:32 am] Shri Vinod Sir: ********
*🌹 २३ नोव्हेंबर 🌹*
*नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांचा वाढदिवस*
********

जन्म - २३ नोव्हेंबर

नृत्यदिग्दर्शक (कोरिओग्राफर) यु. जे. उर्फ उमेश जाधव यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. उमेश जाधव मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पडद्यामागील प्रसिद्ध चेहरा आहे. ते प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. त्यांचा जन्म सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय घरात झाला. त्यामुळे इतर घराप्रमाणेच त्यांच्याकडे शिक्षणाला प्राधान्य होते. घरच्यांचा त्यांच्या या आवडीला विरोध होता.

कोणत्याही प्रकारचे नृत्याचे औपचारिक शिक्षण न घेतलेले उमेश जाधव महाविद्यालयात असताना कधीकाळी हौस म्हणून हिंदी नाटकातून भूमिका करीत असत. चौपाटीच्या भवन्स महाविद्यालयात असताना गंमत म्हणून नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि ते याच क्षेत्रात स्थिरावले. गेल्या पंचवीस-तीस वर्षात शंभरहून अधिक मराठी हिंदी चित्रपट तर जवळपास चाळीस पुरस्कारांनी सन्मानित झालेले उमेश जाधव यांची सुरुवात ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कोरीओग्राफर अहमद खान यांच्याकडे सहाय्यक म्हणून झाली. 

रामगोपाल वर्मांच्या 'रंगीला' या चित्रपटात ते आणि आजचा आघाडीचा कोरिओग्राफर आणि दिगदर्शक रेमो डिसोझा या चित्रपटात मॉब मध्ये डान्सर होते.१९९६ साली 'शस्त्र' या हिंदी चित्रपटासाठी सहायक नृत्यरचनाकार म्हणून काम करत त्याने नृत्यदिग्दर्शनात पदार्पण केले सावरखेड एक गाव, दुनियादारी, झपाटलेला २, टीपी, प्यारवाली लव्हस्टोरी, क्लासमेट' या सिनेमांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. मराठी सोबतच हिंदीतही त्यांनी काम केले आहे. सरफरोश, सिलसिला है प्यार का, ट्रॅफिक सिग्नल, टोटल सियप्पा' या हिंदीतील गाजलेल्या सिनेमांसाठीही त्यांनी नृत्य दिग्दर्शकाची भूमिका वठवली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 'जत्रा' सिनेमातील 'कोंबडी पळाली' हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. तेव्हाच नाही तर हे गाणं आताही कुठे वाजलं की पाय थिरकायला लागतात. या धमाकेदार गाण्याची जादू आजही कायम आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केलेल्या डान्स स्टेप्स या प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं उमेश जाधव यांनी. उमेश जाधव यांची कन्या आयुषीने अद्याप मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेले नाही. पण तिचे ग्लॅमरस फोटो बघता, तो दिवस फार दूर नाही, असे चाहते मानत आहेत.

*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********
[23/11, 8:41 am] Rajesh Chopade Nandura: *साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष*

23 नोव्हेंबर - दिनविशेष

२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना वाचा साहित्य उत्सववर

१९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

१९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
२३ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म वाचा साहित्य उत्सववर

८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)

१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

१९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

१९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

१९६२: भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते संजीव सॅम गंभीर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०२०)


 
१९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

१९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

२३ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू वाचा साहित्य उत्सववर

१९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)

१९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)

१९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)

१९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

१९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

१९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

२०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

२००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
उत्तर लिहिले · 23/11/2022
कर्म · 16010

Related Questions

💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
आजी आजोबा दिवस म्हणजे नेमके काय?
मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
जागतिक नारळ दिन केव्हा साजरा केला जातो?
राष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा करतात?
आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा करतात?
राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस कधी साजरा करतात?