कोरोना
कोरोना ग्रस्ताचे मनोगत कोणते येईल?
1 उत्तर
1
answers
कोरोना ग्रस्ताचे मनोगत कोणते येईल?
0
Answer link
माझे नाव आकाश आहे. मला कोरोना हा आजार झाला आहे. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती असून मी एका हॉस्पिटलमध्ये सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
जेव्हापासून कोरोना या आजाराबद्दल आपल्याला माहित होत गेले आहे तेव्हापासून आमच्या हॉस्पिटलमध्ये सतत याचे रुग्ण येत असत.
आमचे कार्य हे रुग्ण सेवेचे असल्यामुळे परंतु हा आजार संसर्गजन्य आहे याचीही तितकीच पूर्ण कल्पना असल्यामुळे आम्ही सर्व कामावरील लोक हे स्वतः ची काळजी घेऊनच तेथील रुग्णांचीही काळजी घेत असू.
कोरोना हा आजार तसा सर्वांसाठीच नवीन आणि त्याबद्दल पुरेशी अशी माहिती कोणालाच नसल्यामुळे आम्ही मात्र जसं जसं जमेल तसें डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपापली जबाबदारी दररोज पार पाडत असतो.