3 उत्तरे
3
answers
रेशनकार्ड काढण्यासाठी उत्पन्न किती पाहिजे?
1
Answer link
रेशनकार्ड उत्पन्नाच्या आधारेच देतात.
त्यात २१००० पर्यंत असेल तर BPL (पिवळे)
२१००० ते १००००० APL(केशरी)
१००००० च्या पुढील - (शुभ्र)
अशा प्रकारे भेटते.
1
Answer link
रेशनकार्ड काढण्यासाठी उत्पन्न
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती
प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो. तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे.
प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते. पांढरे कार्ड व दोन गॅस असलेल्या
रेशनकार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही तर एक गॅस असलेल्या रेशनकार्डधारकाला उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाते.
ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील.
रेशनकार्डचे प्रकार
अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक