आत्मविश्वास
आत्म विश्वास कसा वाढवावा?
2 उत्तरे
2
answers
आत्म विश्वास कसा वाढवावा?
2
Answer link
आत्मविश्वास कसा वाढवावा?
आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसं भरभरुन लिहलं आणि बोललं जातं, पण तरीही बऱ्याचदा, नेमकं काय करायचं ह्याविषयी गोंधळ कायम राहतो. तर मी आज तुम्हाला नेमक्या, मोजक्या शब्दांत सात टिप्स सांगणार आहे.
१. कशीही परिस्थिती असो, चांगलाच विचार करायचा
आयुष्यात दोन्ही प्रकारच्या परिस्थीती येतात, कधी दुःखाचे, वाईट प्रसंग आले तर त्यातही चांगलं काहीतरी घडलेलं असतचं. फक्त तेवढं शोधुन काढायचं. त्या प्रसंगातुन बोध घ्यायचा, बाकीचं विसरुन, हसत खेळत पुढच्या प्रवासाला निघायचं.
“या तो मै जीतता हुं, या सीखता हुं”…
२. मी कसा आहे, मला माहितीय
कधी कधी आपल्या वस्तुवर किंवा वागण्यावर टिका होते. जवळच्या माणसांचे शब्द जास्त वेदना देतात, टिकेतुन स्वतःमध्ये काय काय सुधारणा करता येईल? फक्त एवढाच विचार करायचा, बाकी विसरुन जायचं, बाकी त्याविषयी जास्त चिंतन, चिंता अणि चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही, फार लोड घ्यायचा नाही, सरळ डिलीट मारुन मोकळं व्हायचं.
३. माझा माझ्यावर विश्वास आहे.
एखादं काम नवीनच करायचंय, मला हे जमेल का नाही? असे विचार मनात येतात, तेव्हा आरशासमोर उभं रहायचं, आणि हे वाक्य म्हणायचे, मी प्रचंड शक्तिशाली आहे, हे काम मी सहज, चुटकीसरशी, करु शकतो. मी ताकदवान आहे, माझा माझ्या बुद्धीवर आणि शक्तीवर पुर्ण विश्वास आहे. मी असामान्य आहे.
आणि अशीच अजुन जी वाक्य तुम्हाला सुचतील ती सारी वाक्ये म्हणु शकता. काम करायला एक वेगळीच शक्ती मिळते.
४. माझा कृती करण्यावर विश्वास आहे.
नुसतं बोलल्याने काम होत नाही, ती फक्त सुरुवात असते, सळसळत्या उत्साहाने, आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला हात घालायचा. यश मिळेपर्यंत चिकाटीने काम करत रहायचं. लवकरच काम फत्ते होतं. त्या कामातुन मिळालेला आत्मविश्वास पुढच्या कामात वापरायचा.
५. मी धैर्याने आणि नियोजनपुर्वक भीतीचा सामना करतो.
एखादं अवघड काम करताना भीती वाटतेच, तिला थारा द्यायचा नाही, तिला घाबरायचं नाही आणि तिला मनात जास्त रेंगाळु द्यायचं नाही, हसत हसत तिचा सामना करायचा, आपण आनंदाने काम करत राहीलो, तिला भाव नाही दिला की ती आपोआप पळुन जाते.
६. मी माझ्या उणीवा शोधतो, आणि त्या दुर करतो.
कालच्यापेक्षा आज स्वतःमध्ये मी काय सुधारणा केली असा प्रश्न रोज स्वतःला विचारायचा. तुमची स्पर्धा इतरांशी नाही, तुमच्या स्वतःशी आहे, म्हणजे आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्त यशस्वी होत राहु.
७. मी यशस्वी लोकांसारखी ‘बॉडी लॅंग्वेज’ वापरण्याचा सराव करतो.
प्रत्येक यशस्वी माणसांमध्ये हसरा, प्रसन्न चेहरा, रुबाबात ताठ चालणं, वॉर्म हॅंडशेक, बोलताना हातांची अर्थपुर्ण हालचाल, समोरच्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलणं, स्पष्ट खणखणीत आवाज, नर्मविनोदी शैली, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करत करत, त्यांच्याकडुन सतत शिकत स्वतःचं डॅशिंग व्यक्तीमत्व बनवायचं.
धन्यवाद!..
0
Answer link
आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही उपाय:
- सकारात्मक विचार करा: नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
- ध्येय निश्चित करा: लहान ध्येये निश्चित करा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.
- स्वतःवर विश्वास ठेवा: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वतःला कमी लेखू नका.
- तयारी करा: ज्या गोष्टींमध्ये कमी आत्मविश्वास वाटतो, त्यांची तयारी करा. माहिती मिळवा आणि सराव करा.
- अपयशांना सामोरे जा: अपयशाने खचून जाऊ नका. त्यातून शिका आणि पुढे जा.
- स्वतःची काळजी घ्या: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवा.
- नवीन गोष्टी शिका: नवीन कौशल्ये आत्मसात करा.
- इतरांशी तुलना करणे टाळा: प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे इतरांशी तुलना करू नका.
- मदत मागा: गरज वाटल्यास मित्र, कुटुंब किंवा तज्ञांची मदत घ्या.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: