1 उत्तर
1
answers
ATM मशीन मध्ये पैसे नसल्यास कोठे तक्रार करावी?
2
Answer link
💁♀️ *_ATM मध्ये पैसे नसल्यास कुठे करावी तक्रार, जाणून घ्या...._*
🔰📶 *महा डिजी| माहिती*
🎯 भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांची सुविधा लक्षात घेता, नवा आदेश जारी केला आहे. या अंतर्गत एटीएममध्ये कॅश नसल्यास, RBI कडून बँकांना दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने कॅश उपलब्ध नसल्यास, ग्राहकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी हे पाउल उचललं आहे.
🏦 बँकांनी नियमाचं पालन न केल्यास या संदर्भात गांभिर्याने पाहिलं जाईल तसंच बँकांना दंडही आकारला जाईल, असं RBI ने म्हटलं आहे. एटीएममध्ये रोख रक्कम न टाकल्याबद्दल दंडाच्या योजनेत ही तरतूद करण्यात आली आहे. एटीएममध्ये वेळेत पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेला 10000 रुपये दंड आकारला जाईल.
🧐 *कुठे केली जाते तक्रार*
● एखाद्या बँकेच्या ATM मध्ये पैसे नसल्यास, ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर किंवा फेसबुक पेजवर तक्रार करू शकतात.
● त्याशिवाय 011 23711333 या क्रमांकावर फोन करुनही तक्रार करू शकतात.