प्रश्न पत्रिका
व्यक्ती आपला आर्थिक प्रश्न कसा सोडवते?
1 उत्तर
1
answers
व्यक्ती आपला आर्थिक प्रश्न कसा सोडवते?
1
Answer link
१) व्यक्तिगत आर्थिक प्रश्न समजण्यास उपयुक्त समाजात अनेक व्यक्ती राहतात. त्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीला आपले आर्थिक प्रश्न कोणते आहेत, ते समजणे आवश्यक आहे. आपले आर्थिक प्रश्न कोणते आहेत ते समजल्याशिवाय व्यक्तीला त्यावर उपाय शोधता येत नाहीत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने व्यक्तीगत प्रश्न समजू शकतात. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तीगत प्रश्नांचा सखोल अभ्यास केला जातो.
(२) व्यक्तिगत आर्थिक प्रश्न सोडविण्यास उपयुक्त देशातील असंख्य व्यक्तींना आपले आर्थिक प्रश्न : सोडवावे लागतात. आपले मर्यादित उत्पन्न विविध वस्तूंवर कसे खर्च करावे? उत्पादनसंस्था आदर्श उत्पादन पातळी कशी निर्माण करतात? उत्पादन घटकांना रोजगार व उत्पन्न कोणत्या पद्धतीने मिळते? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विवेचनाने मिळतात. म्हणजेच व्यक्ती, कुटुंब, उद्योग संस्था यांना आपले आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो.
३) देशाच्या आर्थिक विकासास उपयुक्त : देशातील अर्थव्यवस्थेत विविध घटक कार्य करत असतात. उदा. भांडवलदार, कामगार, शेतकरी, उद्योगपती. देशाच्या अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास झाला नाही तर देशाचा आर्थिक विकास रोखला जातो. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करता येतो. त्यांचा विकास कसा होतो हे पाहता येते. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास शक्य होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा आर्थिक विकास योग्य रीतीने करता येतो.
४) आर्थिक कल्याण समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिच्या वर्तनाचा उपयोग यांचा अभ्यास