महाराष्ट्र मध्ये जिल्हे किती आहेत?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्र मध्ये जिल्हे किती आहेत?

3
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण २६ जिल्हे होते. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत अजून १० जिल्हे तयार करण्यात आले, असे सगळे मिळून आजच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकूण ३६ जिल्हे आहेत. कोकण विभाग (७ जिल्हे) : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
उत्तर लिहिले · 17/8/2021
कर्म · 34235
2
महाराष्ट्रातील 36 जिल्हे
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. परकीय अंमलाखाली असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले. तरी महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 मध्ये झाली. 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे अस्तित्वात होते. काळाच्या ओघात सध्या म्हणजे आज 12 मार्च 2021 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. तारखेसहित नोंद देण्याचे कारण असे की, यापुढील काळामध्ये जिल्ह्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते. 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.  

सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत. 

यामध्ये नाशिक प्रशासकीय विभाग व अमरावती प्रशासकीय विभाग यांची भर पडली आहे. 

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे ।  सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी असलेल्या 26 जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे. वाढती लोकसंख्या, प्रशासनाची सोय, लोकांची मागणी यासारख्या विविध मुद्द्यांना अनुसरून अशा जिल्ह्यांची निर्मिती केली जात असते. 

महाराष्ट्रातील 36 जिल्हे
क्र. जिल्हा क्र. जिल्हा
१ मुंबई शहर १९ जालना
२ मुंबई उपनगर २० बीड
३ ठाणे २१ परभणी
४ पालघर २२ हिंगोली
५ रायगड २३ उस्मानाबाद
६ रत्नागिरी २४ लातूर
७ सिंधुदुर्ग २५ नांदेड
८ नाशिक २६ अमरावती
९ अहमदनगर २७ बुलढाणा
१० धुळे २८ अकोला
११ नंदुरबार २९ वाशीम 
१२ जळगाव ३० यवतमाळ
१३ पुणे ३१ नागपूर
१४ सातारा ३२ वर्धा
१५ सांगली ३३ भंडारा
१६ कोल्हापूर ३४ गोंदिया
१७ सोलापूर ३५ चंद्रपूर
१८ औरंगाबाद ३६ गडचिरोली

महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे | 

क्र. जिल्हा क्र. जिल्हा
१ ठाणे १४ उस्मानाबाद 
२ कुलाबा १५ परभणी
३ रत्नागिरी १६ नांदेड
४ बृह न्मुंबई १७ बुलढाणा
५ नाशिक १८ अहमदनगर
६ धुळे १९ अकोला 
७ पुणे २० अमरावती 
८ सांगली २१ नागपूर
९ सातारा २२ वर्धा
१० कोल्हापूर २३ यवतमाळ
११ सोलापूर २४ जळगाव
१२ औरंगाबाद २५ भंडारा
१३ बीड २६ चांदा 
महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे
पुढील तक्ता मधील दोन जिल्हे ठळक व लाल रंगात दिसतील. ठळक केलेले जिल्हे सध्या अस्तित्वात नाहीत. या जिल्ह्यांच्या नावांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून ‘रायगड’ असे करण्यात आलेले आहे तर चांदा जिल्ह्याचे नाव बदलून ‘चंद्रपूर’ असे करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये झालेला बदल

महाराष्ट्रातील सुरुवातीच्या 26 जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे. हे दहा जिल्हे कोणत्या नवीन भूमीला महाराष्ट्र राज्यामध्ये सामावून घेत नाहीत. अस्तित्वात असलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये फोड होऊन नवीन दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत. हे पुढील प्रमाणे…. 

क्रमांक पूर्वीचा जिल्हा नवीन जिल्हा निर्माण झालेली तारीख
१ रत्नागिरी सिंधुदुर्ग १ मे १९८१
२ औरंगाबाद जालना १ मे १९८१
३ उस्मानाबाद लातूर १६ ऑगस्ट १९८२
४ चंद्रपूर गडचिरोली २६ ऑगस्ट १९८२
५ बृह न्मुंबई मुंबई उपनगर १ ऑक्टोबर १९९०
६ अकोला वाशिम १ जुलै १९९८
७ धुळे नंदुरबार १ जुलै १९९८
८ परभणी हिंगोली १ मे १९९९
९ भंडारा गोंदिया १ मे १९९९
१० ठाणे पालघर १ ऑगस्ट २
उत्तर लिहिले · 17/8/2021
कर्म · 121765
0

महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत.

हे जिल्हे प्रशासकीय सोयीसाठी 6 विभागांमध्ये विभागलेले आहेत:

  • अमरावती विभाग: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ.
  • औरंगाबाद विभाग (छत्रपती संभाजीनगर विभाग): औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर.
  • कोकण विभाग: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • नागपूर विभाग: नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा.
  • नाशिक विभाग: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर.
  • पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 840