संघटना

शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य कोणते देश आहे?

1 उत्तर
1 answers

शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य कोणते देश आहे?

2
भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व उभय देशांच्या पंतप्रधानांनी केले. या परिषदेला एससीओ सचिवालयाचे महासचिव, एससीओ क्षेत्रीय दहशतवादविरोधी संरचनेचे कार्यकारी संचालक, अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया या चार देशांचे निरीक्षक उपस्थित होते. शांघाय सहकार्य संघटनेची पहिल्यांदाच आभासी स्वरूपामध्ये शिखर परिषद यंदा झाली आहे.
चीन, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या पाच देशांच्या नेत्यांनी १९९६मध्ये ‘शांघाय–५’ या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर १५ जून २००१ रोजी उझबेकिस्तान हा देश सहावा सदस्यदेश म्हणून या संघटनेत सामील झाला. त्यामुळे या संघटनेचे नाव ‘शांघाय सहकार्य संघटना’ (SCO) किंवा ‘शांघाय करार’ असे ठेवण्यात आले. युरोप आणि रशिया या दोन्ही खंडांतील देशांच्या सहभागाने बनलेली अशी ही (युरेशियन) राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटना होय. शेजारी देशांबरोबर चांगले संबंध आणि परस्पर सामंजस्याच्या कराराने संघटनेतील देश परस्परांशी बांधलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान या देशांनी जून २०१७ साली या संघटनेत सामील होण्याविषयीच्या करारावर स्वाक्षरी केली आहेत. शांघाय सहकार्य संघटनेत अन्य काही देशांचा वेगवेगळ्या संदर्भांत समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया या चार देशांचा निरीक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे, तर अमेरिका, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि टर्की हे सहा देश संवाद-भागीदार आहेत. आशियान, सी.आय.एस. आणि तुर्कमेनिस्तान यांना विशेष निमंत्रित म्हणून प्रवेश देण्यात आला आहे. या संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर संबंध प्रस्थापित केले असून आमसभा, युरोपियन युनियन, दक्षिण आणि पूर्व आशियातील देशांची आशियान ही संघटना, स्वतंत्र देशांची राष्ट्रकूल परिषद आणि इस्लामिक सहकार्य परिषद या संघटनांमध्ये शांघाय सहकार्य संघटनेला निरीक्षक म्हणून प्रवेश देण्यात आला आहे. या संघटनेतील सहा सदस्यदेशांनी यूरोप आणि आशियातील ६० टक्के भूभाग व्यापला असून या देशांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एकचतुर्थांश इतकी होते. निरीक्षक देशांची लोकसंख्या यात धरली, तर ही लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या निम्मी होते.
उत्तर लिहिले · 23/1/2022
कर्म · 3740

Related Questions

संघटना का महत्त्वाची असते?
वन मजूर संघटना चे कार्य कोणते वन मंथ?
अशासकीय संघटना ओळखण्याचे निकष थोडक्यात कसे स्पष्ट कराल?
ANZUS ही संघटना कोणती आहे?
कामगार संघटना हेतू पूर्ततेसाठी अवलंबतात ते मार्ग सविस्तर स्पष्ट कसे कराल?
कोणत्या देशाने आर्थिक सुधारणा आणि जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे?
संघटना मधे कोणती पदे असतात?